राज्य – कर्नाटक
इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – इतिहास
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 18. भक्ती पंथ
स्वाध्याय
1. योग्य शब्दासह रिक्त जागा भरा.
1. भक्ती म्हणजे देवावर नितांत श्रद्धा ठेवणे होय.
2. कबीर हे रामानंद यांचे प्रसिध्द अनुयायी होते.
3. कबीराच्या अनुयायांना कबीर पंथीय म्हटले जाते.
4. चैतन्यांच्या तात्विक विचारांचा संग्रह चैतन्य चरितामृत.
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. राम-सितेची पूजा कोणी लोकप्रिय केली. त्यांच्या समाजासाठी कोणत्या सेवा आहेत ?
उत्तर -राम-सितेची पूजा रामानंद यांनी लोकप्रिय केली. जाती प्रथेला विरोध,प्रेम व भक्तीवर आधारीत वैष्णव धर्माचा पुरस्कार या त्यांनी समाजासाठी केलेल्या सेवा होत्या.
2. शीख कोणाला म्हणतात ? त्यांचा पवित्र ग्रंथ कोणता ?
गुरुनानकांच्या अनुयायांना शिक असे म्हणतात.त्यांचा पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहेब हा होय.
3. आसामच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात श्रीमंत शंकरदेवाची भूमिका महत्वाची आहे. स्पष्ट करा.
उत्तर – श्रीमंत शंकरदेव यांची आसामच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात मोलाची भूमिका आहे.ते १५व्या-१६व्या शतकातील संत, विद्वान, नाटककार आणि समाजसुधारक होते ज्यांनी आसामी समाजावर लक्षणीय प्रभाव पाडला.त्यांनी भक्ती चळवळीला चालना देण्यासाठी आसाममध्ये वैष्णव चळवळ चालू केली. त्यांनी केलेल्या सत्तरीय नृत्यासारख्या नृत्य प्रकारांच्या स्थापनेमुळे आसामचा सांस्कृतिक वारसा समृद्ध झाला.त्यांनी जाती-आधारित भेदभावाविरुद्ध उपदेश केला, अधिक समावेशक समाजासाठी योगदान दिले.
थोडक्यात, आसाममधील शंकरदेवाचे योगदान आणि भक्ती चळवळ या दोन्हींचा समाज, संस्कृती आणि धार्मिक प्रथांवर खोलवर परिणाम झाला, ज्यामुळे संपूर्ण भारतीय उपखंडात सर्वसमावेशकता, साधेपणा आणि भक्तीला चालना मिळाली.
4. भक्तीमार्गाच्या चळवळीचा परिणाम काय झाला ?
भक्तीमार्गाच्या चळवळीमुळे हिंदू समाजातील अनेक उणिवा या सुधारकांनी नाहिशा केल्या.भारतातील प्रादेशिक भाषांचा विकास झाला.तसेच या काळात भारतीय संस्कृतीचाही विकास झाला ही एक अभिमानाचीच गोष्ट आहे.