इयत्ता – नववी
विषय – समाज
विज्ञान
विभाग – इतिहास
सुधारित २०२२
पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 4.विजयनगर साम्राज्य आणि बहामनी साम्राज्य
स्वाध्याय
1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. विजयनगर साम्राज्याची स्थापना 1336 या वर्षी झाली.
2. मधुराविजयम ही साहित्यकृती गंगादेवी यांनी लिहिली.
3.प्रौढ देवरायाचा मंत्री दंडेश हा होय.
4. अमुक्त माल्यदा ही तेलगु साहित्यरचना कृष्णदेवराय यांनी लिहिली.
5. बिदरचा मदरसा ख्वाजा महमद गवान याने बांधला.
6. किताब– ए. नवरस हे पुस्तक इब्राहिम आदिलशाह दुसरा याने लिहिले.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
7. विजयनगरवर राज्य केलेली घराणी कोणकोणती?
उत्तर –विजयनगर साम्राज्यावर राज्य करणारे चार घराणी –
–संगम घराणे
–साळुव घराणे
–तुळूव घराणे
–अरविदु घराणे
8. दुसऱ्या देवरायांचे कार्य लिहा.
उत्तर – दुसऱ्या देवरायाचे कार्य खालीलप्रमाणे:
यशस्वी लष्करी मोहिमेद्वारे साम्राज्याचा विस्तार केला.
ओरिसाचा गजपती कपिलेंद्रचा पराभव केला.
कला,साहित्य आणि वास्तुकला यांचे संवर्धन व संरक्षण केले.
अनेक संस्कृत पंडितांना आपल्या राज्यात आश्रय दिला.
9. कृष्णदेवरायांना राज्यावर येताच कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले?
उत्तर –कृष्णदेवराय राज्यावर येताच त्यांना पुढील समस्यांचा सामना करावा लागला:
राज्यांतर्गत आणि राज्याबाहेरील अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
शेजारील राज्ये आणि बंडखोर प्रमुखांकडून धमक्या येऊ लागल्या.
युरोपियन व मोघल राज्य विस्ताराच्या तयारीत होते.
युद्धे आणि पूर्वीच्या गैरव्यवस्थापनामुळे आर्थिक अडचणी होत्या.
बहामनी राज्याचे पाच शाही सुलतान कृष्णदेवरायाच्या विरोधात युद्धाच्या तयारीत होते.
10.आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात विजयनगर साम्राज्याचे योगदान लिहा.
उत्तर – विजयनगरचे योगदान खालीलप्रमाणे आहे.
विजयनगर आर्थिकदृष्ट्या संपन्न होते.कारण राजांनी कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणल्या.
राजांनी सिंचन आणि शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विहिरी आणि कालवे बांधले.
त्यांनी गेनी,गुत्तीगे,सिद्धय,वर आणि गडी अशा पाच प्रकारच्या जमीनधारणेच्या पद्धती आणल्या.
विजयनगर साम्राज्याने उद्योग आणि व्यापार क्षेत्रात मोठी प्रगती केली होती.
विजयनगर काळात सोन्याचे वराह,गद्यान,पगोडा,चांदीच्या
तारा,तांब्याच्या तारा इत्यादी नाणी चलनात होती.
विजयनगरच्या राजांनी आर्थिक विकासासाठी परकीयांशी व्यापारी संबंध ठेवले होते. – मिरपूड,लवंगा,वेलची इत्यादी मसाले पदार्थ तसेच कस्तुरी,कच्चे लोखंड,हिरे,चंदन यांची निर्यात केली जात असे.
11.विजयनगरांच्या काळतील कला आणि वास्तुशिल्पकलेची माहिती लिहा.
उत्तर – विजयनगर साम्राज्याचे कलेच्या क्षेत्रातील योगदान अविस्मरणीय आहे. ते कलेचे भोक्ते होते.यांच्या काळात देवालये राजवाडे, किल्ले, मनोरे, महामंटप, सार्वजनिक इमारती, तलाव कालवे आणि अनेक इमारती बांधण्यात आल्या.
वास्तुशिल्प –
विजयनगर साम्राज्य काळातील वास्तुशिल्प शैलीचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे अनेक खांबानी मिळून तयार झालेला विशाल सभामंटप किंवा कल्याणमंटप, देवळांची उंच गोपुरे (रायगोपुर), पूर्णाकृती कमानी आणि मंटप होय.
शृंगेरी येथील विद्याशंकर मंदिर,हंपी येथील विरूपाक्ष मंदिर व विठ्ठल मंदिर, महानवमी टेकडी इत्यादी मंदिरे ही त्यांच्या वास्तू शिल्पकलेची उत्तम उदाहरणे आहेत.कमल महल, गजशाळा, सणीचे स्नानगृह इ. इमारती इंडो-सिरॅमिक बांधकाम शैलीची उत्तम उदाहरणे आहेत.
कला-:
विजयनगर साम्राज्यातील राजकर्त्यांनी संगीत, नृत्य, नाटक या ललीतकलांना उत्तेजन दिले.गायक, वादक आणि इतर कलाकारांना दरबार आणि देवालयात सन्मान दिला जात असे. पुरंदरदास आणि कनकदास यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून कर्नाटक संगीतात भर टाकली. नर्तकी अलंकृत होऊन देवालय आणि दरबारात नृत्य प्रदर्शन करीत असत.
एकंदरीत विजयनगर साम्राज्याचा काळ हा दक्षिण भारतीय कला आणि वास्तुकलेचा सुवर्णकाळ होता.या काळातील वारसा आजही हम्पी आणि इतर ऐतिहासिक स्थळांच्या अवशेषांमध्ये पहायला मिळतो.
12. महम्मद गवाण बहामनी राज्यातील उत्तम प्रधान मंत्री कसा?
उत्तर – महम्मद गवान बहामनी साम्राज्य काळात एक प्रमुख मंत्री आणि विद्वान होता.महम्मद गवानने आपली निष्ठा निस्वार्थ सेवा उत्कृष्ट राज्यकारभार यांच्या जोरावर बहामनी साम्राज्याला उत्कर्षाच्या शिखरावर नेऊन पोहोचविले.त्यांनी इस्लाम धर्म आणि कायद्यांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी बिदर येथे मदरसा (कॉलेज) स्थापन केला. महाविद्यालयाची इमारत डेक्कन शैलीतील भव्य बांधकाम होती.त्यांनी कैरो येथे मुस्लिम धार्मिक वचने आणि कायदा शिकला.त्यांनी अरबी आणि पारशी भाषांवर प्रभुत्व मिळवले.त्याने कोकण, गोवा,बेळगावी जिंकले.त्याने कांचीवर आक्रमण करून तेथील प्रचंड संपत्ती लुटली.अशाप्रकारे महम्मद गवानची कामगिरी पाहून तो बहामनी राज्याचा उत्तम प्रधानमंत्री होता.
13. बहामनी सुलतानाच्या राज्यव्यवस्था आणि महसूल व्यवस्थेची माहिती लिहा.
उत्तर – बहामनी सुलतानांच्या राज्यव्यवस्था आणि महसूल व्यवस्था :
राज्यव्यवस्था:-
बहामनी सुलतानांची राज्यव्यवस्था मध्य,प्रांतीय आणि गाव अशा तीन भागात विभागलेली होती.सुलतान हा केंद्रीय प्रशासनाचा प्रमुख होता. सुलतानच्या मंत्रिमंडळाला मजलिस–इ–इबलित असे म्हणत.सरकारचा प्रमुख सुभेदार ,परगण्याचा प्रमुख, देसाई तर कुलकर्णी,तळवार हे ग्राम प्रमुख असत.
महसूल व्यवस्था :- अमिर ए– जुमला हा महसुल विभागाचा प्रमुख असे.जमीन महसूल हे उत्पन्नाचे प्रमुख साधन होते.1/3 पासून ½ भाग जमीन महसूल म्हणून गोळा केला जात असे.खाणीवरील कर तंबाखू, कुरणावर कर,व्यापार कर,व्यवसाय कर असे एकूण 50 प्रकारचे कर होते.कराच्या स्वरुपात गोळा केलेल्या पैशात किल्ले राजमहाल,कचेऱ्यांचे बांधकाम, संरक्षण दलाची व्यवस्था (पगार) विव्दानाना देणग्या आणि युध्दाचा खर्च भागविला जात असे.सैनिकावरील खर्चाचे प्रमाण जास्त होते.
14.बहामनी सुलतानाच्या काळातील शिक्षण, कला आणि शिल्पकलेबद्दल माहिती लिहा.
उत्तर – बहामनी सुलतानांनी शिक्षण, कला आणि स्थापत्यशास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.त्यांनी प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन केल्या,विद्वान आणि कवींना आश्रय दिला आणि साहित्यिक कृतींचे भाषांतर केले. मक्तब नावाच्या शाळा मशिदीकडून नियंत्रित केल्या जात असत.स्वतः विव्दान असलेल्या महम्मद गवाणने बिदर येथे मदरसा स्थापन करून तेथे इस्लामधर्म आणि कायदयाच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.
बहामनी सुलतानांनी इंडो– सिरॅमिक बांधकाम शैलीला उत्तेजन दिले.पहिल्या अली अदिलशाहीने बांधलेले जामिया मशिद हे या काळातील प्रमुख स्मारक आहे. इब्राहिम रोजा, गोलघुमट, गगन महल प्रमुख इमारती ( स्मारके) आहेत.
9वी समाज विज्ञान सर्व पाठांवरील प्रश्नोत्तरांसाठी येथे स्पर्श करा..
2. 9 ते 14व्या शतकातील भारत
https://www.smartguruji.in/2023/06/9th-ss-29-14.html
1. पाश्चात्त्य धर्म
https://www.smartguruji.in/2023/06/9th-ss-1western-religions.html
➖➖➖➖➖➖
इयत्ता- 9वीविषय – विज्ञान
Class- 9Sub – English (TL)
इयत्ता- 8वी
विषय – समाज विज्ञान
❇️प्रश्नोत्तरे❇️ विभाग – भूगोल
21.पृथ्वी- आपला सजीवांचा ग्रह
https://www.smartguruji.in/2023/07/8th%20SS%2021%20Earth%20is%20our%20living%20planet.html
⚜️विभाग – इतिहास⚜️
2.भारत वर्ष
https://www.smartguruji.in/2022/06/8th-ss-2-bharatavarsh-2.html
➖➖➖➖➖➖➖➖➖
1.साधने
https://www.smartguruji.in/2022/06/8th-ss-1-sadhane-1.html
➖➖➖➖➖➖
राज्यशास्त्र
13. राज्यशास्त्राचा अर्थ व महत्त्व
https://www.smartguruji.in/2022/06/8th-ss-13-meaning-and-importance-of.html
शेअर करा