6th SS 6. CITIZEN And CITIZENSHIP 6- नागरिक आणि नागरिकत्व



 6वी समाज विज्ञान 

प्रकरण 6- नागरिक आणि नागरिकत्व

इयत्ता – सहावी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 6- नागरिक आणि नागरिकत्व



 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. नागरिक म्हणजे कोण ?
उत्तर- एखाद्या देशात जन्म घेऊन तिथेच स्थायिक झालेले,त्या देशाचे कायमचे रहिवासी झालेले व जो त्या देशाचे अधिकार आणि जबाबदाऱ्यांसाठी पात्र असतो.त्याला नागरिक असे म्हणतात.

2. तू भारतीय नागरिक आहेस का? कसे ?
उत्तर- होय मी भारतीय नागरिक आहे.कारण मी जन्मापासून भारतातील कायमचा रहिवासी आहे.

3.नागरिकत्व मिळविण्याच्या दोन पध्दती सांगा ?
उत्तर- एखाद्या देशाचे नागरिकत्व मिळविण्याच्या सामान्यतः दोन पध्दती आहेत.
1.नैसर्गिक (सहज) नागरिकत्व म्हणजे एखादे मूल ज्या देशात जन्मते त्या देशाचे नागरिकत्व त्याला प्राप्त होते.(जन्मसिद्ध नागरिकत्व).
2.सहजस्वीकृत नागरिकत्व म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या देशाचे नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळविते.

4. आदर्श नागरिकांची लक्षणे कोणती ?
उत्तर-प्रामाणिकपणा,कायदे आणि नियमांचा आदर करणे.
लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे उदा. निवडणुकीत मतदान करणे.पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे,विविधता आणि सहिष्णुतेचा आदर करणे,राष्ट्रीय चिन्हे आणि मूल्यांचा सन्मान करणे. अशी आदर्श नागरिकांची लक्षणे आहेत.

5.जेष्ठ नागरिकांना तुम्ही कशी मदत करु शकता ?
उत्तर- ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन कामात मदत करून, भावनिक आधार देऊन, त्यांना संरक्षण देऊन, त्यांच्या मतांचा आणि अनुभवांचा आदर करून ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मदत करू शकतो.

6. तुम्ही रांगा कोठे कोठे पाहिला आहात? रांगेचे पालन केल्यामुळे कोणते कायदे होतात ?
उत्तर- बँका,तिकीट काउंटर,सुपरमार्केट आणि सार्वजनिक वाहतूक स्थानके यांसारख्या ठिकाणी सामान्यतः रांगा किंवा ओळी दिसून येतात.
रांगेचे पालन केल्याने सुव्यवस्था राखणे, निष्पक्षपणा राखणे,अराजकता कमी करणे आणि सर्व लोकांना समानता व आदराची भावना वाढवणे हे फायदे होतात.


 
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *