इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2023 सुधारित
विषय – स्वाध्याय
प्रकरण 4 – 18व्या शतकातील भारत (1707 – 1757)
अभ्यास
एका शब्दात किंवा वाक्यात उत्तरे द्या.
1. कोणत्या शतकाला इतिहासकारांनी ‘मराठा सार्वभौमत्व’ काळ म्हटले आहे
उत्तर – इतिहासकारांनी 18 व्या शतकाला ‘मराठा सार्वभौमत्व’ म्हटले आहे.
उत्तर –पानिपतची तिसरी लढाई मराठे आणि अहमद शाह अब्दाली (अफगाण आक्रमक) यांच्यात झाली.
3. कर्नाटक युद्धात शेवटी कोणाचा विजय झाला ?
उत्तर –कर्नाटक युद्धात शेवटी ब्रिटिशांचा विजय झाला.
उत्तर –प्लासीची लढाई बंगालचा नवाब सिराज-उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाली.
2. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. पेशव्यातील पहिल्या बाजीरावांच्या योगदानाबद्दल लिहा.
उत्तर – पेशव्यातील पहिल्या बाजीरावांनी भारतात एक प्रचंड विशाल साम्राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता.त्यांनी हैदराबाद, माळवा, गुजरात आणि बुंदेलखंड ताब्यात जिंकून घेतले.बाजीरावांची महत्त्वाची कामगिरी म्हणजे आपल्या सैन्यासह उत्तर भारताकडे कूच केले आणि दिल्लीवर आक्रमण केले.त्यामुळे त्याला ‘दुसरा शिवाजी’ ही पदवी मिळाली
उत्तर – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचे नवाब सिराज-उद्दौला यांच्यातील वाद हे प्लासीच्या लढाईचे प्रमुख कारण होते.इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता पोर्ट विल्यम येथील किल्ला मजबूत केला आणि व्यवसायावरील कर सवलतींचा गैरवापर केला, ज्यामुळे तणाव आणि संघर्ष वाढला व हेच पुढे प्लासीच्या लढाईचे कारण ठरले.
उत्तर – प्लासीची लढाई महत्त्वपूर्ण आहे कारण या लढाईत इंग्रजांचा विजय झाला.यामुळे बंगालमध्ये इंग्रजांना राजकीय सत्ता मिळाली.ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपार संपत्ती आणि 24 परगण्यांची जमीनदारी हक्क (जहागिरी) मिळवला.भारतात संपत्ती आणि सत्ता गोळा केली आणि भारतात ब्रिटिश साम्राज्याचा पाया घातला.