इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2022 सुधारित
विषय – स्वाध्याय
प्रकरण 2 – आपले गौरवशाली राज्य कर्नाटक
(1.4 बेळगावी विभाग)
अभ्यास
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. ब्रिटीशांविरुद्ध लढा पुकारलेल्या राणीचे नांव काय?
उत्तर –ब्रिटीशांविरुद्ध लढा पुकारलेल्या राणीचे नांव कित्तुर राणी चन्नम्मा होय.
2.हावेरी,गदग आणि बागलकोट या जिल्ह्यांची रचना कोणत्या साली झाली?
उत्तर –हावेरी,गदग आणि बागलकोट या जिल्ह्यांची रचना 1997 साली झाली.
3.म.गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अधिवेशन या विभागातील कोणत्या जिल्ह्यात व किती साली झाले?
उत्तर –म.गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अधिवेशन या विभागातील बेळगावी जिल्ह्यात व 1924 साली झाले.
4. बदामी ही कोणत्या राज घराण्याची राजधानी होती?
उत्तर –बदामी ही चालुक्य राजघराण्याची राजधानी होती.
5. बेळगावी विभागातील प्रमुख दोन नद्यांची नावे लिहा.
उत्तर –कृष्णा आणि मलप्रभा बेळगावी विभागातील प्रमुख दोन नद्यांची नावे आहेत.
6.या विभागातील प्रमुख अभयारण्याची नावे लिहा.
उत्तर –दांडेली येथील अभयारण्य आणि अट्टीवेरी पक्षीधाम ही या विभागातील प्रमुख अभयारण्ये होय.
7. इळकल्लमध्ये मिळणारी नैसर्गिक साधन संपत्ती कोणती?
उत्तर –ग्रॅनाईट ही इळकल्लमध्ये मिळणारी नैसर्गिक साधन संपत्ती आहे.
8. सदाहरित जंगले म्हणजे काय ?
उत्तर –वर्षभर हिरवीगार असणाऱ्या आरण्यांना सदाहरित अरण्य असे म्हणतात.
9. बेळगावी विभागातील प्रमुख धबधब्यांची नावे लिहा.
उत्तर –गोकाक धबधबा,मागोडू धबधबा,देवमाला धबधबा,अप्सरकोंडा धबधबा बेळगावी विभागातील धबधबे आहेत.
10. बेळगावी विभागातील कोणत्या जिल्ह्यात लोखंडाची खनिजे मिळतात ?
उत्तर –बेळगावी विभागातील बागलकोट जिल्ह्यात लोखंडाची खनिजे मिळतात.
11. बेळगावी विभागातील प्रमुख पिके कोणकोणती ?
उत्तर –बेळगावी विभागातील प्रमुख पिके भात कापूस मका कडधान्य गहू भुईमूग आणि मिरची आहेत.
12. बेळगावी विभागातील कोणत्या जिल्ह्यातील लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे?
उत्तर –बेळगाव जिल्ह्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे.
13. बेळगावी विभागातील कोणत्या जिल्ह्यात बीजोत्पादन केंद्रे आहेत?
उत्तर –बेळगावी विभागातील हावेरी जिल्ह्यात बीजोत्पादन केंद्रे आहेत.
14. बेळगावी विभागातील बॅडगी हे गाव कोणत्या शेती उत्पन्नामुळे नावारूपास आले आहे?
उत्तर –बेळगावी विभागातील बॅडगी हे गाव मिरची या शेती उत्पन्नामुळे नावारुपास आले आहे.
15. बेळगावी विभागातील चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची नावे लिहा.
उत्तर –द.रा.बेंद्रे,चंद्रशेखर कंबर,गिरीश कन्नड आणि वि.कृ.गोकाक हे बेळगाव जिल्ह्यातील चार ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत.
16. बेळगावी विभागातील तीन प्रसिद्ध संगीतकारांची नावे लिहा.
उत्तर –बेळगावी विभागातील पंडित भीमसेन जोशी,पंडित मल्लिकार्जुन मन्सूर आणि गंगुबाई हनगल हे तीन प्रसिद्ध संगीतकार आहेत.
17. बेळगावी विभागातील दोन प्रसिद्ध नाटक प्रकारांची नावे लिहा.
उत्तर –यक्षगाण,सन्नाट, दोड्डाट हे बेळगावी विभागातील दोन प्रसिद्ध नाटक प्रकार आहेत.
18.बेळगावी विभागातील कोणत्या जिल्ह्यात कायदा महाविद्यालय आहे?
उत्तर –बेळगावी विभागातील बेळगावी जिल्ह्यात कायदा महाविद्यालय आहे.
19.ग्रामीण भागात सरकारने स्थापन केलेल्या आरोग्य केंद्राचे नाव काय?
उत्तर –ग्रामीण भागात सरकारने स्थापन केलेल्या आरोग्य केंद्राचे नाव प्राथमिक आरोग्य केंद्र होय.
20.या विभागातील कोणत्या जिल्ह्यात बागकाम विश्वविद्यालय आहे ?
उत्तर –या विभागातील बागलकोट जिल्ह्यात (कृषी) बागकाम विश्वविद्यालय आहे.
21.कर्नाटक विभागातील प्रथम महिला विश्वविद्यालय कोठे सुरु झाले?
उत्तर –कर्नाटक विभागातील प्रथम महिला विश्वविद्यालय विजापूर येथे सुरु झाले. (कर्नाटक राज्य महिला विश्वविद्यालय)
22.बेळगावी विभागातील कोणत्या राणीने इ.स. 1824 मध्ये ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला?
उत्तर –बेळगावी विभागातील कित्तूर राणी चन्नम्माने इ.स. 1824 मध्ये ब्रिटीशांविरुद्ध लढा दिला.
23. प्रमुख तीन स्वातंत्र्य वीरांची नावे लिहा.
उत्तर –बेळगावी विभागातील तीन प्रमुख स्वातंत्र्यसैनिक सिद्धप्पा कांबळी,आलुरू व्यंकटराव आणि ना.सु. हर्डीकर.
24. बेळगावी विभागातील पत्रकारिकेमध्ये अपार योगदान दिलेल्या दोन प्रमुख व्यक्तीची नावे लिहा.
उत्तर –बेळगावी विभागातील पत्रकारिकेमध्ये अपार योगदान दिलेल्या दोन प्रमुख व्यक्ती मोहरे हनुमंतराय आणि पाटील पुट्टप्पा.
रिकाम्या जागा भरा.
बेळगावी विभागातील जिल्हे 1956 साली कर्नाटकात समाविष्ट करण्यात आले.