9वी समाज विज्ञान
प्रकरण 5 – आपली राज्यघटना
इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2022 सुधारित
विषय – स्वाध्याय
I. गाळलेल्या जागी योग्य शब्द भराः
1. राज्याचा कारभार चालविणारा कायदा राज्यघटना हा होय.
2. नूतन घटना रचना सभा 9 डिसेंबर 1946 रोजी झाली.
3. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसूदा समितीचे अध्यक्ष होते.
4.आपल्या घटनेने लोकसभा सरकार पद्धतीचा अवलंब केला आहे.
5. ज्या राज्यात लोक सार्वभौम अधिकार उपभोगतात त्याना प्रजासत्ताक गणराज्य असे म्हणतात.
6.आपल्या घटनेने आपल्या नागरिकांसाठी एकेरी नागरिकत्वाची तरतूद केली आहे.
7. घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32 अन्वये समाविष्ट करण्यात आला आहे.
8. राज्याच्या धोरणाची अधिकृत तत्वे आयर्लंड देशाच्या घटनेतून घेतली आहेत.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहाः
1. नूतन कायदेमंडळाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर – डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नूतन कायदेमंडळाचे अध्यक्ष होते.
2. आपली घटना केव्हा अमलात आली?
उत्तर – 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताची राज्यघटना अमलात आली.
3. भारतीय घटनेची मुख्य वैशिष्टये कोणती?
उत्तर –भारतीय घटनेची मुख्य वैशिष्टये -:
1. लिखित व मोठी घटना
2.लोकसभेच्या सरकारचे स्वरूप
3.प्रजासत्ताक पद्धती
4. संघराज्य पद्धती
5. मुलभूत हक्क
6. मुलभूत कर्तव्ये
4. घटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या गोष्टीचा समावेश केलेला आहे?
उत्तर – घटनेच्या प्रस्तावनेत न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक तसेच भारतीय राज्यघटनेची मूलभूत मूल्ये,उद्दिष्टे इत्यादी गोष्टीचा समावेश केलेला आहे.
5. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ?
उत्तर – धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही एका विशिष्ट धर्म किंवा पंथाला दर्जा नसून धर्म पंथाच्या आधारावर नागरिकांना फरक केला जाणार नाही.
6. आपल्या घटनेने समाविष्ट केलले मुलभूत हक्क कोणते?
उत्तर – आपल्या घटनेत 6 मुलभूत हक्क आहेत.
1.समानतेचा हक्क
2.स्वातंत्र्याचा हक्क
3.पिळवणूकीविरुद्ध हक्क
4.धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
5.सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क
6.घटनात्मक उपायांचा हक्क
7.राज्यांच्या धोरणाची अधिकृत तत्वे कोणती?
उत्तर – राज्याच्या धोरणाबाबतची ही अधिकृत तत्वे -:
1.सर्व नागरिकांना पुरेशी उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध करुण देणे.
2. समाईक संपती आणि उत्पादन साधने कांही ठराविक लोकांची वैयक्तीक मालम ता बनण्यापासून रोखणे.
3. स्त्री-पुरुषाना समान कामासाठी समान मोबदला देणे.
4. वृद्ध, रोगी, दुर्बल व असाहय घटकाना राष्ट्रीय मदत पुरविणे.
5. देशामध्ये सर्वत्र समान नागरी नियमाच अवलंब करणे.
6. 6 वर्षाखालील सर्व मुलाना उपलब्ध करून देणे.
7. ऐतिहासिक स्मारकाचे रक्षण करुन ऐतिहासिक वारसा जपणे.
8. कार्यकारी मंडळ व न्यायव्यवस्था वेगळी करणे.
9. आतंरराष्ट्रीय शांतता जपणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे.
10. ग्रामपंचायतीची स्थापना करणे.
11. ग्रामीण व कुटिरोद्योगांना प्रोत्साहन देणे.
12. आधुनिक पद्धतीने कृषिविकास व पशुसंवर्धनाचे व्यवसाय करणे.
13. दारुबंदीची हमी देणे.
14. शास्त्रीय पद्धतीने कृषिविकास करण्याची हमी देणे.