सेतूबंध हा कार्यक्रम वैज्ञानिक,अचूक आणि वस्तुनिष्ठ असला पाहिजे.तो एक प्रक्रिया म्हणून न घेता, मागील वर्गातील अध्ययन आणि पुढील वर्गातील अध्ययन यांना जोडण्याचा प्रयत्न असावा आणि विद्यार्थ्याची प्राप्त सामर्थ्ये समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समस्या विद्यार्थ्यामध्ये किंवा शिक्षकांमध्ये असू शकते.ती समस्या किंवा कमतरता शोधण्याचे प्रयत्न सेतुबंधासारख्या कार्यक्रमाने शक्य झाले पाहिजे.त्यामुळे ही प्रक्रिया अधिक बळकट केली पाहिजे.या संदर्भात सेतुबंधाचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले तर काही अध्ययनातील अडथळे टाळता येतील आणि अध्ययनाची सोय करता येईल.
सेतूबंध म्हणजे काय?
सद्या शिकण्यास आवश्यक अध्ययनांश किंवा अध्ययन निष्पत्तीस संबंधीत पूरक अध्ययन सामर्थ्य किंवा अध्ययनांश जोडणे.मुलांची शिकण्याची पातळी, त्यांची क्षमता ओळखणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करणे हा एक क्रियाकलाप आहे. थोडक्यात मुलांनी जे शिकले आहे आणि जे शिकत आहेत त्यात परस्परसंबंध निर्माण करणे म्हणजे सेतुबंध म्हणता येईल.
सेतुबंधचे टप्पे कोणकोणते? (Steps of bridge course)
⇒`नैदानिक (पूर्व) परीक्षे’चे नियोजन आणि आयोजन
⇒प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाचे /अध्ययन कमतरतेचे विश्लेषण करणे.
⇒परिहार बोधन नियोजन आणि अंमलबजावणी
⇒साफल्य परीक्षेद्वारे पुन्हा एकदा प्राप्त सामर्थ्य तपासणे.
⇒येथे प्रामुख्याने नैदानिक (पूर्व) परीक्षा आणि साफल्य परीक्षा अशी दोन साधने आहेत.सेतुबंध कार्यक्रमानंतर ज्या विद्यार्थ्याने क्षमता गाठली नाही,अशा विद्यार्थ्याना निरंतर परिहार बोधन अध्यापनाचे नियोजन करावे.
सेतुबंध कार्यक्रम
इयत्ता – आठवी
विषय – मराठी
पूर्व परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका
1 जूनपासून शाळा सुरू झाली.रमेश आणि रहीम यांनी शाळेत आल्यावर
त्यांनी इमारत,फळा,पेन,वही,शिक्षक,
शिक्षिका, खेळाचे मैदान,पाठ्यपुस्तक,वर्गखोली,टेबल,खुर्च्या,दप्तर इत्यादी गोष्टींची यादी केली आणि वर्ग शिक्षकांना
दाखवली.
वरील उतारा वाचून खालील प्रश्नाचे उत्तर
लिहा.
1.खालीलपैकी शाळेशी संबंधित नसलेला शब्द
ओळखा.
अ. खेळाचे मैदान
ब. नांगर
क. पुस्तक
ड. पेन
2. खालील चित्राचे निरीक्षण करून गटात न
जुळणारा शब्द लिहा.
अ.छत्री
ब.इमारत
क.धान्य
ड.पुस्तक
3. खालील म्हण पूर्ण करा.
गाढवाला..………. चव काय.
अ. साखरेची
ब.पेढ्याची
क.गुळाची
ड.चहाची
4. सगळीकडे आहे,जाणवते पण दिसत नाही. (कोडे पूर्ण करा.)
अ. पाणी
ब.सूर्य
क.माती
ड.हवा
5.वडिलांना पत्र लिहिताना काय संबोधित कराल.
अ.माननीय
ब.आदरणीय
क.तीर्थरूप
ड.प्रिय
6. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरा.
1. योग्य चित्रावर ………… करा. (खून /खूण)
7.दिलेल्या चित्रासाठी तुम्ही कोणता सूचना
फलक सुचवाल.
अ. रांगेत या.
ब.धोका आहे.
क.झेब्रा क्रॉसिंग वरून चाला. क्रॉस
ड.वाहने सावकाश चालवा,
9. तुमच्या मित्राला “ईमेलद्वारे
माहिती” पाठवताना सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे?
अ. प्रेषकाचा ई-मेल पत्ता
ब. इंटरनेट
क.घरचा पत्ता.
ड. प्राप्तकर्त्याचा ईमेल पत्ता
10. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही कोणती
चांगली सवय लावून घेऊ शकता?
अ.रोज मालिका पाहणे.
ब. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरणे.
क. जोरात दुचाकी चालवणे.
ड.शाळेत वेळेवर उपस्थित राहणे.
11.आपण सार्वजनिक कार्यालयात आपण खालीलपैकी
कोणती गोष्ट पाहतो?
अ. सूचना फलक
ब. सर्वांना प्रवेश
क. लोकांची गर्दी
ड. वरील सर्व
12. मेघानेही यावे डुलत झुलत. अधोरेखित शब्दांचे वैशिष्ट्ये ओळखा,
अ. समान शब्द
ब. विरुद्धार्थी शब्द
क. यमकबद्ध शब्द
ड. समानार्थी शब्द
13. आई – अरे, बंडू काय शोधतोय ?
बंडू – माझं दप्तर शोधतोय ?
आई – यावेळी दप्तर घेऊन तू काय अभ्यास करणार आहेस ?
बंडू – अग,दप्तरात माझा चेंडू आहे.
(हे खालीलपैकी काय आहे?)
अ.कथा
ब. कविता
क.संवाद
ड.नाटक
14. खालीलपैकी कोणते गद्य साहित्याचे उदाहरण
आहे.
अ. लोकगीत
ब. कादंबरी
क. कविता
ड. यापैकी नाही
15.वरील जाहिरात कोणत्या पदार्थाची विक्रीशी
संबंधित आहे?
अ. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
ब. कापड उत्पादने
क. प्लास्टिक उत्पादने
ड.बिस्कीट जाहिरात
16.धूम्रपानाचा होणारा दुष्परिणाम कोणता?
अ.श्वसन आणि कर्करोग यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरते.
ब.आरोग्य सुधारते.
क.विक्रेत्यांना ज्यादा फायदा होतो.
ड. मनाला आनंद मिळतो.
17.उतारा वाचा आणि खालील
प्रश्नाचे उत्तरे लिहा.
शिवाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळील
शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे पालन पोषण आई जिजाऊंनी केले. त्यांनीच त्यांना
युद्धकला शस्त्रास्त्र विद्या शिकविली. शिवाजी महाराजांनी पश्चिम घाटातील
मावळ्यांना एकत्रित करून त्यांना गनिमी युद्धनीतीचे शिक्षण देऊन आपले मावळे तयार
केले. सर्वप्रथम महाराजांनी आदिलशाहीच्या अधीन असलेला तोरणा किल्ला जिंकून घेतला.
नंतर रायगड, सिंहगड,
प्रतापगड इत्यादी किल्ले जिंकून घेतले. यामुळे क्रोधीत
झालेल्या विजापूरच्या आदिलशहाने महाराजांना मारण्यासाठी अफजलखानाला पाठविले.
महाराजांनी चपळाईने व्याघ्रनखांनी त्याचा वध केला.
प्रश्न –
1. शिवाजी महाराजांनी प्रथम
कोणता किल्ला जिंकला?
18, तुमचा मित्र तुम्हाला रमजानसाठी त्याच्या
घरी बोलावतो तेव्हा तुम्ही काय करता?
अ. त्याच्या घरी जाता.
ब. त्याला रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देता.
क. त्यांच्या सणाचे वैशिष्ट्य जाणून घेणे आणि त्यांचा आदर
करता.
ड.वरील सर्व.
19. आपल्या मुलग्याचा कंजूषपणा पाहून बाबा
म्हणाले, “माणसाने
झाडांप्रमाणे परोपकारी रहावे.दानधर्म करावा.”
वरील परिस्थितीत बाबांना सांगितलेले शब्द काय दर्शवतात?
अ.कोडे
ब.बोध
क.कथा
ड.कविता
20.सतीश उद्या आजीच्या घरी….
अ.जाणार आहे.
ब.गेला होता.
क.जाते
ड.गेला
प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करा.
अधिकृत कन्नड साहित्य पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… – CLICK HERE