दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिनांक 11.04.2024 ते 28.05.2024 पर्यंत राज्यातील शाळांना सुट्टी असेल या कालावधीत विद्यार्थी सुट्टीची मजा करण्यासोबत अभ्यासाची गोडी कायम रहावी यासाठी दिवसातील अगदी थोडा वेळ देऊन हा अभ्यास करतील अशी अपेक्षा ठेवून हा सुट्टीतील अभ्यास देण्याचा प्रयत्न करीत आहोत.पालकांनी आपल्या मुलांना मदत करून हा अभ्यास करून घेण्यास मदत करावी..
विषय – उन्हाळी सुट्टी अभ्यास
माध्यम – मराठी
इयत्ता – 2री ते ७वी
विषय – मराठी,कन्नड,इंग्रजी,गणित,विज्ञान,समाज विज्ञान,कार्यानुभव,परिसर अध्ययन
सुट्टीतील अभ्यास म्हणजे विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस वार्षिक परीक्षेत झालेल्या किरकोळ चुका,राहिलेल्या कमतरता शोधून काढून त्यावर मात करण्यासाठी पुनरावलोकन करण्यासाठी सुवर्णसंधी असते.सुट्टीतील काही तास विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचा ज्ञानाचा पाया तयार करण्यासाठी मदत करतात.पुढील शैक्षणिक वर्षात नवीन संकल्पना समजून घेण्यास या अभ्यासाची मदत होते.विद्यार्थी असोत किंवा नोकरी करणारे लोक यांच्यासाठी सुट्टी हा वास्तविक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. उजळणी करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी प्रत्येकाला सुट्टीची गरज असते.सुट्ट्या फक्त त्यांच्यासाठी योग्य आहेत.प्रत्येकजण सुट्टीची वाट पाहत असतो,विशेषत: विद्यार्थ्यांसाठी विश्रांती घेण्याची आणि आपल्या ज्ञानाची उजळणी व अवलोकन करण्याची ही संधी असते.या सुट्टीनंतर विद्यार्थी उत्साही आणि प्रेरित होऊन वर्गात परत येतात.या काळात आराम करणे,खेळणे,दंगा,मस्ती करणे महत्त्वाचे असले तरी,या सुट्टीचा सदुपयोग करून सुट्टीतील इतर गोष्टींबरोबर अभ्यासाची योग्य योजना आखल्यास विद्यार्थी जेंव्हा सुट्टीनंतर शाळेत येतील तेंव्हा शाळेतील अभ्यासाचे नियोजन करण्यास सोपे जाईल.
सुट्टी म्हणजे विद्यार्थ्याला नवीन कांहीतरी शिकण्याची संधी असते म्हणून या उन्हाळी सुट्टीत आपल्या पाल्याला खेळ,दंगा,मस्ती बरोबरच अभ्यासाची सवय लागावी या उद्देशाने हा सुट्टीतील अभ्यास देत आहोत.आपण दिवसातील थोडा वेळ आपल्या पाल्यासाठी देऊन हा अभ्यास करण्यास त्याला मदत करून सहकार्य करावे.ही.प्रेमाची सक्ती फक्त आपल्या पाल्यासाठी..!!
(क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र,अथणी यांच्याकडून निर्मित सुट्टीतील अभ्यासाचा संदर्भ घेतल्याने हा अभ्यास तयार करण्यास खूप मदत मिळाली त्याबद्दल सदर अभ्यास तयार करण्यास कष्ट घेतलेल्या सर्व शिक्षकांचे आभार.)
(सोबत PDF लिंक दिल्याने विद्यार्थ्यांना याची PRINT काढून देणे सोपे जाईल..)
वर्गवार उन्हाळी सुट्टी अभ्यासाची लिंक खालीलप्रमाणे..
| |
| |
| |
|
(संदर्भ – क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालय व क्षेत्र संपन्मुल केंद्र,अथणी. यांच्याकडून निर्मित सुट्टीतील अभ्यास)