1 मे महाराष्ट्र दिन / 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्त भाषणे,माहिती,स्फूर्ती गीते,सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन इत्यादी..
1 मे महाराष्ट्र दिन
1 मे हा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली. तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे. महाराष्ट्राचा धार्मिक सुधारणांचा, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी आहे. राज्याचे विविधांगी भावविश्व् थक्क करणारे आहे.
महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी, इतिहासकारांनी करुन ठेवले आहे. महाराष्ट्राचे महात्म्य वर्णन
करतांना राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज यांनी
मंगल देशा !
पवित्र देशा !
महाराष्ट्र देशा।
प्रणाम घ्यावा माझा हा,
श्री महाराष्ट्र देशा॥
राकट देशा,
कणखर
देशा,
दगडांच्या देशा ।
नाजुक देशा,
कोमल देशा,
फुलांच्याहि देशा ॥॥
अशा शैलीदार ओळी वापरल्या आहेत.
– आशिष अनिल देशपांडे (सर)
राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक
कॉल व व्हॉट्सअॅप – 9021481795
1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन
आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन ) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.
कामगार दिन कसा सुरू झाला?
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती.
कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
– आशिष अनिल देशपांडे (सर)
राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक
कॉल व व्हॉट्सअॅप – 9021481795
यावर्षीचा कामगार दिन / महाराष्ट्र दिन खास बनविण्यासाठी या दिवसांचे कार्यक्रम थाटात साजरे करण्यासाठी आवश्यक भाषणे,माहिती,स्फूर्ती गीते,सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन इत्यादी साठी उपयुक्त pdf उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
– आशिष अनिल देशपांडे (सर)
राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक
कॉल व व्हॉट्सअॅप – 9021481795
1.महाराष्ट्र दिन माहिती – डाऊनलोड
2.जागतिक कामगार दिन माहिती – डाऊनलोड
3.महाराष्ट्र दिन भाषण – डाऊनलोड
4.जागतिक कामगार दिन भाषण – डाऊनलोड
5.महाराष्ट्र दिन सुत्रसंचालन 1 – डाऊनलोड
6.महाराष्ट्र दिन सुत्रसंचालन 2 – डाऊनलोड
7.महाराष्ट्र दिन सुत्रसंचालन 3 – डाऊनलोड
8.महाराष्ट्र दिन स्फूर्तीगीते – डाऊनलोड
9.1 मे महाराष्ट्र दिन – डाऊनलोड
10.1 मे महाराष्ट्र यशोगाथा – डाऊनलोड
11.महाराष्ट्र दिन काव्य स्पर्धा – डाऊनलोड
सूत्रसंचालन व भाषण कोर्स च्या उन्हाळी Batch ची नोंदणी आजपासून सुरु होत आहे. ज्यांना हे कोर्स करायचे असतील त्यांनी मला मेसेज करावा.
उन्हाळ्याच्या या दिवसात सूत्रसंचालन व भाषणाचे कौशल्य प्राप्त करुन आपल्या व्यक्तिमत्वाच विकास घडवण्याची सुवर्णसंधी.
श्री. आशिष देशपांडे
9021481795
राज्यस्तरीय सूत्रसंचालन् व सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शक
शिवजयंती भाषणे,सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन व बरच कांहीं एकाच लिंकमध्ये..
https://www.smartguruji.in/2023/02/shivjayanti-shivaji-maharaj-jayanti.html
डॉ. आंबेडकर जयंती निमित्त भाषणे व सूत्रसंचालन
प्रत्येकाला समान समजणारे, प्रत्येकाला स्वतंत्रपणे आणि सुखाने जगण्यास शिकवणारे, ज्यांनी स्वातंत्र्य आणि समानतेचा नारा दिला.
असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
https://www.smartguruji.net/2023/04/dr-ambedkar-jayanti-speeches-and.html