जिल्हा बेळगावी माहिती व वैशिष्ट्ये
राज्य – कर्नाटक
कर्नाटकाचा नकाशा
कर्नाटक हे भारताच्या नैऋत्य भागात स्थित एक राज्य आहे.1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्रचना समितीच्या मंजुरीने कर्नाटक राज्याची स्थापना झाली.कर्नाटक राज्याला समृद्ध सांस्कृतिक वारसा
आहे आणि अनेक प्राचीन मंदिरे, स्मारके आणि ऐतिहासिक स्थळे येथे आहेत.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरू आहे,जी भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणूनही ओळखली जाते.बंडीपूर राष्ट्रीय उद्यान, नागरहोळे राष्ट्रीय उद्यान आणि बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानासह अनेक राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये कर्नाटकात आहेत. कर्नाटक राज्य कॉफीच्या लागवडीसाठी देखील प्रसिद्ध आहे आणि
भारतातील कॉफीचे सर्वात मोठे उत्पादक आहे. अशा या वैविध्यपूर्ण कर्नाटक राज्यात सद्या 31 जिल्हे आहेत.
कर्नाटकातील जिल्हे
1.बागलकोट 2.बल्लारी
3.बंगळुरु ग्रामीण 4.बेळगावी
5.बेंगळुरू शहर 6.बिदर
7.चामराजनगर 8.चिक्कबळ्ळापूर
9.चिक्कमंगळुरू 10.चित्रदुर्ग
11.दक्षिण कन्नड 12.दावणगिरी
13.धारवाड 14.गदग
15.हसन 16.हावेरी
17.कलबुर्गी 18.कोडगू
19.कोलार 20.कोप्पळ
21.मंड्या 22.म्हैसूरु
23.रायचूर 24.रामनगर
25.शिवमोग्गा 26.तुमकुरु
27.उडुपी 28.उत्तर कन्नड
29.विजयपुरा 30.विजयनगर
31.यादगीर
वरील 31 जिल्ह्यांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा असणाऱ्या बेळगावी जिल्ह्याची ओळख करून घेणार आहोत..
बेळगावी जिल्ह्याचा नकाशा |
बेळगावी जिल्ह्याला बेळगाव म्हणूनही ओळखले जाते.हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक शहर
आहे.बेळगावीचा इतिहास १२ व्या शतकापासूनचा आहे.बेळगावी हे रट्टा राजवंशाचा एक भाग होते. रट्टा राजवंशाने बेळगावचा किल्ला आणि कमल बसती यासारख्या सुंदर ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती केळी होती.बेळगाव शहरावर चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, आदिल शाही आणि मराठा यांसारख्या विविध राजवंशांनी राज्य केले.
ब्रिटिश राजवटीत बेळगावी हा बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत या शहराने महत्त्वाची भूमिका बजावली.1924 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन बेळगावी येथे झाले.या अधिवेशनाचे अध्यक्ष स्थानी
महात्मा गांधींजी होते.
बेळगावी जिल्हा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.हा जिल्हा कर्नाटक राज्याच्या वायव्य
भागात स्थित आहे.बेळगावीच्या उत्तरेस महाराष्ट्र राज्य आणि पश्चिमेस गोवा राज्याच्या सीमारेषा आहेत.
बेळगांव जिल्ह्याचे बेळगावी नामकरण –
बेळगावीसह 12 जिल्ह्यांच्या शहरांच्या नावाचा उच्चार कन्नड भाषेप्रमाणे असावा या उद्देशाने 2014 मध्ये कर्नाटक सरकारने बेळगावी जिल्ह्याचे नाव बदलून बेळगावी करण्याचा निर्णय घेतला.जिल्ह्याच्या नावात स्थानिक कन्नड उच्चार प्रतिबिंबित करण्यासाठी आणि कन्नड भाषेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नाव बदलण्यात आले.जिल्ह्यातील कन्नड भाषिक लोकांच्या दीर्घकालीन मागणीनंतर नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.1 नोव्हेंबर 2014 पासुन बेळगावी शहरासह खालील 12 शहरांची नावे बदलण्यात आली आहेत.
कर्नाटकातील 12 शहरांची नवीन नावे –
बेळगावी- बेळगावी,
विजापूर- विजापुरा
चिकमंगळुर- चिकमंगळुरु
बेंगलोर- बंगळुरु
मंगलोर- मंगळुरु
शिमोगा- शिमोग्गा
हुबळी- हुब्बळ्ळी
तुमकुर- तुमकुरु
बेल्लारी- बल्लारी
गुलबर्गा- कलबुर्गी
म्हैसूर- म्हैसुरू
होस्पेट- होस्पेटे
बेळगावी जिल्ह्याची महत्वाची वैशिष्ट्ये –
⇒बेळगावीचे मूळ नाव वेणुग्राम किंवा वेळुग्राम असे होते. (म्हणजे बांबूचे गाव)
⇒ बेळगावी जिल्हा कर्नाटकातील ‘साखरेची वाटी‘ म्हणून ओळखला जातो.
⇒बेळगावी जिल्हा निर्मितीचे वर्ष- 1 नोव्हेंबर 1956
⇒बेळगावी जिल्हा हा कर्नाटकातील सर्वात मोठा जिल्हा आहे (क्षेत्रफळाने)
⇒1924 मध्ये बेळगावी राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी होते.
⇒बेळगावी जिल्ह्यात सुवर्णसौध नावाची इमारत आहे (शिल्पी, के उदय) सुवर्णसौधच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कायकवे कैलास’ लिहिलेले आहे.
⇒बेळगावी जिल्हा हा सैन्यदलाचा पाळणा (cradle of infantry)म्हणून ओळखला जातो
⇒राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगावी जिल्ह्यात आहे.
⇒विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिव्हर्सिटी बेळगावी जिल्ह्यात आहे
⇒राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बेळगावी येथे आहे.
⇒बेळगावी जिल्ह्यात हिडकल धरण आहे, जे घटप्रभा नदीवर बांधले आहे.
⇒गोकाकचा धबधबा बेळगावी जिल्ह्यात आहे,हा धबधबा घटप्रभा नदीने तयार केला आहे.
⇒गोकाक धबधबा हा कर्नाटकचा नायगारा फॉल म्हणून ओळखला जातो, त्याची उंची 52 मीटर आहे.
⇒हेन्री कॅम्पबेल हे 1887 मध्ये गोकाक फॉल्स येथे जलविद्युत निर्मिती करणारे आशियातील पहिले होते.
⇒बेळगावी जिल्ह्यातील गोडचिनमल्की धबधबा मार्कंडेय नदीने तयार केला आहे.
⇒बेळगावी जिल्ह्यात वज्रपोहा धबधबा मांडवी (म्हादायी) नदीवर तयार करण्यात आला आहे.
⇒कळसा-भांडुरा धरण प्रकल्पाची सुरुवात बेळगावी जिल्ह्यातून झाली आहे.
⇒कळसा-भांडुरा धरण प्रकल्प गदग,धारवाड आणि बेळगावी या जिल्ह्यांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी आहे.
⇒हा कळसा-भांडुरा धरण प्रकल्प म्हादई नदीशी संबंधित आहे.
⇒कर्नाटक आणि गोवा राज्यांमध्ये म्हादई नदीचा वाद चालू आहे.
⇒⇒बेळगावी जिल्हा हा कर्नाटकातील सर्वात जास्त ऊस उत्पादक जिल्हा आहे.
⇒बेळगावी जिल्ह्यातील निप्पाणी तालुका तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध आहे.
⇒दुसरे जागतिक कन्नड साहित्य संमेलन 2011 मध्ये बेळगावी जिल्ह्यात पार पडले.
⇒बेळगावी जिल्ह्यातील खानापूर हे बॉक्साईट खनिजासाठी प्रसिद्ध आहे.
⇒संगोळी रायण्णा यांची समाधी बेळगावी जिल्ह्यातील नंदगड येथे आहे.
⇒कित्तूर राणी चन्नम्माची समाधी बेळगावी जिल्ह्यातील बैलहोंगल येथे आहे.
⇒गंगाधर देशपांडे यांनी एप्रिल 1930 मध्ये बेळगावी जिल्ह्यात मीठ विकून मिठाचा कायदा मोडला.
⇒बेळगावी जिल्ह्यात 14 तालुके आहेत. (अथणी, बैलहोंगल, बेळगावी, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, खानापूर, कागवाड, मुडलगी, निप्पाणी, कित्तूर, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती)
⇒गंगाधर देशपांडे यांनी बेळगावी जिल्ह्यात राष्ट्रीय विद्यालयाची स्थापना केली.
⇒हिंडलगा कारागृह बेळगावी जिल्ह्यात आहे.
⇒राजा लक्कमगौडा धरण बेळगावी जिल्ह्यात बांधलेले आहे जे घटप्रभा नदीवर बांधले आहे
⇒राजा लक्कमगौडा धरण हिडकल धरण म्हणूनही ओळखले जाते.
⇒सांबरा विमानतळ बेळगावी जिल्ह्यात आहे.
⇒बेळगावी येथे देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ (110 मीटर उंच)
⇒रेणुकासागर/नविलुतीर्थ/इंदिरा गांधी धरण हे बेळगावी जिल्ह्यातील मलप्रभा नदीवर बांधले गेले आहे,जे कर्नाटकातील सर्वात लहान धरण आहे. ते 1974 मध्ये बांधले गेले.
⇒बेंगळुरूनंतर सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा बेळगावी आहे.
⇒बेळगावीचा कुंदा प्रसिद्ध आहे.
⇒बेळगावी जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील यल्लम्मा मंदिरातील रेणुका मंदिर ही मूळची जैन वस्ती होती.
⇒सौंदत्तीचे पहिले नाव सुगंधावर्ती होते.
⇒रायबागचे पहिले नाव बागी किंवा रायबागी होते.
⇒गोकाकाचे पहिले नाव गोकागे किंवा गोकावी होते.
⇒हुक्केरीचे पहिले नाव हुविनकेरी होते.
⇒रामदुर्गचे पहिले नाव रायनदुर्ग होते.
⇒चिक्कोडी हे चिक्क कोडी (काठावर वाढलेले शहर) होते.
⇒कुबासा हे रामदुर्गचे प्रसिद्ध शहर आहे.
⇒गोकाकचे करदंट प्रसिद्ध आहे.
⇒सर्वात मोठी जत्रा म्हणजे सौंदत्तीची रेणुका यल्लम्मा जत्रा.
⇒मुडलगी हे शहर कर्नाटक राज्यातील गुरांचा बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
⇒हुक्केरीचे गायक बाळाप्पा हुक्केरी हे हजार गाण्यांचे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.
⇒हिडकल धरण बांधणारे शिल्पकार एस. जी. बाळेकुंद्री.
⇒व्हेगा (Vega) ही बेळगावी येथील प्रसिद्ध हेल्मेट कंपनी आहे.
⇒कृष्णा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, मार्कंडेय, हिरण्यकेशी या नद्या बेळगावी जिल्ह्यात वाहतात.
⇒ज्ञानपीठ पुरस्कार विजेते चंद्रशेखर कंबार हे बेळगावी जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथील आहेत.
⇒बसवराज कट्टीमणी, ईश्वर सनकल, चंद्रशेखर कंबार, बेतागेरी कृष्णशर्मा, बी.ए. सनदी, अकबर अली, डी.एस. कार्की, डी.सी.पावते शंभा जोशी, अभिनेता चरणराज, अभिनेता अतुल कुलकर्णी, क्रिकेटर रोनिता मोरे हे बेळगावीचे आहेत.