Assessment – March 2023 Model Key Answer
STATE – KARNATAKA
BOARD – KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD
Deaprtment – DEPARTMENT OF SCHOOL EDUCATION & LITERACY
Class: 5
Subject: ENVIRONMENT STUDIES
EXAM DATE – 29.03.2023
विद्यार्थ्यांना सूचना -:
1 मुखपृष्ठावरील माहिती सुरुवातीलाच काळजीपूर्वक वाचून भरावी.
2. प्रश्न लक्षपूर्वक वाचून अर्थ समजून घ्यावा.
3. उत्तरासाठी दिलेल्या निर्धारित जागेतच उत्तरे लिहावित पुरवणी पेपर दिला जाणार नाही.
4. दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रश्नांची उत्तरे सुबक, स्पष्ट आणि सुवाच्य अक्षरात लिहावित
1. खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी / अपूर्ण विधानांसाठी चार पर्याय दिले आहेत.
योग्य पर्याय निवडा आणि प्रश्न क्रमांक 1 ते 20 च्या पर्यायासह संपूर्ण उत्तर लिहा.20 x 1 = 20
1. कर्नाटकमध्ये सर्वाधिक कॉफी पिकवणारा जिल्हा:
A) कोप्पल
(B) कोलार
(C) कलबुर्गी
D) कोडगु
उत्तरः D) कोडगु
2. खाली दिलेल्या आकृत्यामध्ये पीक कापणीसाठी उपयोगी यंत्र :
उत्तर: विळ्याचे चित्र
3. या नैसर्गिक संसाधनाच्या अभावामुळे रस्त्याच्या मधोमध एक कार उभी आहे
(A) कोळसा
B) इंधन
C) माती
(D) खनिज
उत्तर: B) इंधन
4. शेतकऱ्याच्या गावात नेहमीच कमी पाऊस पडतो. त्याने निवडलेली पिके पुढीलप्रमाणे आहेत :
A) नाचणी, बाजरी
B) भात, ऊस
(C) नारळ, सुपारी
D) फळे आणि भाज्या
उत्तर: A) नाचणी, बाजरी
5. एक मुलगी म्हणते, माझे शेतकरी वडील कमी पाण्यामध्ये जास्त पीक घेतात.शेतकरी वापरत असलेली सिंचन पद्धत आहे.
A) पावसाच्या पाण्यावरील कृषी पद्धत
B) ठिबक सिंचन पद्धत
(C) सिंचनयुक्त शेती पद्धत
D) कूपनलिका सिंचन पद्धत
उत्तर: B) ठिबक सिंचन पद्धत
6. एका बेकरीवाल्याने अन्नपदार्थ तयार करण्यासाठी ही वनस्पतीजन्य सामग्री वापरली
A) सुके खोबरे
(B) अंडी
C) तूप
(D) दुध
उत्तरः A) सुके खोबरे
7. दुष्काळी काळात घेतलेल्या पिकांवर सेमिनारमध्ये चर्चा झाली. चर्चेमध्ये नसलेले पीक,
(A) नाचणी
C) वरई
B) कांगणी
D) भात
उत्तर: D) भात
8. शरीराच्या वाढीसाठी अधिक सोयाबीन खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. कारण त्यात हे जास्त प्रमाणात आहे.
A) कर्बोदके
(B) लिपिड
(C) प्रथिने
(D) जीवनसत्व
उत्तर: (C) प्रथिने
9. मी कर्बोदकाच्या स्वरुपात ऊर्जा प्रदान करतो. कमी वापरली तरी जास्त ऊर्जा प्रदान करते. म्हणून माझे नाव आहे.
A) जीवनसत्व
B) प्रथिने
C) लिपिड
D) खनिजे
उत्तर – C) लिपिड
10. द्रव अवस्थेची योग्य जोडी आहे :
A) पुस्तक – पेन
C) उदबत्तीचा धूर – पाणी
B) ताक – दूध
D) प्लास्टिकची बाटली – रस
उत्तर: B) ताक – दूध
11. वस्तू आणि तिचे गुणधर्म दाखवणारी योग्य जोडी :
(A) वीट मऊ आणि पाण्यात बुडणे
B) कापूस जड आणि पाण्यावर तरंगणे
C) रस कठीण आणि द्रवाप्रमाणे वाहणे
D) चुनखडी कठीण आणि बुडणे
उत्तरः D) चुनखडी कठीण आणि बुडणे
12. पाण्याने पूर्णपणे भरलेल्या टाकीत आणखी पाणी टाकले जाते. परिणामासाठी पदार्थाचे वैशिष्ट्य म्हणजे द्रव
(A) जागा व्यापते.
B) वस्तुमान आहे.
D) रेणू एकमेकांशी सैलसर बांधलेले असतात.
(C) नेहमी बाहेर पडतो.
उत्तर: (A) जागा व्यापते.
13. हे संपूर्ण घरात हवेत पसरते असे याचे वैशिष्ट्य आहे.
उत्तर: A) उदबत्ती आणि धुराचा दरवळ हे चित्र
14. आईने एका भांड्यात असलेले दूध एका ग्लासमध्ये ओतले आणि आपल्या मुलीला दिले. मुलीने द्रवाबाबत विचार केलेले योग्य विधान असे आहे.
A) निश्चित आकार, त्या पात्राचा आकार व्यापत नाही.
B) कोणताही निश्चित आकार नाही, त्या पात्राचा आकार घेत नाही.
C) कोणताही निश्चित आकार नाही, त्या पात्राचा आकार घेते.
D) निश्चित आकार, त्या पात्राचा आकार घेते.
उत्तर: C) कोणताही निश्चित आकार नाही, त्या पात्राचा आकार घेते.
15. भारताच्या नकाशामध्ये कर्नाटक या बाजूला स्थित आहे.
A) उत्तरेला
B) दक्षिणेला
C) ईशान्येला
(D) वायव्येला
उत्तरः B) दक्षिणेला
16. एकाच आकारमानाचे दोन प्लास्टिक पाईप्स असताना एकपाईप दुसन्या पाईपच्या आत घालण्याची योग्य पद्धत,
A) पाईप गरम करणे आणि विस्तार करणे.
B) पाईप कापणे.
C) पाईप थंड करणे आणि संक्षेपण करणे.
D) पाईप्सवर डिंक लावणे.
उत्तर: A) पाईप गरम करणे आणि विस्तार करणे.
17. जास्त मल्याळम भाषिक लोक असलेले राज्य:
A) केरळ
(B) तेलंगणा
C) तामिळनाडू
(D) गोवा
उत्तर: A) केरळ
18. हा भारताच्या शेजारी असलेला आग्नेयेकडील देश आहे.
A) पाकिस्तान
B) भूतान
C) श्रीलंका
D) नेपाळ
उत्तर:C) श्रीलंका
19. भारताच्या पश्चिमेला असलेला समुद्र :
A) अरबी समुद्र
C) हिंद महासागर
B) बंगालचा उपसागर
D) प्रशांत महासागर
उत्तर:A) अरबी समुद्र
20. हा केंद्रशासित प्रदेश आहे.
A) आंध्र प्रदेश
B) महाराष्ट्र
C) पाँडेचेरी
D) त्रिपुरा
उत्तर: C) पाँडेचेरी
॥ प्रश्न 21 से 28 यांची
उत्तरे दिलेल्या जागेत लिहा :
उत्तरे दिलेल्या जागेत लिहा :
21. दिलेल्या नैसर्गिक संसाधनांमध्ये वर्तुळात
पुनर्भवी संसाधने आणि आयतामध्ये अपुनर्भवी संसाधने लिहा.
पुनर्भवी संसाधने आणि आयतामध्ये अपुनर्भवी संसाधने लिहा.
कोळसा, पाणी, सोने, माती, पैट्रोल, वन्य प्राणी, जंगल, जीवाश्म इंधने 2 मार्क
उत्तर:
किंवा
दिलेल्या पदार्थांमधील
संयुगे वर्तुळात लिहा आणि मिश्रण आयतामध्ये लिहा
संयुगे वर्तुळात लिहा आणि मिश्रण आयतामध्ये लिहा
पाणी, माती, साधे मीठ, साखर, हवा. कार्बन-डाय-ऑक्साइड, समुद्राचे पाणी, मिठाचे द्रावण
उत्तरः
22. मातीचे चार उपयोग लिहा. 2 मार्क
उत्तर – मातीचे चार उपयोग
वनस्पतींची वाढ व विकास होण्यासाठी
घर बांधणीसाठी
मडकी, बाहुल्या, मुर्ती तयार करण्यासाठी
विटा, कौल तयार करण्यासाठी.
निसर्गोपचार पद्धतीमध्ये उपचारासाठी
जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी
(प्रत्येक अंशाला अर्धा मार्क 4* 1/2 = 2)
किंवा
सौरऊर्जेवर चालणाऱ्या चार उपकरणांची नावे लिहा.
उत्तर:
सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांची नावे
• सौरदीप
• सोलार कुकर
• सौर वाहने
• सोलार हीटर
• सौर चुल
• सोलार विद्युत जनित्र
• सोलार मॅप
(प्रत्येक अंशाला अर्धा मार्क 4Ðअर्धा गुण = 2)
23. आपल्याला ऊर्जेसाठी आवश्यक असलेले कोणतेही चार खाद्यपदार्थ लिहा. 2 मार्क
उत्तर: ऊर्जेसाठी आवश्यक असलेले 4 खाद्यपदार्थ
• तांदूळ
• बटाटे
• गहू
• मका
• ज्वारी
• गोड पदार्थ
• तृणधान्ये बाजरी,
• नाचणी इ.
(कोणतेही 4 पदार्थ 4 Ðअर्धा गुण = 2)
किंवा
सामुदायिक
घरे म्हणजे काय? त्याचे कोणतेही दोन फायदे लिहा.
घरे म्हणजे काय? त्याचे कोणतेही दोन फायदे लिहा.
उत्तर:
सामुदायिक घरे – एकाच जागेवर अनेक मजली इमारत निर्माण करून जास्त कुटुंब एका ठिकाणी रहाण्यासाठी तयार करण्यात आलेली संकुले म्हणजेच सामुदायीक
घरे होत.
घरे होत.
• कमीत कमी जागेत जास्त लोक राहू शकतात.
• रस्ता,सुरक्षा, पार्किंग पथदीप दृष्टीने अनुकूल
• आरोग्य आणि सांडपाण्याची व्यवस्था योग्यरितीने
• जिवनावश्यक-पाणी, तरकारी किराणा कचरा निर्मुलन, विद्युत
• मनोरंजन आणि सांस्कृतिक दृष्ट्या अनुकूल
24. आपल्या शरीराला सर्व पोषक तत्वांची गरज का असते? 2 मार्क
उत्तर:
• शरिराला पोषक तत्त्वांची गरज
• शक्तीसाठी
• वाढीसाठी
• विकासासाठी
• आरोग्यासाठी
• शरीराची झीज भरून काढण्यासाठी
• शरीर निर्माण
• शरीर नियंत्रणासाठी
किंवा
हिमालयाला आपल्या देशाच्या संरक्षण भिंती म्हणतात. का?
उत्तर:
• हिमालय पर्वत रांगा – संरक्षक भिंती
• उत्तर ध्रुवाकडून येणारे अनिश्चित वारे अडविले जातात.
• मान्सून वारे थोपवून पटल्यामुळे पाऊस समाधानकारक होतो.
• उंच शिखरे, नैसर्गिक रित्या अनानुकुल प्रदेश यामुळे
• उत्तरेकडून होणारी शत्रुधी आक्रमणे रोखता येतात.
25. भारतातील कोणतीही दोन दक्षिणेकडील राज्ये आणि दोन
उत्तरेकडील राज्ये यांची नावे लिहा.2 मार्क
उत्तरेकडील राज्ये यांची नावे लिहा.2 मार्क
उत्तर –
• दक्षिणेकडील राज्ये→ केरळ, तमिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश,गोवा,तेलंगणा,महाराष्ट्र
• उत्तरेकडील राज्ये→ पंजाब, हिमाचल प्रदेश, जमू व काश्मिर, हरियाणा,उत्तर प्रदेश,राजस्थान
किंवा
भारतातील उत्तरेकडील मैदाने आणि वाळवंटे यांच्या वैशिष्ट्यांमधील दोन फरक
लिहा.
लिहा.
उत्तरः
भारतातील उत्तरेकडील मैदाने
• दाट लोकवस्ती
•सतत वाहणाऱ्या नद्या
• उत्पादक भूप्रदेश
• दमट हवामानाचा प्रदेश
वाळवंटी प्रदेश
• विरळ लोकवस्ती
•नद्या नसतात.
• नापीक जमीन
• उष्ण हवामानांचा प्रदेश
26. आपण जंगलाचे संरक्षण का करायचे?3 मार्क
उत्तरः
• जंगलांचे संरक्षण का करावे ?
• जंगलापासून आपल्याला
• घरे बांधण्यासाठी लाकूड मिळते.
• औषधी वनस्पती मिळतात.
• फळे मिळतात
• डिंक मिळतो.
• मध मिळतो
• विविध फुले मिळतात
• जमिनीची धूप थांबते शुद्ध हवा मिळते.
• वन्यप्राण्यांचे निवासस्थान आणि त्यांचे संरक्षण
• विविध वनस्पतीचे संरक्षण व संवर्धन होते.
• परिसरातील समतोल राखला जातो.
• समाधानकारक पाऊस पडतो.
किंवा
दिलेल्या परिस्थितीचे निरीक्षण करा. या वर्तमान उर्जेच्या स्त्रोतासाठी पर्यायीपणे वापरलेले उर्जेचे पूर्वीचे स्त्रोत लिहा.
A) बस मध्ये प्रवास करत आहे
B) LPG वापरून स्वयंपाक करत आहे
C) प्रकाश वापरत असलेला बल्ब
उत्तरः
A)बस प्रवास – चालत प्रवास, बैलगाड्यांचा वापर घोडेस्वारी,टांगा इ.
(B) LPG – स्वयंपाक लाकूड, पाला-पाचोळा, शेनी सरपण इ. वापर
C) प्रकाशासाठी (Bulb)– तेलाचे दीवे, मशाली
28. दिलेल्या भारताच्या नकाशत खालील राज्यांच्या राजधान्या चिन्हांकित करा. 4 मार्क
• बिहार
• गोवा
• तामिळनाडू
• गुजरात
उत्तर -:
किंवा
दिलेल्या
भारताच्या नकाशात खालील ठिकाणे चिन्हांकित करा.
भारताच्या नकाशात खालील ठिकाणे चिन्हांकित करा.
• हिमालयातील K2 पर्वत
• विंध्य पर्वत
• मुल्ल्यानगिरी
• गुरु शिखर
उत्तर -:
धन्यवाद..!
5वी व 8वी नमुना प्रश्नपत्रिका
5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…