Reporting of Errors in Evaluation of Class 5th, 8th and 9th Assessments for the year 2023-24.

Reporting of Errors in respect of Class 5th, 8th and 9th Assessments for the year 2023-24.

 विषय:- 2023-24 या वर्षातील 5वी,8वी आणि 9वी वर्गाच्या मूल्यमापनाच्या संदर्भात त्रुटींचा अहवाल देणेबाबत.

        वरील विषयाच्या संबंधात, कर्नाटक शाळेच्या KSQAAC द्वारे 2023-24 या वर्षाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या इयत्ता 5, 8 आणि 9 मधील विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यांकन-2 (SA-2) आयोजित केले गेले होते. उपनिर्देशक कर्नाटक शाळा परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या KSQAAC तर्फे घेण्यात आली आहे. उल्लेखित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मूल्यमापनाचे कार्य करण्याची संपूर्ण जबाबदारी उपानिर्देशक (अभिवृद्धी) यांची होती.ब्लॉक स्तरावरील मूल्यमापन निर्धारित तारखेच्या आत पूर्ण करून उत्तरपत्रिका संबंधित शाळांना परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
सध्या इयत्ता 5 वी, 8 वी आणि 9 वी च्या मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिका संबंधित शाळांना पाठवण्यात आल्या आहेत. पण त्यामध्ये बरोबर उत्तरे लिहूनही योग्य गुण न देणे, चांगले वाचन करणाऱ्या मुलांना कमी गुण देणे, मिळालेल्या गुणांची बेरीज चुकीची करणे
,काही विषयांतील कमाल गुणांपेक्षा अधिक गुण मिळणे अशा चुकांची प्रकरणे समोर आली आहेत अशी माहिती या खासगी शाळा संघटना कॅम्स वर्तमापत्राद्वारे दिली आहे.

या पार्श्वभूमीवर 2023-24 च्या इयत्ता 5, 8 आणि 9 वीच्या मुल्यांकनातील त्रुटींची कसून तपासणी करावी,आवश्यकता भासल्यास उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करावे आणि दोषींवर ज्या शिक्षकांनी योग्य मूल्यमापन केले नाही अशा शिक्षकांवर

योग्य ती कारवाई करावी आणि दिनांक 15.04.2024 पर्यंत या कार्यालयास अहवाल सादर करावा अशा सूचना उपनिर्देशक (अभिवृद्धी) यांना देण्यात आल्या आहेत.

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *