NCPI (NATIONAL PAYMENT CORPORATION OF INDIA) स्टेटस Active असे आल्यास विद्यार्थ्याचा आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे असा अर्थ होतो.
मागासवर्गीय कल्याण विभाग,अल्पसंख्याक कल्याण विभाग आणि कामगार कल्याण विभाग योजना अंतर्गत राज्य शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती वितरित केली जात आहे.पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यासाठी, विविध प्रवेश परीक्षांच्या उपस्थितीसाठी आणि इतर सरकारी (DBT) सेवा आणि लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक आणि आधारप्रमाणेच विद्यार्थ्याचे नाव SATS सॉफ्टवेअरमध्ये असणे आवश्यक आहे.
आधार कायदा,2016 च्या कलम 7 नुसार,सरकारी सुविधा मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (Verification) अनिवार्य आहे.त्यामुळे,सर्व सरकारी शाळा आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांनी संलग्न मार्गदर्शक तत्त्वांनुसार SATS सॉफ्टवेअरमधील माहितीसह आधार प्रमाणे विद्यार्थ्याच्या नावाची पडताळणी करणे आवश्यक आहे.
केंद्रीय आधार कायदा, 2016 चा पुढील आधार नियम 4(4)(b)(i) नुसार आधारचे प्रमाणीकरण हे ऐच्छिक संमतीवर आधारित आहे.त्यामुळे खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी आधार पडताळणीपूर्वी संमतीपत्र घेऊन आधार क्रमांक व आधारप्रमाणे नाव अद्यावत करणे आवश्यक आहे.
(SATS सॉफ्टवेअरमध्ये आधार संमती फॉर्म (Aadhar Consent Form)चा नमुना देण्यात आला आहे.)
विद्यार्थ्याचे SATS NAME आधार नावाशी जुळते की नाही हे जाणून घेण्यासाठी आधार पडताळणी प्रक्रिया आहे.ही विद्यार्थ्यांच्या नावाशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया नाही,ती आधारसाठीअर्जाची प्रक्रिया नाही.ही फक्त एक पडताळणी आहे.
SATS पोर्टल मध्ये स्टुडन्ट आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर निर्माण होणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे..
विद्यार्थ्याच्या आधार पडताळणीनंतर Name Match Score 100 आल्यास त्या विद्यार्थ्याचे नाव SATS मध्ये दुरुस्त करता येणार नाही तरी प्रथम शालेय रेकॉर्डप्रमाणे विद्यार्थ्याचे नाव बरोबर असल्याची खात्री करावी..
कांही विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरती फक्त नाव आणि आडनाव असल्याने त्यांचे आधार Verification Pending दाखवत आहे.