ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ
1 खालील
प्रश्नांना प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत त्यापैकी योग्य पर्याय निवडून उत्तर
लिहा. 2x1=20
1.बाळ घरात दुडूदुडू चालत आहे.
(या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.)
A.
बाळ
B.चालत
C.दुडूदुडू
D.आहे
2.आंबा
हा रसाळ फळ आहे. (या वाक्यातील ‘आंबा‘ याचे अनेकवचनी रूप
सांगा.)
A. आंब्या
B. आंबी
C. आंबे
D. आंबा
3. दमयंती
जानकी ती शीलास भूषविती (या
वाक्यातील ‘शील‘ याचा समानार्थी
शब्द कोणता?)
A.नम्र
B.चारित्र्य
C.प्रामाणिक
D.तारुण्य
4. पृथ्वी
सूर्याभोवती फिरते. (वाक्यातील काळ ओळखा.)
A. भूतकाळ
B. वर्तमान काळ
C. भविष्यकाळ
D. यापैकी नाही
5.त्या बाईनं अपमान केला त्यांचा.(या वाक्यातील ‘अपमान‘ या
शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा.)
A. मान
B. बक्षीस देणे
C. अभिनंदन
D. तिरस्कार
6.केलेले
उपकार जाणणारा – (या शब्दसमुहाबद्दल कोणता शब्द वापरला
जातो.)
A.कृतघ्न
B. उपकारी
C. कृतज्ञ
D. सदाचारी
7.नाचू
कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी | (या
वाक्यातील अलंकार ओळखा.)
A. यमक अलंकार
B. श्लेष अलंकार
C. अनुप्रास अलंकार
D. उपमा अलंकार
8.स्वतः
कष्ट न करता फायद्याची गोष्ट पदरात पाडून घेणे. (या अर्थाची म्हण कोणती?)
A. उचलली जीभ लावली टाळ्याला
B. आयत्या बिलात नागोबा
C. करावे तसे भरावे
D.दुष्काळात तेरावा महिना
9.खूप
आरडा ओरड करणे. (या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?)
A. अंगाचा तिळपापड होणे.
B. आकाश पाताळ एक करणे.
C. ‘ग’ ची बाधा होणे
D. कणिक तिंबणे
10. ‘ ‘ या चिन्हास एकेरी अवतरण चिन्ह म्हणतात तर ; या चिन्हास काय म्हणतात.
A. अपूर्ण विराम
B. स्वल्प विराम
C. संयोग चिन्ह
D. अर्ध विराम
11. विनोबा
भावेंना …….. भाषा येत असत.
A. चौदा
B. पंधरा
C. सोळा
D. सतरा
12. माझी
मुक्ताई मुक्ताई
दहा वर्षाचे लेकरू
चांगदेव योगीयान
तिला मानला रे गुरु
मुक्ताईला गुरु कोणी मानले?
A .
ज्ञानेश्वरांनी
B.
सोपानदेवांनी
C.देवानी
D.
चांगदेवांनी
13.काळी काळी कृश देह
ती असे माझी माय
वणवण सकाळपासून
मोळीसाठी रानात जाई
माय सकाळपासून वणवण का करत आहे?
A.
पाण्यासाठी
B.
मोळीसाठी
C.
अन्नासाठी
D. यापैकी
नाही
14. पोवाडा गाणाऱ्यास काय म्हणतात?
A. शाहीर
B. गायक
C. संगीतकार
D. कवी
15. 25 डिसेंबर या दिवशी कोणत्या सणानिमित्त
सुट्टी जाहीर केळी जाते?
A. स्वातंत्र्य दिन
B. गांधी जयंती
C. बालदिन
D. ख्रिसमस
16. सुवर्ण
मंदिर कोठे आहे?
A. जालंदर
B. चंदीगड
C. अमृतसर
D. कानपूर
17. ‘नागपंचमी‘ हा सण कोणत्या
मराठी महिन्यात साजरा केला जातो?
A. फाल्गुन
B. श्रावण
C. मार्गशीर्ष
D. वैशाख
18. लावणी
– महाराष्ट्र
भांगडा – पंजाब
यक्षगान –
……….
A. पंजाब
B. कर्नाटक
C. केरळ
D. आंध्रप्रदेश
19. अपघाताचे
कारण हे असू शकते.
A. हेल्मेट वापरणे.
B. तुफान वेगाने गाडी पळवणे.
C. सीट बेल्ट वापरणे.
D. वाहतुकीचे नियम पाळणे.
20. ज्ञानेश्वरी
, तुकारामांची गाथा , स्वामी , दासबोध
A. ज्ञानेश्वरी
B. दासबोध
C. स्वामी
D. तुकारामांची गाथा
दोन – तीन वाक्यात उत्तरे लिहा.
21. तुम्हाला माहीत असलेल्या नृत्यांची नावे
लिहा. 2 गुण
22. शिक्षणाचे महत्त्व याबद्दल चार ओळी
टिप्पणी लिहा. 2 गुण
23. लोकनृत्य म्हणजे काय? 2 उदाहरणे लिहा. 2 गुण
24. तुम्हाला माहित असलेल्या कोणत्याही पाच
देशभक्ती गीतांची नावे लिहा. 2 गुण
25. गोलातील शब्द वापरून वाक्प्रचार तयार करा.
III पाच ते सहा वाक्यात
उत्तरे लिहा.
26.
तुम्ही अनुभवलेल्या एखाद्या सहलीचे वर्णन सांगणारे पत्र
तुमच्या लहान भावास लिहा.3 गुण
27. चित्र पाहून पाच ओळी माहिती लिहा.
28. अगा
वैकुंठीच्या राया। 4 गुण
अगा विठ्ठल सखया |
अगा नारायणा ।
अगा वसुदेवनंदना |
अगा पुंडलीक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ।
अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ।
या
कवितेच्या ओळींचा अर्थ लिहा.
आठवी मराठी विषयाची प्रश्नपत्रिका pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…
5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…