SSLC परीक्षा 2022-23 सराव प्रश्नपत्रिका 2
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
DESIGNED BY:- SHRI.SANJAY S.SHANDAGE (A.M.) G.H.S.DHONEWADI.
RANGE :- NIPPANI EDN.DIST :- CHIKODI
विषय –
समाज विज्ञान
1. खालील प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय
दिलेले आहेत. त्यापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 8X1=8
1. ४२व्या
घटनादुरूस्तीनुसार घटनेमध्ये कोणते शब्द सामील करण्यात आले ?
A)
निधर्मी व समाजवादी
B) लोकशाही व प्रजासत्ताक
C) सार्वभौम व प्रजासत्ताक
D) गणराज्य व अलिप्तवादी
2. दुसऱ्या जागतिक
महायुध्दा दरम्यान युध्द बंदीचा अनाक्रमण करार या देशात झाला.
A) अमेरिका व जपान
B) रशिया व जर्मनी
C) जर्मनी व फ्रान्स
D) इंग्लंड व रशिया
3. मुलींना
व अपंगांना या अभियानाद्वारे शिक्षणाची सोय झाली.
A)
राष्ट्रीय शिक्षण अभियान
B) सर्व शिक्षा अभियान
C) साक्षर भारत मोहिम
D) नविन शिक्षण धोरण
4. असंघटीत
कामगाराचे उदाहरण –
A)
सरकारी विभाग
(B) सैन्य
C) कृषी कामगार
D) विमा कंपन्या
5. अपारंपारिक शक्ती साधनाचे उदाहरण –
A)
पवन उर्जा
B) नैसर्गिक वायू
C) पेट्रोलियम
D) अणुशक्ती
6. भारताचे
सर्वात जुने व कृत्रीम बंदर
A)
नवे मंगळूर
B) हल्दिया
C) चेन्नई
D) कलकता
7. या
संस्थेद्वारे उद्योजकांना एक खिडकी एजन्सीद्वारे अनेक सुविधा देतात.
A)
इंडस्ट्रीयल इस्टेट्स
B) लघुउद्योग सेवा संस्था
C) औद्योगिक वसाहती
D) जिल्हा औद्योगिक केंद्रे
8. या
जर्मनीच्या कृषी वैज्ञानिकाने मेक्सिको देशात गहू उत्पादनाचा प्रयोग केला.
A)
डॉ. नारमन बोरगाल
B) किरण मुजुमदार शहा
C) डॉ. एम्.एस्. स्वामीनाथन
D) वर्गीस कुरीयन
२. खालील प्रश्नांची एका
वाक्यात उत्तरे लिहा. 8X1=8
9.
भाषावार प्रांत रचनेसाठी १९५३ मध्ये सरकारने कोणत्या
आयोगाची रचना केली ?
10. हिटलरने कोणत्या खाजगी सैन्याचे संघटन
केले ?
11. भारताने पंचशील तत्वांचा करार कोणत्या
देशाशी केला?
12. १९९२ मध्ये भारताने युनोच्या कोणत्या
करारावर स्वाक्षरी केली ?
13. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय ?
14. दक्षिण भारतातील कोयना हे कोणत्या
नैसर्गिक आपत्तीचे केंद्र आहे?
15. महसूल खर्च म्हणजे काय?
16. मल्लाप्पाला आपल्या मुलीच्या लग्नासाठी
भविष्यात पैशाची तरतूद करावयाची आहे,त्याला बँकेत कोणते खाते उघडावे लागेल?
3. खालील प्रश्नांची चार वाक्यात उत्तरे लिहा. 8X2=16
17.
प्रार्थना समाजाने केलेल्या कार्याची यादी करा.
18. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युध्दाची
अपयशाची कारणे लिहा.
19. जातीयवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या
सक्षम उपायांची आवश्यकता आहे ?
किंवा
अमेरिका व रशिया यांच्यातील द्विपक्षीय शस्त्र नियंत्रण
करार कोणते?
20. अस्पृश्यता ही आपल्या समाजातील अमानवी
प्रथा आहे,स्पष्ट करा.
किंवा
विकेंद्रिकरण कशाप्रकारे सक्षम करण्यात आले?
21. भारताच्या हवामानावर परिणाम करणारे घटक
कोणते?
22. कर्नाटकातील जल विद्युत उत्पादन
केंद्रांची चार नावे लिहा.
23. ग्रामीण भागातील लोकांचे शहराकडे होणारे
स्थलांतर कसे टाळता येईल?
24. ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कोणकोणते कायदे लागू करण्यात आले आहेत?
4. खालील प्रश्नांची सहा वाक्यात उत्तरे लिहा. 9X3=27
25.
पहिल्या कर्नाटिक युध्दाचे वर्णन करा.
26. स्वातंत्र्य चळवळीत कोडगूच्या
पुट्टबसप्पाचे योगदान कोणते?
27. पंतप्रधान नेहरू हे उद्योगशील आणि आधुनिक
भारताचे शिल्पकार होते. स्पष्ट करा.
28. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मुख्य शाखा
कोणत्या?
29. बेरोजगारीची कारणे कोणती?
30. पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व
किनारपट्टीतील फरक लिहा..
31. अरण्य संरक्षणाच्या पध्दतीची यादी करा.
किंवा
शेतीचे महत्व स्पष्ट करा.
३२. ग्रामीण भागातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कसे
टाळता येईल?
किंवा
भारतातील आर्थिक नियोजनाचे मुख्य उद्देश लिहा.
३३. बँक खाते उघडण्याचे फायदे कोणते?
किंवा
आर्थिक विकासामध्ये उद्योजक कोणती प्रमुख भूमिका निभावतात?
5. खालील प्रश्नांची आठ वाक्यात उत्तरे लिहा. 4X4 = 16
34.
बक्सारच्या लढाईची कारणे व परिणामांची यादी करा.
35. जमीनदारी पध्दतीबद्दल माहिती लिहा.
किंवा
ब्रिटीशांच्या महलवारी पध्दतीचे वर्णन करा.
36. भारतामध्ये आर्थिक असमानता ही वेगाने
वाढात आहे. कारणे लिहा.
37. मातीची धूप थांबविण्यासाठी कोणकोणत्या
योजना करता येतील ?
6. 38. भारताचा नकाशा काढून खाली दिलेली ठिकाणे दर्शवा. 1+4=5
अ) सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ
ब) तारापूर
क) विशाखापट्टण
ड) कैगा
DESIGNED BY:- SHRI.SANJAY S.SHANDAGE (A.M.) G.H.S.DHONEWADI.
RANGE: NIPPANI.
EDN.DIST:- CHIKKODI.
DOWNLOAD MODEL QUESTION PAPER IN PDF