5th MARATHI KALIKA CHETARIKE ANSWERS 5.10 5 वी मराठी अध्ययन कृती 10.1,10.2



 

इयत्ता पाचवी 

विषय – मराठी 


  >


 

अध्ययन निष्पत्ती- 5.10

अध्ययन निष्पत्ती 5:10 – विनोद साहस सामाजिक विषयांवर आधारित कथा कविता इत्यादींमधील विषय घटना चित्र पात्र शिर्षक याबद्दल चर्चा करतात व तार्किक स्वरूपात चिंतन करून निर्णय घेतात. नवीन अपरिचित शब्दांचा अर्थ शब्दकोशात शोधतात.

अध्ययन कृती – 10:1


• कोडी – उत्तरे शोध….

1) असे फळ कोणते ज्याच्चा त्याचा पोटात दात असतात.
उत्तर- डाळिंब

2) अशी कोणती गोष्ट आहे जी तुटल्यावर आवाज येतो पण पारदर्शक आहे.
उत्तर- काच

3) डोळा असून सुद्धा मी पाहू शकत नाही.
उत्तर- नारळ / मोरपीस

4) आपण कोणत्या प्रकारचा टेबल खाऊ शकतो.
उत्तर- वेजिटेबल

5) असा कोणता प्राणी आहे की जो आपली सर्व कामे नाकाने करतो.
उत्तर- हत्ती

>


 

विनोद


शिक्षिका: करण तू ग्रहपाठ का केला नाहीस.

करण: सॉरी मॅम

शिक्षिका: माझ्या शब्दकोशात सॉरी हा शब्द नाही. करण: लायब्ररी मधल्या शब्दकोशात नक्की असेल.


>


 

• जादूगर ही कविता घेऊन स्पष्ट करणे.
जादूगर कवितेवरील प्रश्नोत्तरांसाठी येथे स्पर्श करा..
https://www.smartguruji.in/2021/10/7-jadugar-7.html

1. इन्द्रधनुष्य मोर, फुले, फळे, पक्षी, पाऊस, वारा हे कोणी निर्माण केले आहे?
उत्तर – निसर्गाने


2.हा जादूचा खेळ कोणी मांडला?
उत्तर – हा जादूचा खेळ इन्द्रधनुष्य मोर, फुले, फळे, पक्षी, पाऊस, वारा यांनी मांडला.

3.ही कोडी विनोद यांचे स्पष्टीकरण करणे.

4. नवीन शब्द समानार्थी शब्द जोड्या लावणे.

• फरक समजून घे
पूर – पुर,

दिन- दीन

ग्रह – गृह,

मन – मण

• ओळख पाहू
1. सुपले कान, खांबा सारखेपाय
शेपटी बारीक, सांगा मी कोण?

उत्तर- हत्ती

2. पंख नाहीत, पण उडे आकाशी
शेपूट हलवी तो, पण प्राणी नाही
मी कोण…
.
उत्तर – पतंग

3.त्याला आहे फार किंमत
पण झाला लाला तो दुःखी
ओळखणार नाही त्याला
मिळेल भोपळा नक्की

उत्तर – शून्य

अध्ययन कृती 10:2

अ) पाठ क्रमांक 22 बोधाचा स्पर्श ही कविता घेणे.

पाठ 10 बोधाचा स्पर्श

अती भूषणे मार्ग तो संकटांचा

अती थाट तो वेष होतो नटाचा

रहावे असे की न कोणी हसावे

प्रमाणामध्ये सर्व काही असावे

अती कोपता कार्य जाते लयाला

अती नम्रता पात्र होते भयाला

अती काम ते कोणतेही नसावे

प्रमाणामध्ये सर्व काही असावे

सदा पद्य घोकोनिया शीण येतो

सदा गद्य वाचोनिया त्रास होतो

कधी ते कधी हेहि वाचीत जावे

प्रमाणामध्ये सर्व काही असावे

अती ज्ञान अभ्यासिल्या क्षीण काया


अती खेळणे हा भिकेचाची पाया

न कष्टविणे त्वां रिकामे बसावे

प्रमाणामध्ये सर्व काही असावे
कृष्णाजी नारायण आठल्ये
ब) वर्तमानपत्र वाचणे.

क) विचारधनः

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. सद्गुरुच्या सेवेने मिळालेले ज्ञानरूपी शस्त्र अहंकाराचा समूळ नाश करते.अशा प्रकारचे विचारधन
लिहा व वाचा समजून घ्या.
>



Share with your best friend :)