5th MARATHI KALIKA CHETARIKE ANSWERS 10.3 5 वी मराठी अध्ययन कृती 10.3,10.04

 कलिका चेतरिके 

इयत्ता पाचवी 

विषय -मराठी 



अध्ययन कृती 10:3

अंधश्रद्धा
चर्चात्मक पद्धतीने एकमेकाला विचारून योग्य की अयोग्य हे समजून घेणे.


अंधश्रद्धा – चुकीच्या समजुतीने आपण आपले विचार दुसऱ्याच गोष्टीकडे नेतो. त्यामुळे आपलेच नुकसान करून जीवन वाया घालवतो. म्हणून माणसाने चांगले विचार घेतले पाहिजेत. अभ्यास करताना आपण मन लावून समजून घेऊन शिकले तरच आपण हुशार शहाणे होतो. कुठे भोंदूबाबाकडे जाऊ नये.



 
• बोधकथा – आळस

एक व्यापारी होता. तो खूप प्रामाणिकपणे व सचोटीने व्यापार करायचा. त्याला एक मुलगा होता. तो सुद्धा प्रामाणिक होता. पण घरात सुखसोयी असल्याने त्याला कष्ट करायला कंटाळा यायचा. तो ‘खूपच आळशी व कामचुकार होता. कोणतीही गोष्ट तो उद्याला ढकलायचा. आज नाही उद्या असं म्हणायचा. आपल्या मुलाच्या आळशीपणाचा व्यापाराला फार वाईट वाटायचे. तो नेहमी मुलाला आळस सोडून काम करायला सांगायचा, पण मुलावर त्याचा सांगण्याचा परिणाम व्हायचा नाही. त्यामुळे व्यापाऱ्याला आपल्या मुलाची काळजी वाटायची. आळस माणसाला निष्क्रिय बनवतो. कष्ट न करता फळाची आशा करतो. अशा माणसाला लवकर निर्णय घेता येत नाही. जरी निर्णय घेतला तरी त्या निर्णयावर लवकर कृती करत नाही. आपल्या मुलांचे कल्याण व्हावे म्हणून व्यापाराने एक निर्णय घेतला. एकदा व्यापारी, व्यापार करून परतत होता. त्याला रस्त्यात एक दगड दिसला.




त्याने तो गुळगुळीत दगड उचलला आणि तो घरी आला. त्याने आपल्या मुलाला बोलाविले व म्हणाला, “ बेटा मी काशीला गेलो होतो मला एक महान साधू भेटले त्यांनी मला एक चमत्कारी दगड दिला. या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला तर लोखंड सोन्याचे होईल. पण त्याचा चमत्कार उद्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. मी त्याचा उपयोग केला असता पण मला आजच रात्री गावी माल पोचवायला निघायचे आहे. उद्या तू असं कर बाजारातून लोखंडाचें मोठे मोठे तुकडे घेऊन ये त्या लोखंडाचे सोने करून ठेव. पण लक्षात ठेव वेळ खूप कमी आहे.” दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला. मुलगा म्हणाला आता सूर्य उगवला थोडावेळ झोपूया, असे म्हणत लोळत पडला. दुपार झाली जेवण करून पुन्हा झोपला. संध्याकाळ होत आली स्वप्न रंगवत झोपला. माझ्या वडिलांनी कष्ट करून एवढी कमाई केली मी एका दिवसात एवढे सोने करून ठेवेण वर्ग पुढची पिढी बसून खाथील असे मनात म्हणत बसला. सूर्यास्त व्हायला थोडाच वेळ होता. तो खडबडून जागा झाला व शोधू लागला. सगळं घर शोधलं तरी मिळेना. शेवटी झोपायच्या खोलीत मिळाला. पण वेळ निघून गेली.. तेवढ्यात व्यापारी आला. तो मुलगा रडू लागला तेंव्हा व्यापाराने त्याची चूक सांगितली व तो सुधारला व कामाला लागला.



 


खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1. व्यापाऱ्याला किती मुले होती?
उत्तर – व्यापाऱ्याला एक मुलगा होता.


2. व्यापाऱ्याचा मुलगा कसा होता?
उत्तर – व्यापाऱ्याचा मुलगा आळशी व कामसुकार होता.

3. त्याला कष्ट करण्याचा कंटाळा का येत असे?
उत्तर – घरात सर्व सुखसोयी असल्याने त्याला कष्ट करायला कंटाळा येत असेल.

4. मुलगा कोणते स्वप्न रंगवू लागला?
उत्तर – माझ्या वडिलांनी कष्ट करून एवढी कमाई केली मी एका दिवसात एवढे सोने करून ठेवीन पुढची सर्व पिढ्या बसून खातील असे स्वप्न तो मुलगा रंगवू लागला.

5. गोष्टीचे तात्पर्य लिहा.
उत्तर – आळस माणसाला निष्क्रिय बनवतो.





अध्ययन कृती 10:4 सर एम विश्वेश्वरय्या

     मैसूर जिल्ह्यातील मदनहळी गावात विश्वेश्वरय्या यांचा जन्म झाला. भारताला उद्योगधंद्यात पुढे घेऊन जाण्याचे श्रेय त्यांना मिळते. लोखंड व साखर कारखाने सुरु केले. कृष्णराज सागर धरण बांधले. 15 सप्टेंबर हा इंजिनिअर दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले इंजिनिअर आहेत. सर एम विश्वेश्वरय्या 1912 ते 1918 आधुनिक मैसूरचे शिल्पकार आणि निर्माण करता अशी उपाधी लाभलेले सर विश्वेश्वरय्या एक प्रतिभावंत इंजिनिअर म्हणून 1909 ते 1912 पर्यंत मैसूर संस्थानाचे मुख्य इंजिनिअर म्हणून काम पाहिले. नालवाडी कृष्णराज वडेयर यांनी 1912 मध्ये म्हैसूरचे दिवाण म्हणून नेमणूक केली. यांच्या काळात मैसूरचा सर्वतोमुखी विकास झाला.

• पाठ क्रमांक 21 – बसवेश्वर हा पाठ घेणे.

खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
1. भारताचे पहिले इंजिनिअर म्हणून कोणाला ओळखतात?
उत्तर -भारताचे पहिले इंजिनिअर म्हणून सर एम विश्वेश्वरय्या यांना ओळखतात.


2. इंजिनिअर दिन केंव्हा साजरा करतात?
उत्तर – इंजिनिअर दिन 15 सप्टेंबर रोजी साजरा करतात.

3. बसवेश्वरांच्या रचनेला काय म्हणतात?
उत्तर – बसवेश्वरांच्या रचनेला बसववचन म्हणतात

4. बसवेश्वर कोणत्या राजाकडे कोषाध्यक्ष म्हणून काम करू लागले?
उत्तर – बिदर जिल्ह्यातील कल्याण येथे बिज्जल नावाच्या राजाकडे बसवेश्वर कोषाध्यक्ष म्हणून काम करू लागले.


 



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *