KALIKA CHETARIKE 2022
इयत्ता – आठवी
विषय- समाज विज्ञान
अध्ययनांश – 9
अध्ययन निष्पत्ती 9-
1. आदिवासी चळवळीमुळे स्वातंत्र्य संग्रामास
स्फूर्ती मिळाली. हे समजून घेतील.
2. ब्रिटीश राजवटीच्या सुधारणा आणि भारतीयांच्या
प्रतिक्रियांचे विश्लेषण करतील.
संथालांचे बंड 1855-
ओरिसा आणि बंगाल प्रातांमध्ये कृषी
व्यवसाय करणारे संथाल आदिवासी जमीनदारी पध्दतीमूळे भूमिहीन झाले. त्यामुळे त्यांनी
बिहारच्या राजमहल टेकडयांवर फाळयाने शेती करु लागले, त्या एक आणा शेतफाळा असणारे सहा रुपये वाढवून जमिनदारांनी
त्यांच्यावर अत्याचार सुरु केला, तसेच शेतफाळा न दिल्यास त्यांच्या स्त्रिया व मुलांच्यावर
अत्याचार होत होते.
हलगलीच्या बेरडांचे बंड 1857–
मुलांनो, हलगली हे बागलकोट जिल्हयातील एक छोटेसे खेडे. या खेडयाने
ब्रिटीशांची झोप उडवून दिली. 1857 मध्ये ब्रिटीशांनी शस्त्रास्त्रांच्या वापरावर कायद्याने
बंदी घातली. प्रत्येकाने शस्त्रास्त्रे बाळगण्यासाठी ब्रिटीशांची परवानगी घेणे
सक्तीचे होते. याचा उद्देश म्हणजे भारतीयांनी ब्रिटीशांविरुध्द शस्त्रास्त्र हल्ले
करु नयेत. तसेच ज्यांनी शस्त्रास्त्र वापरण्याची परवानगी घेतली नाही. त्यांनी
शस्त्रास्त्रे सरकारकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. पण बेरड लोक त्यांच्या
परंपरेनुसार शस्त्रास्त्रे आपल्याजवळ बाळगत व तो आमचा जन्मसिध्द हक्क आहे असे
मानत. त्यामुळे त्यांनी ब्रिटीशाची विनंती धूडकावून लावली, सणांच्या दिवशी ते शस्त्रास्त्रे पवित्र म्हणून पूजनसुध्दा
करत.
1857
मध्ये कर्नल सेनेटकेर आणि माल्क यांनी नोव्हेंबर 29
मध्ये बेरडांच्यावर हल्ला केला. बेरडांनी ब्रिटीशांविरुध्द
लढा देवून खूप नुकसान केले त्यामुळे रागाने सेनेटकेर यांनी गावाला आग लावली.
यामध्ये कित्येक बेरड लोक सापडले, काहीजन जवळच्या जंगलामध्ये पळून गेले,
तसेच पळून गेलेल्या 290 लोकांना कैद केले व 19 बंडखोरांना फासावर लटकावले.
अध्ययन पत्रक – 36
कृती क्रमांक 1: संथालानी ब्रिटीशांविरुध्द
बंड पुकारण्याची कारणे कोणती विवरण द्या.
उत्तर – जमीनदारी पद्धतीमुळे संथाल भूमिहीन झाले.
शेतफाळा वसूल करण्यासाठी जमीनदारांनी त्यांच्यावर अत्याचार
करण्यास सुरुवात केली.
कृती क्रमांक 2: सध्याच्या
दिवसांमध्ये आदिवासी लोकांच्या परिस्थिती विषयी ऐकून आपला अभिप्राय लिहा,
उत्तर – सध्या आधुनिक युग असले तरी अजूनही काही लोक जंगलामध्ये
राहतात.तेथील वनस्पत व प्राणी यांचा आहार म्हणून वापर करतात.त्यांचे हे जीवन बदलले
पाहिजे. यासाठी त्यांनी आपल्याबरोबर गावात येऊन राहिले पाहिजे व सुखदायी जीवन जगले
पाहिजे.
कृती क्रमांक 1: 1857 च्या
प्रथम स्वातंत्र्य संग्रामाबद्दल एक छोटया कथेची रचना करा.
उत्तर – व्यापारासाठी भारतात
आलेल्या ब्रिटिशांनी भारतातील संपत्ती पाहून येथे तळ ठोकला पुढे लहान-मोठे व्यापार
केंद्रांची स्थापना केली स्थानिक राजे लोकांमध्ये अंतरी कलर निर्माण करून एक एक
प्रदेश काबीज केले याप्रमाणे एक एक प्रदेश काबीज करत त्यांनी भारतभर आपले
साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली.भारतीयाना गुलामीची वागणूक देऊन
त्यांच्याकडून गुलामाची गुलामासारखी कामे करून घेण्यास सुरुवात केली.त्यामुळे
भारतीय लोक चिडले व त्यांनी ब्रिटिशांना विरोध करण्यास सुरुवात केली व याची
सुरुवात म्हणून त्यांनी 1857 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचे पहिले युद्ध झाले.
कृती क्रमांक 2: 1857 च्या प्रथम
स्वातंत्र्य युध्दानंतर भारतामध्ये प्रत्यक्ष ब्रिटीश राणीच्या कारभारास सुरुवात
होण्याची कारणे कोणती?
उत्तर – हे युद्ध अयशस्वी झाले असले तरी त्याचे परिणाम दीर्घकालीन
झाले.भारतातील राजकीय,धार्मिक,सांस्कृतिक बाबतीत ब्रिटिशांकडून हस्तक्षेप केला जाणार
नाही.हे भारतीयांना पटवून देण्यासाठी व कंपनीचे वर्चस्व कमी करण्यासाठी ईस्ट
इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात येऊन ब्रिटीश राणीच्या कारभारास सुरुवात झाली.
कृती क्रमांक 3: ब्रिटीशांनी
भारतामध्ये केलेल्या सुधारणा तसेच त्याला संबंधित काही प्रमुख बदल दिलेले आहेत ते
योग्य ठिकाणी जोडवा जुळवून लिहा.
कलिका चेतरिके 8वी समाज विज्ञान
अध्ययन पत्रक 31,32,33,34,35 उत्तरे
व्हिडीओच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक अपडेट्स साठी आमचे YouTube Channel सबस्क्राईब करायला विसरू नका
Subscribtion link
http://youtube.com/@smartguruji2022