13 – प्रकाश (Light)
CLASS – 8
MARATHI MEDIUM
SUBJECT – SCIENCE
PART – 2
विज्ञान
प्रकरण- 13
13 – प्रकाश (Light)
प्रकरण 13 – प्रकाश (Light)
1. समजा तुम्ही अंधाऱ्या खोलीत आहात. तुम्ही खोलीत पदार्थ पाहू शकता का ? खोली बाहेरील पदार्थ पाहू शकता का ? स्पष्टीकरण करा.
उत्तर – अंधाऱ्या खोलीतील वस्तू आम्ही पाहू शकत नाही.पण खोलीबाहेरील पदार्थ आम्ही पाहू शकतो.कारण एखाद्या पदार्थाला पाहण्यासाठी प्रकाशाची गरज असते.कारण तेथे प्रकाश परावर्तन घडते.
2. नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन यातील फरक स्पष्ट करा. अनियमित परावर्तन म्हणजे परावर्तनाच्या नियमांचे अपयश आहे का
उत्तर – नियमित परावर्तन-:
पृष्ठभाग गुळगुळीत सपाट असतो त्यावेळी घडणारे परावर्तन नियमित परावर्तन असते.
नियमित परावर्तनाच्यावेळी परावर्तनाचे दोन्ही नियम लागू पडतात.
नियमित परावर्तनामुळे प्रतिमा व्यवस्थित तयार होतात.
अनियमित परावर्तन -:
पृष्ठभाग ओबडधोबड असल्याने प्रकाश किरण पृष्ठभागावर पडून परावर्तित झाल्यानंतर नियमित नसतात.अशा परावर्तनाला अनियमित परावर्तन म्हणतात.
अनियमित परावर्तनाच्या वेळी परावर्तनाचे दोन्ही नियम लागू पडत नाहीत.
अनियमित परावर्तनामुळे प्रतिमा तयार होत नाही.
3. खालील प्रत्येकाबाबत नियमित परावर्तन घडेल की अनियमित परावर्तन घडून येईल जेव्हा किरणशलाका त्यांच्यावर पडेल. तुमचे उत्तर बरोबर आहे का हे प्रत्येक स्थितीत पडताळून पहा.
उत्तर –
(a) पॉलिश (चकचकीत) केलेला लाकडाचा टेबल – चकचकीत पृष्ठभाग असल्याने प्रकाशाचे नियमित परावर्तन घडते.
(b) खडूची पूड – खडू पावडर लहान लहान कणांनी ओबडधोबड पृष्ठभाग तयार करते.त्यामुळे अनियमित परावर्तन घडते.
(c) पुठ्ठयाचा पृष्ठभाग – पुठ्ठ्याचा पृष्ठभाग लहान कणांनी ओबडधोबड पृष्ठभाग तयार करतो.त्यामुळे अनियमित परावर्तन घडते.
(d) पाणी टाकलेली फरशी – नियमित परावर्तन
(e) आरसा – नियमित परावर्तन
(f) कागदाचा तुकडा – अनियमित परावर्तन
4. परावर्तनाचे नियम लिहा.
उत्तर – परावर्तनाचे नियम खालील प्रमाणे-:
आपाती कोन हा परावर्तित
कोनाइतका असतो.
आपाती किरण परावर्तित
किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
5.आपाती कोन, परावर्तित कोन आणि आपाती बिंदूवर काढलेली स्तंभिका एकाच प्रतलात असतात हे
दर्शविण्याऱ्या कृतीचे वर्णन करा.
उत्तर –
साहित्य
–कार्डबोर्ड पेपर,आरसा,कंगवा,पेन्सिल, कोनमापक व पट्टी.
कृती – एक कार्डबोर्ड पेपर घेऊन आपाती किरण व परावर्तित किरण दर्शविणारी रेषा ओढा.
आरसा आणि कंगवा बाजूला ठेवा. प्रकाश किरण परावर्तित होतो म्हणजेच आपाती किरण आरशाला मिळतो. आरशाला लंब असणारी रेषा काढा त्या स्तंभिका म्हणतात.
आपाती कोन आणि परावर्तित कोन मोजा ते नेहमी समान असतात.
आपाती किरण,परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
6. रिकाम्या जागा भरा.
(i) सपाट आरश्यापासून 1 m. अंतरावर उभा असलेला मनुष्य त्याच्या प्रतिमेपासून 2m. अंतरावर असेल.
(ii) सपाट आरशासमोर उभे राहून जर तुम्ही तुमचा डावा कान उजव्या हाताने स्पर्श करत असाल तर ते आरशात तुमचा उजवा कान तुमच्या डावा हात स्पर्श करताना दिसेल.
(iii) जेव्हा तुम्ही मंद प्रकाशात पाहता तेव्हा तुमच्या डोळ्याच्या बाहुलीचा आकार मोठा होतो.
(iv) रात्री उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये शंक्वाकृती पेशींपेक्षा जास्त दंडाकृती पेशी असतात.
प्रश्न 7 आणि 8 मध्ये योग्य पर्याय निवडा.
7. आपाती कोन हा परावर्तन कोनाबरोबर असतो.
(a) नेहमी
(b) काही वेळेस
(c) एका विशिष्ट स्थितीत
(d) कधीच नाही
उत्तर – (a) नेहमी
8. साध्या आरशात मिळणारी प्रतिमा.
(i) आभासी, आरशामागे आणि विस्तारित असते.
(ii) आभासी, आरशामागे आणि पदार्था एवढी असते.
(iii) आरशाच्या पृष्ठभागालगत वास्तव आणि विस्तारीत असते.
(iv) वास्तव, आरशाच्या पाठीमागे आणि पदार्थाएवढी असते.
उत्तर – (ii) आभासी, आरशामागे आणि पदार्था एवढी असते.
9. शोभादर्शकाची रचना स्पष्ट करा.
उत्तर –
साहित्य
– तीन आयताकृती आरशाच्या समान पट्ट्या, पुठ्ठ्याच्या किंवा जाड कागदाच्या नळकांड्या, प्लास्टिकच्या कागदाचा तुकडा,विविध रंगाची काचेचे तुकडे.
कृती
-:
शोभादर्शक हा मनोरंजन करणारा नळकांड्यायुक्त उपकरण आहे.त्याला बनविताना तीन आरशाचे तुकडे जोडून एक त्रिकोणाकृती घन तयार करा.एक गोलाकार जाड कागदाची नळकांडी घेऊन त्यामध्ये तो घन बसवा. नळकांडे काचेपेक्षा मोठे असावे.नळकांडाच्या एक बाजू बंद करा.नळकांडीवर प्लास्टिकच्या कागदाचा तुकडा चिकटवा. दुसऱ्या बाजूला पट्ट्यांना जोडून एक गोलाकार काचेची चकती बसवा.त्या चकतीवर विविध रंगांची तुकडे टाका व चक्ती पूर्णपणे बंद करा.एका बाजूला छिद्र पाडून त्या छिद्रातून आपण मनोरंजन नमुने पाहू शकतो.
10. मानवी डोळ्याची सुबक आकृती काढा.
11. गुरमीतला 16.8 हा उपक्रम लेसर टॉर्चचा उपयोग करुन करावयाचा आहे. असे न करण्याचा सल्ला तिची शिक्षिका तिला देते. शिक्षिकेच्या
नकाराचे कारण तुम्ही स्पष्ट करा ?
उत्तर – 16.8 हा उपक्रम लेसर टॉर्चचा उपयोग करून करू नये कारण लेसर किरणात साध्या प्रकाश किरण्यांपेक्षा अधिक शक्ती असते.लेसर किरणे डोळ्याच्या संपर्कात आल्यास आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते.
12. तुम्ही तुमच्या डोळ्याची काळजी कशी घ्याल हे स्पष्ट करा.
उत्तर – जर सल्ला दिला असेल तर योग्य चष्म्याचा वापर करणे.
सूर्याकडे अथवा शक्तिशाली प्रकाशाकडे सरल पाहू नका.
अतिमंद प्रकाश किंवा अति तीव्र प्रकाश डोळ्यांकरीता वाईट असतो.कमी प्रकाशामुळे डोळ्यांवर ताण पडतो व डोकेदुखी निर्माण होते.तीव्र प्रकाश अधिक प्रकाश सुद्धा जसे सूर्याचा प्रकाश,शक्तिशाली दिवा किंवा लेझर टॉर्च यांच्यामुळे नेत्रपटलाला इजा पोहोचू शकते.
डोळे कधीही चोळू नका.जर डोळ्यात कचरा गेला असेल तर डोळा स्वच्छ पाण्याने धुवा.जर त्याने फरक पडत नसेल तर डॉक्टरकडे जावे.
नेहमी तुमचे डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.
सोयीस्कर अंतरावर वाचन करावे.डोळ्यांच्या अतिजवळ पुस्तक आणून वाचू नये किंवा त्याला खूप दूर धरून सुद्धा वाचू नये.
उत्तर – A या ठिकाणी असलेल्या पदार्थाच्या प्रतिमेचे स्थान आरशावर
समान अंतरावर उमटते.सपाट आरसा असल्याने प्रतिमेचे स्थान आरशाच्या मागे उमटते.
(b) या प्रतिमेला पहेली B चा स्थानी असताना पाहू शकेल का?
उत्तर – होय
(c) बुझो C या स्थानी असताना या प्रतिमेला पाहू शकेल का ?
उत्तर – होय
(d) जेव्हा पहेली B पासून C कडे जाईल तेव्हा A ची प्रतिमा कोठे स्थलांतर करेल ?
उत्तर – प्रतिमा आहे त्याच ठिकाणी उमटेल कारण वस्तू हलवलेली नाही. फक्त पहिली B पासून C कडे गेलेली आहे.
सत्र –2 प्रश्नोत्तरे
11.पेशी-रचना आणि कार्य
https://www.smartguruji.in/2022/01/8th-science-cell-structure-and-functions.html
12.प्राण्यांमधील पुनरुत्पादन
https://www.smartguruji.in/2022/02/8th-science-11reproduction-in-animals-11.html
13. पौगंडावस्थेमध्ये पदार्पण
https://www.smartguruji.in/2022/02/8th-science-13-reaching-age-of.html
14.विद्युत धारेचे रासायनिक परिणाम
https://www.smartguruji.in/2022/02/8th-science-14-chemical-effects-of.html