Sardar Patel Information in Marathi (सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी)

         


भारताचे लोहपुरुष,सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात राज्यातील करमसद येथे झाला.त्यांचे पूर्ण नाव वल्लभभाई झावरभाई पटेल असे होते.त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंधीकरणात मोठे योगदान दिल्याबद्दल भारतीय महिलांनी त्यांना ‘सरदार’ ही उपाधी दिली.भारतातून इंग्रजांची सत्ता गेल्यानंतर त्यावेळी भारतातील सर्वात प्रसिद्ध राजकारण्यांपैकी ते एक होते.पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पंतप्रधान काळात सरदार पटेल यांनी भारताचे पहिले उपपंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला होता.

    भारतीय प्रजासत्ताकचे संस्थापक असेही त्यांना म्हटले जाते.कारण भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर स्वतंत्र प्रांतांना एकसंध भारतात सामावून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतातील सर्व संस्थानिकांना एकसंध करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.1947 मध्ये भारत – पाक युद्धाच्या वेळी त्यांनी गृहमंत्री म्हणून चांगली भूमिका बजावली होती.



    2014मध्ये भारत सरकारने राष्ट्रीय एकता दिवस सुरू केला. राष्ट्रीय एकता दिवस साजरा केल्याने “आपल्या देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी वास्तविक आणि संभाव्य धोक्यांना तोंड देण्यासाठी आपल्या देशाच्या सहनशक्ती आणि लवचिकतेची पुन्हा आठवण करण्यास मदत होईल.’ असे त्यावेळच्या भारत सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले होते.

        भारत देश अखंड अबाधित रहाव म्हणून सरदार पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे.हा दिवस साजरा करण्यासाठी, ‘युनिफायर ऑफ इंडिया’ (भारतीय एकीकरण) चे प्रतिक म्हणून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ नावाचा जगातील सर्वात उंच पुतळा सरदार पटेल यांना समर्पित करण्यात आला आहे.हा पुतळा गुजरात येथे असून या पुतळ्याची उंची अंदाजे 597 फूट आहे.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत हस्ते 31 ऑक्टोबर 2018 रोजी या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

banner
एकतेचा पुतळा 

    31 ऑक्टोबर 2019 रोजी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भारतीय इतिहासातील योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी ‘रन फॉर युनिटी’ हा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.त्यांच्या 144 व्या जयंतीनिमित्त, दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमपासून सुरू झालेल्या या रनमध्ये हजारो लोकांनी भाग घेतला होता.भारताचे लोह पुरुष सरदार पटेल यांनी अथक प्रयत्न करून देशाला आकार दिला आणि हिंदू-मुस्लिमांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्न केले त्याची आठवण म्हणून राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत आहे.




राष्ट्रीय एकता दिवस शपथ मराठी,इंग्रजी,हिंदी 
Share with your best friend :)