भाषण क्र. 1
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,माझे शिक्षक आणि बालमित्रांनो,1 नोव्हेंबर या दिवशी दरवर्षी कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा केला जातो.1 नोव्हेंबर १९५६ या दिवशी म्हैसूर राज्याची निर्मिती झाली त्याची आठवण म्हणून 1 नोव्हेंबर यादिवशी कर्नाटक राज्योत्सव दिन साजरा करतो.
धन्यवाद ……… जय कर्नाटक
भाषण क्र. 2
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,माझे शिक्षक आणि बालमित्रांनो,आजच्या दिवशी आपल्या कर्नाटक राज्याची स्थापना झाली.आपले राज्य सुजलाम सुफलाम असून मला माझे राज्य खूप आवडते..
धन्यवाद ……… जय कर्नाटक
भाषण क्र. 3
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,माझे शिक्षक आणि बालमित्रांनो,आपल्या कर्नाटक राज्यात अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येऊन दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस राज्योत्सव दिन म्हणून साजरा करतात.कन्नड ही आपल्या राज्याची राजभाषा आहे तर बेंगळूरू हि आपल्या राज्याची राजधानी आहे.
धन्यवाद ……… जय कर्नाटक
भाषण क्र. 4
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,माझे शिक्षक आणि बालमित्रांनो,आपल्या कर्नाटक राज्याला कर्नाटक हे नाव कसे पडले याविषयी थोडक्यात सांगणार आहे.कर्नाटक या नावाबद्दल अनेक तर्क मांडले असले तरी सामान्यपणे कर्नाटक हा शब्द करू आणि नाडू या कन्नड शब्दांपासून तयार झाला आहे.याचा अर्थ ‘सुंदर रम्य प्रदेश’ असा होतो.एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवितो.
धन्यवाद ……… जय कर्नाटक
भाषण क्र. 5
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,माझे शिक्षक आणि बालमित्रांनो,सर्वप्रथम तुम्हा सर्वांना कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!आजचा दिवस हा एक अविस्मरणीय दिवस आहे कारण आजच्या दिवशी कन्नड भाषिक लोकांचे एकीकरण करून कर्नाटक राज्याची निर्मिती झाली.म्हणून आजचा दिवस कर्नाटक स्थापना दिन किंवा कन्नड दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो.या वैभवसंपन्न राज्यात आपला जन्म झाला हे आपले खूप मोठे भाग्य आहे.अनेक कवी,लेखक,खेळाडू,नेते,कलाकार यांनी नटलेल्या कर्नाटक मातेस अभिवादन करून माझे दोन शब्द संपवितो.
धन्यवाद ……… जय कर्नाटक
भाषण क्र. 6
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे,माझे शिक्षक आणि बालमित्रांनो,सर्वांना कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!भारत देशाच्या दक्षिणेला कर्नाटक राज्य असून कन्नड ही राज्याची राजभाषा आहे.हत्ती हा राज्यप्राणी,नीलकंठ हा राज्याप्राणी आहे.तसेच कमळ हे आपल्या राज्याचे राज्य फुल आहे.अशा सुंदर कर्नाटक मातेस वंदन करून मी माझे दोन शब्द संपवितो.
जय भारत जननीय तनुजाते
जय हे कर्नाटक माते..
धन्यवाद ……… जय कर्नाटक