KARNATAKA RAJYOTSAW DIN SPEECH 5 | कर्नाटक राज्योत्सव दिवस भाषण 5

    


 

भाषण क्र. 5 

1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्योत्सव दिन म्हणजे सर्व कर्नाटकवासीयांचा एक उत्सव आहे.आपल्या कर्नाटक राज्यात दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव दिन आनंदाने साजरा केला जातो.1 नोव्हेंबर 1956 रोजी दक्षिण भारतातील सर्व कन्नड भाषिक एकत्र करून म्हैसूर राज्याची निर्मिती करण्यात आली.तेव्हापासून हा दिवस कर्नाटक स्थापना दिन किंवा कर्नाटक राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो.

1905 मध्ये अलुर वेंकटराव यांनी सर्वप्रथम कर्नाटक एकीकरण चळवळ सुरू केली. 1950 मध्ये भारत देश प्रजासत्ताक बनल्यानंतर भाषा आधारित राज्यांची निर्मिती करण्यात आली.यातून म्हैसूर राज्याची निर्मिती झाली.1 नोव्हेंबर 1973 रोजी मुख्यमंत्री देवराज अरस यांनी म्हैसूर राज्याचे ‘कर्नाटक’ असे नामकरण केले.
1 नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र ‘जय भारत जननीय तनुजाते,जय हे कर्नाटक माते’ हे गीत गाऊन अभिमानाने हा दिवस साजरा केला जातो.



 

कर्नाटक या नावाच्या उत्पत्तीबद्दल अनेक तर्क मांडले असली तरी सामान्यपणे कर्नाटक हा करू आणि नाडू या कन्नड शब्दांपासून तयार झाला आहे.याचा अर्थ ‘सुंदर रम्य प्रदेश’ असा होतो.
आपल्या कर्नाटकात कन्नड बरोबरच मराठी, तामिळी, तेलगू, मल्याळी, उर्दू या भाषादेखील बोलल्या जातात. वन, जल, प्राणी, खनिज संपत्ती येथे भरपूर आहे. तांबे, लोखंड बॉक्साईट, मँगनीज, सोने या खनिज संपत्तीने समृद्ध असणाऱ्या या भूमीस सुवर्णभूमी म्हणतात. कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा, शरावती नद्यांचे खळाळते प्रवाह व प्रपात या भूमीस सुजलाम्-सुफलाम बनवितात. कर्नाटकाने अनेक कवी, लेखक, शास्त्रज्ञ, अभियंते, चित्रकार, नाटककार, अभिनेते दिले आहेत. ऐतिहासिक वारसा जपणारे म्हैसूर,हम्पी,विजयनगर,बदामी,बेंगलोर असे अनेक स्थळे कर्नाटकात आहेत.
आपल्या कर्नाटक राज्याने प्राचीन संस्कृतीचा वारसा सांभाळताना देशाच्या विकासात ही योगदान दिले आहे. कर्नाटकाने आतापर्यंत कला,संगीत,कृषी,सहकार,साहित्य शिक्षण,क्रीडा,संस्कृती नाट्य संगणक विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे.आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करण्याचा निर्धार आपण करूया.



Share with your best friend :)