KARNATAKA RAJYOTSAW DIN SPEECH 3 | कर्नाटक राज्योत्सव दिवस भाषण 3



भाषण क्र. 3 

सुवर्णभूमी

श्रीगंधनाडू

करुणाडू

सुंदर नदी वनांची भूमी

संत-दास-शिवशरण यांची भूमी

पर्यटकांचे नंदनवन

ऐतिहासिक भूमी

ऋषीमुनींची भूमी

शूरवीरांची भूमी

अशा शब्दात गौरविलेल्या कर्नाटक राज्यात आपण जन्मलो हे आमचे भाग्य आहे.



1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्योत्सव दिन म्हणजे सर्व कर्नाटकवासीयांचा एक उत्सव आहे.आपल्या कर्नाटक राज्यात दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी राज्योत्सव दिन आनंदाने साजरा केला जातो.1 नोव्हेंबर 1956 रोजी दक्षिण भारतातील सर्व कन्नड भाषिक एकत्र करून म्हैसूर राज्याची निर्मिती करण्यात आली.तेव्हापासून हा दिवस कर्नाटक स्थापना दिन किंवा कर्नाटक राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो.
1905 मध्ये अलुर वेंकटराव यांनी सर्वप्रथम कर्नाटक एकीकरण चळवळ सुरू केली. 1950 मध्ये भारत देश प्रजासत्ताक बनल्यानंतर भाषा आधारित राज्यांची निर्मिती करण्यात आली.यातून म्हैसूर राज्याची निर्मिती झाली.1 नोव्हेंबर 1973 रोजी मुख्यमंत्री देवराज अरस यांनी म्हैसूर राज्याचे ‘कर्नाटक’ असे नामकरण केले.
1 नोव्हेंबर रोजी राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच या दिवशी ‘जय भारत जननीय तनुजाते,जय हे कर्नाटक माते’ हे गीत गाऊन अभिमानाने हा दिवस साजरा केला जातो.
अशा या कर्नाटक राज्योत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द संपवतो.
जय भारत – जय कर्नाटक


Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now