भाषण क्र. 2
कर्नाटक राज्योत्सव किंवा कन्नड दिवस,ज्याला कर्नाटक निर्मिती दिवस किंवा कर्नाटक दिवस देखील म्हणतात, दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.1956 मध्ये हाच दिवस होता जेव्हा दक्षिण भारतातील सर्व कन्नड भाषा बोलणारे प्रदेश एकत्र करून कर्नाटक राज्याची निर्मिती करण्यात आली होती.
अलुरु व्यंकट राव हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी 1905 च्या सुरुवातीस कर्नाटक एकिकरण चळवळीने राज्याचे एकीकरण करण्याचे स्वप्न पाहिले होते.1950 मध्ये, भारत प्रजासत्ताक बनला आणि विशिष्ट प्रदेशात बोलल्या जाणार्या भाषेच्या आधारावर देशात वेगवेगळे प्रांत तयार केले गेले आणि यामुळे दक्षिण भारतातील विविध ठिकाणांसह म्हैसूर राज्याचा जन्म झाला,. उत्तर कर्नाटक, मलनाड (कॅनरा) आणि जुने म्हैसूर हे नव्याने स्थापन झालेल्या म्हैसूर राज्याचे तीन प्रदेश होते.
नव्याने एकत्रित झालेल्या राज्याने सुरुवातीला “म्हैसूर” असे ठेवण्यात आले.परंतु म्हैसूर या नावास उत्तर कर्नाटकातील लोकांनी विरोध केला.म्हणून 1 नोव्हेंबर 1973 रोजी म्हैसूर राज्याचे नाव बदलून “कर्नाटक” असे करण्यात आले.हा ऐतिहासिक निर्णय झाला तेव्हा मा.श्री. देवराज अरस हे राज्याचे मुख्यमंत्री होते.कर्नाटकच्या एकीकरणाचे श्रेय मिळालेल्या इतर लोकांमध्ये के. शिवराम कारंथ,कुवेंपू,मस्ती व्यंकटेश अय्यंगार,ए.एन. कृष्णा राव आणि बी.एम. श्रीकंठय्या यांसारख्या साहित्यिकांचा समावेश आहे.
संपूर्ण कर्नाटक राज्यात राज्योत्सव दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण राज्यात उत्सवाचे स्वरूप निर्माण होते.कारण राज्यभरातील विविध प्रमुख ठिकाणी कन्नड नाडगीत (“जय भारत जननिय तनुजाते”) अभिमानाने म्हटले जाते.अनेक राजकीय पक्ष कार्यालयांच्या ठिकाणी लाल-पिवळा ध्वज फडकवला जातो.या दिवशी कर्नाटकातील सर्व नागरिक जात धर्म,पंथ विसरून राज्योत्सव साजरा करतात.
राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या अभिभाषणासह कर्नाटकचा अधिकृत ध्वज फडकावून राज्योत्सव दिन साजरा केला जातो. 1 नोव्हेंबर या दिवशी कर्नाटकात सार्वजनिक सुट्टी असते.राजधानी बेंगळूरूमध्ये अनेक आयटी कंपन्या व शैक्षणिक संस्थामध्ये यादिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच यादिवशी राज्यातील विविध खेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीना माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव केला जातो.ध्वजारोहण आणि नाडगीत सादर करून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तसेच शाळांमध्ये असे कार्यक्रम आयोजित करतात.