सहावी
समाज विज्ञान
4.गुप्त आणि वर्धन घराणे
www.smartguruji.in |
गुप्त घराणे
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. प्रयाग येथील स्तंभाच्या शिलालेखात कोणत्या सम्राटाचे वर्णन आढळते?
उत्तर – प्रयाग येथील स्तंभाच्या शिलालेखात समुद्रगुप्ताचे वर्णन आढळते.
2. ‘विक्रमादित्य‘ ही पदवी कोणत्या गुप्त राजाला देण्यात आली होती?
‘विक्रमादित्य‘ ही पदवी दुसरा चंद्रगुप्त या गुप्त सम्राटाला मिळाली.
3. गुप्त काळाला सुवर्णयुग असे का म्हणतात ?
उत्तर – गुप्तांच्या राजवटीत लोक सुख शांतीने जीवन जगत होते. साम्राज्याने आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती साध्य केली. साहित्य, मूर्तिशिल्प, वास्तुशिल्प, चित्रकला, विज्ञान आणि गणित क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी केली. त्यामुळे इतिहास कारांनी गुप्त युगाला
सुवर्णयुग’ म्हटले आहे.
4. गुप्त राजवटीत भारताला भेट देणारा चिनी प्रवासी कोण होता?
उत्तर – फाहियाना हा गुप्त राजवटीत भारताला भेट देणारा चिनी प्रवासी होता.
5. कालिदासाने लिहिलेल्या कोणत्याही एक नाटकाचे नाव लिहा.
उत्तर – ‘अभिज्ञान शाकुंतल‘ हे कालिदासांनी लिहिलेले नाटक आहे.
6. ‘मृच्छकटिक‘ कोणी लिहिले?
उत्तर – शूद्रक या साहित्यकारने मृच्छकटिक हे नाटक लिहिले.
7. अमरसिंह यांनी रचलेला शब्दकोश कोणता ?
उत्तर – अमरसिंह यांनी ‘अमरकोश‘ नावाचा शब्दकोश लिहिला.
8. धमेख स्तूप कोठे आहे?
उत्तर – सारनाथ येथे धमेख स्तूप आहे.
9. गुप्त काळातील प्रसिद्ध गणित तज्ञाचे नाव काय ?
उत्तर – आर्यभट्ट हा गुप्तकाळातील प्रसिद्ध गणिती शास्त्रज्ञ होता.
10. अष्टांग संग्रह कोणी तयार केला ?
उत्तर – अष्टांग संग्रह वाग्भटानी तयार केला.
वर्धन घराणे
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. हर्षचरित कोणी लिहिले ?
उत्तर – वाग्भटानी ‘हर्षचरित‘ ग्रंथाची रचना केली.
2. हर्षवर्धन यांनी लिहिलेल्या दोन नाटकांची नावे लिहा.
उत्तर – हर्षवर्धनाने प्रियदर्शिका रत्नावली आणि नागानंद ही नाटके लिहिली.
3. कोणत्या चिनी पर्यटकाने हर्षवर्धनच्या दरबारला भेट दिली?
उत्तर – ह्यु.एन्.त्संग या चिनी पर्यटकाने हर्षवर्धनच्या दरबारला भेट दिली.
4. प्राचीन भारतातील प्रसिद्ध विश्वविद्यालय कोणते?
उत्तर – नालंदा हे प्राचीन भारतातील प्रसिद्ध विश्वविद्यालय होते.
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..