सहावी
समाज विज्ञान
10.ग्लोब आणि नकाशे
www.smartguruji.in |
अभ्यास
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. पृथ्वीच्या प्रतिकृतीला ग्लोब म्हणतात.
2. विविध प्रकारचे नकाशे संग्रहित असलेल्या पुस्तकाला अॅटलास किंवा नकाशा पुस्तक म्हणतात.
3. नकाशांमध्ये मैदान दर्शविण्यास हिरवा रंग वापरला जातो.
4. पृथ्वीगोलावर काढलेल्या काल्पनिक रेषा अक्षांश आणि रेखांश.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. ग्लोब म्हणजे काय ?
पृथ्वीची प्रतिकृती म्हणजेच ग्लोब होय.
2. ग्लोबचे दोन उपयोग सांगा.
ग्लोबचे उपयोग खालील प्रमाणे -:
पृथ्वीच्या आकाराचा अभ्यास करण्यासाठी प्रदेशांचा आकार व्याप्ती खंड समुद्र आणि महासागर यांची माहिती मिळते. ग्लोबवरील अक्षांश रेखांश आपल्याला निश्चित प्रदेश आणि राजकीय सीमा पाहण्यास मदत करतात. ग्लोब आपल्याला टेकड्या पठारे वाळवंटे नद्या व बेटांची माहिती देतात.
3. नकाशा म्हणजे काय ?
नकाशा म्हणजे जगाच्या पूर्ण आकृतीचे किंवा विभागाचे सपाट रूपात आणि मोजमापात केलेले प्रदर्शन होय.
4. नकाशांचे विविध प्रकार कोणते ?
नकाशाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे-:
1.मोजमापावर आधारित नकाशे
A.मोठ्या आकाराचे नकाशे
B.लहान आकाराचे नकाशे
2.उपयुक्त आधारित नकाशे
A.स्वाभाविक नकाशे
B.राजकीय नकाशे
C.वर्गीकृत नकाशे इत्यादी होय.
5. नकाशांचे दोन उपयोग सांगा.
नकाशाचे दोन उपयोग खालीलप्रमाणे आहेत.
नकाशे प्रवाशांना नियोजित स्थळी पोहोचवण्यास मदत करतात.
वर्गात शिकविण्यास व शिकण्यास नकाशे हे उत्तम साधन आहेत.
नकाशे आपणास पिके,खनिजे व कारखान्यांची माहिती देतात.
युद्धकाळात लष्करास नकाशा चा उपयोग सुरक्षितता आणि बेत आखणीस होतो.
6. अॅटलास म्हणजे काय ?
नकाशांच्या एकत्रित संग्रहित पुस्तकाला ॲटलास असे म्हणतात
7. मोजमापन म्हणजे काय ?
मोजमाप प्रत्यक्ष जमिनीवरचे अंतर आणि त्यानुसार नकाशातील अंतर हे प्रमाणबद्धतेनुसार दर्शविलेले अंतर यालाच मोजमापन असे म्हणतात.
8. भौगोलिक संकेत म्हणजे काय ?
नकाशामध्ये विशिष्ट वस्तू निश्चित करण्याकरिता कोणाचा वापर केला जातो.त्याला भौगोलिक संकेत असे म्हणतात.
9. नकाशांचे प्रमुख अंश कोणते ?
नकाशाचे प्रमुख अंश खालीलप्रमाणे..
शीर्षक
मोजमापक
अक्षांश रेखांश
दिशा
अनुक्रम किंवा सूची इत्यादी होय.
10. जल प्रदेश दर्शविण्यासाठी नकाशामध्ये कोणत्या रंगाचा उपयोग केला जातो?
जल प्रदेश दर्शविण्यासाठी नकाशामध्ये निळ्या रंगाचा उपयोग केला जातो.
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..