सहावी
समाज विज्ञान
11.पृथ्वीचे स्वरूप
हे तुम्हाला माहीत असू दे.
• माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे.
• आफ्रिका खंड सोने आणि हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.
• गंगा नदीचा मुख प्रदेश जगातील सर्वात मोठा आहे आणि त्याला सुंदरवन म्हणूनही ओळखले जाते.
• समशीतोष्ण उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशांना आफ्रिकेत स्टेपीस, उत्तर अमेरिकेत
प्रेअरी, दक्षिण अमेरिकेत पंपास, ऑस्ट्रेलियात डाउन्स आणि दक्षिण आफ्रिकेत वेल्स असे
म्हणतात.
● भारताच्या वायव्य भागात उष्ण कटिबंधातील थरचे वाळवंट आहे.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. भूस्वरूप म्हणजे काय ?
उत्तर – भूकवच्यावरील वैविध्यपूर्ण भौगोलिक लक्षणांना भूस्वरूपे म्हणतात.
भूकवचावरील टेकड्या मैदानी तरी पर्वत वाळवंटे इत्यादी भूस्वरूपे आढळून
येतात.
2. पर्वत म्हणजे काय ?
उत्तर – परिसरातील नैसर्गिकरित्या उंच असलेल्या भूस्वरूपाला पर्वत असे
म्हणतात.समुद्रसपाटीपासून पर्वत हे डोंगर आणि टेकडी पेक्षा उंच असतात.
3. पर्वतश्रेणी म्हणजे काय ?
उत्तर – शिखरासह किंवा बिनाशिखरांच्या सलग रांगेत असलेल्या पर्वतांना पर्वतश्रेणी
म्हणतात. उदा. हिमालय (अशिया), आल्पस पर्वत (युरोप)
4. पठारे म्हणजे काय ?
उत्तर – सपाट भूभाग आणि उतरत्या खोल कडा असलेल्या प्रदेशाला ‘पठार‘ किंवा
प्रस्थभूमी असे संबोधले जाते.
5. जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे ?
उत्तर – तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे.
6. मैदाने म्हणजे काय ?
उत्तर – विशाल सपाट भूमी अथवा थोडासा चढ – उतार असलेला खोलगट नसलेल्या
स्वरूपाच्या जमिनीच्या भागांना मैदान म्हणतात.
7. वाळवंट म्हणजे काय ?
उत्तर – विस्तारित कोरड्या व उष्ण प्रदेशास वाळवंट असे म्हणतात.
8. भारताला संबंधित एका बेटाचे नाव सांगा.
उत्तर – अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे ही भारताची मुख्य बेटे आहेत.
9. स्वाभाविक प्रदेश म्हणजे काय?
उत्तर – समान नैसर्गिक लक्षणे आढळून येणाऱ्या विभागास नैसर्गिक प्रदेश असे म्हणतात.
प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर स्पर्श करा..