FLAG HOSTING RULES ध्वजारोहणाचे नियम (ध्वज संहिता)

       ध्वज संहितेतील ध्वजारोहणाचे कांही महत्वाचे नियम – 
 

FLAG HOSTING RULES ध्वजारोहणाचे नियम (ध्वज संहिता)
   

        राष्ट्रध्वज हा देशाची अस्मिता असतो.ध्वजाचा अपमान होऊ नये,त्याचा गैरवापर होऊ नये या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.या ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण होणे अपेक्षित आहे.या राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

    देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 
हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वज फडकावताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात?
या आधी सरकारची ध्वजसंहिता अतिशय कडक होती. आता ती बऱ्यापैकी शिथिल करण्यात आली आहे.तरीही राष्ट्रध्वज फडकावताना खालील गोष्टी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे.

1.प्लॅस्टिकपासून किंवा कागदापासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.


2.राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवावा व आदरपूर्वक हळूहळू उतरवला गेला पाहिजे.

3.यापूर्वी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती.पण 20 जुलै 2022 रोजी केलेल्या नवीन सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल.तसेच राष्ट्रध्वज खुल्या जागेवर किंवा घरावर फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे.


4.The Flag Code of India 2002 मध्ये 30 डिसेंबर 2021च्या दुरुस्तीनुसार हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत,पॉलिस्टर,लोकर,सिल्क,खादीपासून बनवलेल्या राष्ट्रध्वजाचा वापर करता येईल.या आधी फक्त खादीच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती…
5.फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला ध्वज वापरू नये.

6.राष्ट्रध्वज आयताकार असावा.त्याचे लांबी- रुंदीचे प्रमाण 3:2 असे असावे.

7.ध्वज जमिनीवर ठेवू नये.तसेच ध्वज अर्ध्यावर फडकावू नये.

8. ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवला आहे.त्याच्या समान उंचीवर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवर इतर कोणताही ध्वज फडकवू नये.

9.ध्वजाचा उपयोग ध्वजारोहण व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची सजावट करण्यासाठी, रुमाल सोफ्याचे कव्हर इत्यादी साठी करू नये.

10.ध्वज फडकावताना केशरी रंग वर राहील व हिरवा रंग जमिनीकडे राहील याची दक्षता घ्यावी.
11.ध्वजावर कोणतीही रंगरंगोटी करू नये.काहीही लिहू नये.

12. शहीद जवान वगळता इतर कोणाच्याही मृतदेहाभोवती ध्वज लपेटता येत नाही.


13.
ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.म्हणजेच ध्वजाकडे तोंड करणाऱ्या व्यक्तीच्या डाव्या हाताकडे ध्वज असावा.

14.
ध्वज संहिता 2002 च्या PART III मधील Section IX मध्ये उल्लेख केलेल्या व्यक्ती वगळता इतरांना आपल्या गाड्यांवरती ध्वज फडकावता येणार नाही. उदा. राष्ट्रपती,उप राष्ट्रपती,पंतप्रधान,राज्यपाल इत्यादी व्यक्तीना त्यांच्या गाड्यांवरती ध्वज फडकावण्याची परवानगी असेल.
        एकंदरीत वरील नियमांनी आपल्या राष्ट्रध्वजाचे पावित्र्य टिकून आहे.तरी या नियमांचे पालन करून सर्व भारतीयांनी हर घर तिरंगा अभियान यशस्वी करूया… वंदे मातरम्……
 
ध्वज संहिता पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… CLICK HERE 

 

❇️भारत सरकारचे हर घर तिरंगा थीम साँग
Lyrics & Video
भाषण संग्रह
❇️भारतीय स्वातंत्र्य दिन निमित्त भाषणाची तयारी करताना ही भाषणे नक्की पहा..
♾️➖♾️♾️➖♾️➖♾️➖ 

 
Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 263

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *