2022 या शैक्षणिक वर्षात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत flexibility for innovative intervention उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना एका दिवसाला 6/- रुपये प्रमाणे 46 दिवसांसाठी सहाय्यक पौष्टिक अंश स्वरूपात अंडी अथवा केळी/चिक्की वितरण करण्यासाठी खालील अटी सांगण्यात आल्या आहेत..
बिदर,बळ्ळारी,विजयनगर,कलबुर्गी,कोप्पळ,रायचूर यादगिरी आणि विजापूर जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना 46 दिवसांसाठी सहाय्यक पौष्टिकांश स्वरूपात अंडी अथवा केळी/चिक्की वितरित करण्यासाठी आवश्यक अनुदान 2022-23 सालातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत संबंधित वार्षिक क्रिया योजनेत दिलेल्या अनुमोदनाप्रमाणे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांचा वाटा अनुक्रमे 60:40 प्रमाणे राहील.
बिदर,बळ्ळारी,विजयनगर,कलबुर्गी,कोप्पळ,रायचूर यादगिरी आणि विजापूर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील पहिली ते आठवी पर्यंत शिकणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना 46 दिवसांसाठी सहाय्यक पौष्टिक अंश स्वरूपात अंडी अथवा केळी/चिक्की वितरण करण्यासाठी आवश्यक अनुदान शिर्षक 2202-00-101-0-18 (2202-01 196-6-01) प्रमाणे शिल्लक अनुदानातून देण्यात येईल.
अंडी अथवा केळी/चिक्की खरेदी करण्याची प्रक्रिया शाळास्तरावर राहील तसेच चालू खरेदी नियमानुसार ही प्रक्रिया पूर्ण करावी.
चांगल्या दर्जाची अंडी अथवा केळी/चिक्की खरेदी करावी तसेच त्यांची सुरक्षितता व वितरण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.
शाळा स्तरावरती प्रत्येक दिवशी अंडी अथवा केळी/चिक्की विद्यार्थ्यांना वितरण केलेची माहिती SATS MDM पोर्टल वरती संग्रहित करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे.