तुम्ही काय शिकला
कार्य आणि रचना सारख्या असणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे ऊती‘ होय.
वनस्पती ऊतींचे दोन मुख्य प्रकार–वर्धिष्णू ऊती व स्थायी ऊती होय.
वनस्पतींच्या वाढ होणाऱ्या भागांमध्ये पेशी विभजन करणाऱ्या वर्धिष्णू ऊती असतात.
स्थायी ऊती ह्या वर्धिष्णू ऊतींपासूनच प्रथम निर्माण होतात व नंतर त्यांची विभजनाची क्षमता नष्ट होते. स्थायी ऊतींचे साध्या व संयुक्त ऊती असे वर्गीकरण करतात.
मृदू ऊती, स्थूलकोन ऊती आणि कठिण ऊती हे साध्या ऊतींचे तीन प्रकार आहेत. प्रकाष्ठ व परिकाष्ठ हे दोन संयुक्त ऊतींचे प्रकार आहेत.
अपिस्तर ऊती, संयोगी ऊती, स्नायू ऊती आणि चेतन ऊती या सर्व प्राणी ऊती आहेत.
रचना व कार्यानुसार अपिस्तर ऊतींचे घनाकृती, चपट्या, स्तंभाकृती, प्रकेसलयुक्त व ग्रंथीय अपिस्तर असे वर्गीकरण केले आहे.
अवकाश ऊती, वसा ऊती, अस्थी, कंडर (tendon), संधिबंधन (ligament), कास्थी आणि रक्त हे सर्व संयोगी ऊतींचे प्रकार आहेत.
पट्यांचे, बिन पट्यांचे (गुळगुळीत स्नायू) व हृदयाचे असे स्नायू ऊतींचे तीन प्रकार आहेत.
चेतन ऊती चेतन पेशींनी बनलेल्या असून त्या आवेग (impluse) स्वीकारतात व पाठवितात.
प्रश्न : (पान नं. १०६)
1.ऊती म्हणजे काय ?
उत्तर – पेशींचा असा समूह की ज्यांच्यामधील सर्व पेशींची रचना सारखी असून त्या सर्व एकच ठराविक कार्य करतात.त्यांना ऊती असे म्हणतात.
1.
बहुपेशीय सजीवांमधील ऊतींची उपयुक्तता काय आहे?
उत्तर-
प्रश्न : (पान नं. 63)
1. साध्या पेशींचे प्रकार सांगा.
उत्तर – साध्या पेशींचे प्रकार खालील प्रमाणे –
मृदू
ऊती
स्थूलकोन
ऊती
कठीण
ऊती
2. अग्रस्थ वर्धिष्णू ऊती कुठे आढळतात?
उत्तर –अग्रस्थ वर्धिष्णू ऊती वनस्पतीच्या वरच्या भागात व पानाच्या टोकाला आढळतात.
3. नारळाचे साल कोणत्या ऊतींपासून बनलेले असते?
उत्तर – नारळाचे साल कठीण ऊतींपासून बनलेले असते
4. परिकाष्ठातील घटक सांगा.
उत्तर –
परिकाष्ठ मृदू
परिकाष्ठ
तंतू
चाळण
नलिका
सहचरी
पेशी
प्रश्न : (पान नं. 69)
1.आपल्या शरिराच्या हालचालीसाठी कारणीभूत असणाऱ्या ऊतींचे नाव लिहा.
उत्तर – स्नायू ऊती
2. चेता पूंज (neuron) कशासारखे दिसते ?
उत्तर – चेतन ऊतींच्या पेशींना चेतापुंज असे म्हणतात.
3. हृदयाच्या स्नायूंचे तीन गुणधर्म सांगा.
उत्तर – हृदयाच्या स्नायूंचे अनैच्छिक शाखायुक्त व कधी न थकणारे असे तीन गुणधर्म असतात.
4. अवकाश ऊतींची कार्ये
उत्तर – अवकाश ऊती प्रतिजैविकेचे कार्य करतात.
विजातीय घटकांना गिळून टाकतात.
अवयवांना आधार देतात व बळकट बनवितात.
अभ्यास :
1. ऊतीची व्याख्या लिहा.
उत्तर – एकाच उत्पत्तीपासून निर्माण झालेल्या,एकसारखी रचना व समान कार्य समान गुणधर्म दर्शवणाऱ्या पेशींच्या समूहास ऊती असे म्हणतात.
2.किती प्रकारच्या घटकांपासून प्रकाष्ठ ऊती तयार होतात ?
उत्तर –प्रकाष्ट ऊती चार घटकांपासून बनलेले आहेत.
घटक – प्रकाष्ट तंतू ,प्रकाष्ट मृदू ,प्रकाष्ट वाहीका,
3.वनस्पतीमधील साध्या ऊती आणि संयुक्त ऊतीतील फरक सांगा.
उत्तर –
साध्या ऊती | संयुक्त ऊती |
एकसारखी रचना समान गुणधर्म कार्य पार पाडतात. साध्या ऊती मृदू,स्थूलकोन आणि साध्या ऊती अन्न,पाणी साध्या ऊती वाहिनी वृंद नाहीत. | जैविक व अजैविक घटकापासून बनलेल्या, प्रकाष्ठ आणि परिकाष्ठ असे या ऊतींचे संयुक्त ऊती अन्न व पाण्याचे वहन संयुक्त ऊती वाहिनी वृंद आहेत. |
4.पेशी भित्ती वरून पडणारे ऊती, स्थूलकोन ऊती आणि कठीण ऊतीतील फरक सांगा.
उत्तर –
मृदू ऊती – | स्थूलकोन ऊती | कठीण ऊती |
पातळ पेशीभित्ती
| – पेशी भीती जाडसर लांबट आकाराच्या | पेशीमृत असतात.
पेशीभित्ती पेशीभित्ती जाड |
5. पर्णरंध्राची कार्ये सांगा.
उत्तर – पर्णरंध्राची कार्ये खालीलप्रमाणे –
वायूंची अदलाबदल करण्यास मदत करतात किंवा देवाण-घेवाण करतात.
बाष्प बाहेर टाकतात.
6. तीन प्रकारच्या स्नायू तंतूमधील फरक आकृतीद्वारे सांगा.
उत्तर –
7. हृदयाच्या स्नायूंचे विशेष कार्य लिहा.
उत्तर – हृदयाच्या स्नायूंचे विशेष कार्य खालीलप्रमाणे – या ऊती लांबट,शाखायुक्त,पेशी केंद्र असणाऱ्या आहेत. हे स्नायू अनैच्छिक आहेत. हृदयाचे स्नायू कधी न थकणारे आहेत.
8. रचना व शरिरातील स्नायूमधील फरक सांगा.
उत्तर –
9. चेतन पेशीची आकृती काढून नावे लिहा.
उत्तर –
10. नांवे लिहा
उत्तर –
a) तोंडाच्या आतील भागामधील (अस्तर) स्तरातील ऊती – अपिस्तर ऊती
b) स्नायू व हाडांना जोडणाऱ्या ऊती- स्नायू ऊती
c) वनस्पती मधील अन्नवाहक ऊती – परिकाष्ट ऊती
d) आपल्या शरिरातील चरबी (वसा) साठविणाऱ्या ऊती – वसा
e) द्रवरूप धारणिक असणाऱ्या संयोगी ऊती – रक्त व लिम्फ
f) मेंदूमधील ऊती – चेतन ऊती
11.खालील भागामध्ये आढळणाऱ्या ऊतींचे प्रकार ओळखा. त्वचा, झाडाची साल, हाडे, मूत्रपिंडातील वाहिनीतील अस्तर, वाहिनी वृंद.
उत्तर – त्वचा – अपिस्तर ऊती
झाडाची साल – अपित्वचा
हाडे – अस्थी
मूत्रपिंडातील वाहिनीतील स्तर – धनात्मक अपिस्तर
वाहिनी वृंद – प्रकाष्ट, परिकाष्ट
12.मृदू ऊती कोणत्या भागामध्ये आढळतात ?
उत्तर – मृदू ऊती फूल,फांदी,पान या भागात आढळतात.
13.वनस्पतीमधील अपित्वचेची कार्ये सांगा.
उत्तर – वनस्पतीचे संरक्षण करते. अपित्वचेवरील त्वगरंध्रे पाणी आत बाहेर घेणे,वायूंची देवाणघेवाण पार पाडतात. अपित्वचा वनस्पतींचे कवकांपासून संरक्षण करते.
14. वनस्पती मधील साल (cork) संरक्षणात्मक ऊती म्हणून कसे कार्य करते ?
उत्तर –झाडांच्या सालीमध्ये पेशी मृत असतात.त्या एकमेकांना चिकटलेल्या असतात.पेशी अंतर्गत रिकामी जागा नसते.पेशीभित्ती सुबेरी नावाच्या रासायनिक पदार्थापासून बनलेली असते.त्यामुळे पाणी व स्नायू वायू रोधक असतात.त्यामुळे साल संरक्षणात्मक कार्य पार पडते.
15.खालील तक्ता पूर्ण करा.