विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ
बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
विद्याप्रवेश – दैनंदिन कृती
आठवडा – 2
दिवस – 9
तासिका | कृतींचे विवरण | |
अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज) | कृती:1 पद्धत: · हाय फाईव देत मुलांना वर्गात प्रवेश करण्यास सांगुण हाय टीचर असे म्हणण्यास सांगा.शिक्षकांनी हॅलो……..(मुलांचे नाव) घेत स्वागत करणे. · कदमताल करण्यास सांगणे. | |
गुजगोष्टी | कृती:1 भाजी घ्या भाजी ( ध्येय -1) सामर्थ्य:स्वयंप्रज्ञा, सकरात्मक दृष्टीकोनाची वृद्धी, श्रवण करणे आणि बोलणे. उद्देश:कविता ऐकून साध्या सोप्या प्रश्नांची उत्तरे देणे. पद्धत: दिलेली कविता तालबद्ध व चालीमध्ये अभिनयासहित म्हणणे व त्यानंतर कवितेवर आधारित काही प्रश्न विचारणे. भाजी घ्या ओ भाजी, ताजी ताजी भाजी . चवळी कोवळी कोवळी लिंबे आंबट पिवळी मुळा,गाजर,कांदा, आणला कि हो दादा. काकडी आणि कोथिंबीर, छान होते कोशिंबीर. | |
माझा वेळ (Free Indore play) | दिवस- 9 वा मुले आपल्या आवडत्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करणे. शिक्षकाने नियमावलीप्रमाणे / मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करणे. | |
पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती) | सामर्थ्य:परस्पर संबंध ओळखून जोडी जुळवणे, पर्यावरणाची जागृती. कृती: 15 ओळखून जोडी लावणे.( ध्येय- 3) उद्देश:दोन वस्तूमधील सहसंबध ओळखणे. आवश्यक साहित्य:कुलूप-चावी, मेणबत्ती-काडीपेटी, कप-बशी, तांब्या-मग्ग, खडू-डस्टर, पेन्सील-रबर पद्धत: सुरुवातीला वस्तुमधील परस्पर संबध ओळखून वस्तूच्या जोड्या लावण्यास सांगणे. संग्रहित केलेल्या वस्तू- कुलूप-चावी, मेणबत्ती-काडीपेटी, कप-बशी, तांब्या-मग्ग, खडू-डस्टर, पेन्सील-रबर इत्यादी एकत्रित ठेवून परस्पर संबधित वस्तू शोधण्यास सांगणे.आणि प्रत्येक वस्तूची नावे ओळखणे.प्रथमता वस्तूच्या ढिगामधून पेन्सील बाजूला काढून दाखविणे.नंतर पेन्सीलशी संबधित असलेला रबर बाहेर काढून दाखविणे.अशारितीने एक वस्तू व त्यासंबधीट दुसरी वस्तू ओळखून तुलना करण्यास सांगणे. इयत्ता- 2 री: मुलांनी आपल्याला माहित असलेल्या परस्पर संबधित वस्तूची नावे तोंडी सांगणे. इयत्ता- 3 री मुलांनी वस्तूचे नाव सांगून त्या वस्तूशी परस्पर संबधित वस्तूचे नाव ओळखण्यास प्रोत्साहित करणे.उदा:खडू-फळा *वापरावयाची सराव पत्रके: I.L-6 & 7( इयत्ता 1 ली , 2 री 3 री ) | |
सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये. ( मुलांच्या कृती) | सामर्थ्य : हात व डोळे यांचे समन्वय,लेखनाच्या कौशल्याचा विकास ,सृजनशील अभिव्यक्ती. कृती:कोडी (Puzzle) तयार करणे. ( ध्येय – 1 ) उद्देश: · सूक्ष्म स्नायूंची वाढ होते. · चित्र निवडून संग्रह करण्याचे कौशल्य वृद्धिंगत होणे. · हात व बोटे यांचे कुशलता विकसित करून एकाग्रता वाढविणे.
आवश्यक साहित्य: वर्तमान पत्रे/पुस्तके , रट्ट आणि फेविकॉल पद्धत: आदल्या दिवशीची कृती पूर्ण करून झिगझ्याग पझल तयार करणे. (विविध चित्रे असलेली जुनी पुस्तके/वर्तमानपत्रे मुलांना देणे. त्यामधील मोठी चित्रे कापून रट्ट/ जुन्या रजिस्टर चे कवर/ चार्ट वरती चित्रे चिकटविन्यास सांगणे व त्या चित्रांचा वापर करून पझल तयार करण्यास सांगणे.) टीप: 2 री व 3 री च्या मुलांना स्वतः संग्रहित केलेली चित्रे चार्ट वर चिकटवून स्वतःचे असे एक पझल तयार करण्यास सांगणे. * वापरावयाची सराव पत्रके: H.W.-2 ( इयत्ता 1 ली , 2 री 3 री ) | |
भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता | श्रवण करणे व बोलणे | सामर्थ्य :क्रियात्मक स्व अभिव्यक्ती,ध्वनी संकेत तसेच यमक ची जाणीव, पर्यावरण जागृती, शब्दसंपतीची वृद्धी करणे कृती:3 गाणी, बालगीते, कविता/नाटक ( ध्येय -2) ECL-3 ( 3 ऱ्या दिवसापासून पुढे पूर्ववत करणे) उद्देश: ध्वनी संकेताची ओळख बिंबवणे. ‘यमक’ हि कल्पना रुजविणे. क्रियात्मक अभिवृत्तीला वाव देणे.आपल्या आजूबाजूच्या परिसराशी समन्वय साधने. पद्धत: मुलांना वर्तुळाकार उभे करून शिक्षकांनी 3 ऱ्या दिवशी ओळख करून दिलेले बालगीत अभिनयासहित सादर करून दाखविणे.मुलांनी शिक्षकांचे अनुकरण करणे. *लक्षात ठेवा: *मुले बालगीताचा आनंद घेण्यासाठी योग्य अभिनय व उत्साहाने बालगीत सादर करा. *मुलांना अभिनयासहित बालगीत म्हणण्यास प्रेरित करा. टीप: 2 री व 3 री च्या मुलांनी शिक्षकाचे अनुकरण करत बालगीते तालबद्ध ,चालीमध्ये तसेच अभिनय करीत गायन करणे. गायिलेली गीते लिहिण्यास सांगणे. ( 27 व्या दिवशी पूर्ववत करणे) |
आकलानासहित वाचन | सामर्थ्य :शब्द ओळखणे, मुद्रित लेखनाची ओळख, अर्थग्रहण/आकलन, शब्दसंपतीची वृद्धी कृती- 11-नावांचे विश्व/जग (ध्येय-2) उद्देश: परिचित संदर्भातील वस्तूचा लीपि संकेताशी सहसंबध ओळखणे/लावणे.साहित्य आणि वस्तू एकच आहेत अशा निर्णयापर्यंत येवून वाचनाची आवड निर्माण करणे. आवश्यक साहित्य:वही, कार्डशीट, पेन्सील , क्रेयोन्स, तसेच आपल्या आजूबाजूला डोळ्याला दिसणारया वस्तू. पद्धत: -मुलांच्या सहाय्याने वर्गामध्ये आढळणाऱ्या परिचित वस्तूंच्या नावांच्या पाट्या तयार करणे उदा: टेबल,खुर्ची,दरवाजा इत्यादी. -तयार केलेल्या नावांच्या पाट्या त्या त्या वस्तूवर चिकटविणे. वस्तूच्या नावांच्या दृकपट्ट्याचा(flashcards) आणखी एक संच तयार करून ठेवणे. -वर्गामध्ये दृकपट्ट्या(flashcards) दाखविले असता,मुलांनी मोठ्या आवाजात वाचणे. -शब्दाचा उच्चार करता करता त्या वस्तुजवळ जाण्यास सांगणे. – मुलाला किमान चार पाच वस्तूची नावे सांगण्याची संधी देणे. -चित्रासहीत नामफलक/दृकपट्ट्या तयार करून, वर्गामध्ये मुलांना चित्र पाहून ओळखून वाचण्यास सांगणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांना कथा/पाठातील प्रमुख शब्दांच्या दृकपट्ट्या तयार करण्यास सांगणे.शिक्षकांनी मुलांना कथा/ पाठ देवून वाचण्याची संधी उपलब्ध करून देणे. त्यानंतर दृकपट्ट्या मधील शब्द कथेमध्ये शोधण्यास सांगणे.
| |
उद्देशीत लेखन | सामर्थ्य :सूक्ष्म स्नायू कौशल्याचा विकास, उद्देशीत लेखन कृती-37 चित्र रेखाटून नाव देणे.(ध्येय -2) ECW-3 उद्देश: · सूक्ष्म स्नायू कौशल्याचा वृद्धिंगत करणे. · उद्देशीत लेखन करण्यास सक्षम बनविणे. · आवडते चित्र रेखाटणे. आवश्यक साहित्य: पेपर, क्रेयोन्स, पेन्सील इत्यादी. पद्धत: मुले आपल्या इच्छेनुसार एखाद्या झाडांचे चित्र काढतात.चित्रात रंग भरून नाव देण्यास सुचविणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांना त्यांच्या आवडीच्या झाडाचे चित्र काढून रंग भरून नाव देण्यास सांगणे. | |
मैदानी खेळ |
कृती-23 – चेंडू फेक…..बकेटमध्ये ( ध्येय – 1) सामर्थ्य स्थूल स्नायू चालना कौशल्य विकसित करणे. आवश्यक साहित्य: मोठा चेंडू , बकेट पद्धत: चेंडू थोड्या अंतरावर ठेवलेल्या बकेटमध्ये टाकण्यास प्रोत्साहित करणे. कृतीच्या कोणत्या तरी एका टप्प्यात प्रत्येक मुल यशस्वी होईल अशापद्धतीने प्रोत्साहित करणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांना जास्त अंतरावर बकेट ठेवून खेळ घेणे. | |
रंजक कथा | शीर्षक : मित्रांची कथा आवश्यक साहित्य : चित्रमालिका उद्देश: · ऐकण्याचे कौशल्य विकसित करणे. · कल्पक वृत्ती वृद्धिंगत करणे. · तार्किक शक्ती वाढीस लावणे. · प्रश्न विचारण्याचे कौशल्य विकसित करणे. पद्धत – काडी चित्र Ø काडी चित्राचा वापर करून कथा समय मनोरंजनात्मक बनविणे. (कथेचा आनंद घेण्याबरोबर , मुले कथा योग्यरीत्या श्रवण करत असल्याची खात्री करून घेणे.) | |
पुन्हा भेटू | · दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे. · दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे. · दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे. · ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे. |