विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ
बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
विद्याप्रवेश – दैनंदिन कृती
आठवडा -2
दिवस – 9
तासिका | कृतींचे विवरण | |
अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज) | कृती:1 – चला उडूया पक्ष्याप्रमाणे साहित्य: ड्रम पद्धत – 7 व्या दिवशी घेतलेली कृती 1 पुनरावर्तीत करणे. कृती:2 ऐका व प्रतिसाद/प्रतिक्रिया दे.मुलांना वर्तुळाकार उभे करून सूचना स्पष्ट करा.खाली दिलेल्या सूचना लयबद्धरित्या उच्चारून कृती करण्यास सांगा.सूचना 1. Stand up! (उभे) 2. Clap your hands (टाळी वाजवा) 3. Turn around (गोल फिरा) 4. Clap your hands! (टाळी वाजवा) 5. Sit down (खाली बसा) 6. Clap your hands (टाळी वाजवा) 7. Wave your hands (हवेमध्ये हात झुलवा) | |
गुजगोष्टी | दिवस 2 रा मधील ‘गुजगोष्टी’ या विभागातील कृतीच करणे. | |
माझा वेळ (Free Indore play) | दिवस- 8 वा मुले आपल्या आवडत्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करणे. शिक्षकाने नियमावलीप्रमाणे / मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करणे. | |
पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती) | सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये व सृजनशीलता यांचा विकास, डोळे व हात यांच्यामधील समन्वय. कृती-चित्र चीकटविणे ध्येय -1 उद्देश : · सूक्ष्म स्नायूंची वाढ होते. · चित्र निवडून संग्रह करण्याचे कौशल्य वृद्धिंगत होणे. · हात व बोटे यांचे कुशलता विकसित करून एकाग्रता वाढविणे. आवश्यक साहित्य: वर्तमान पत्रे/पुस्तके , रट्ट आणि फेविकॉल पद्धत: मुलांना वर्तुळाकार बसविणे. विविध चित्रे असलेली जुनी पुस्तके/वर्तमानपत्रे मुलांना देणे. त्यामधील मोठी चित्रे कापून रट्ट/ जुन्या रजिस्टर चे कवर/ चार्ट वरती चित्रे चिकटविन्यास सांगणे. त्यानंतर चिकटविलेल्या चित्रावर उभ्या आडव्या (वक्ररेषा) काढण्यास सांगणे. सुलभकाराने हि चित्रे वापरून पझल तयार करणे आणि ते खेळविणे. पझल तयार करण्यासाठी टाकावू वस्तूंचा वापर करून खेळणी तयार करण्यात मुलांना गुंतविणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांना स्वतः चित्रे कापून रट्टवर चिकटविन्यास सांगणे.व त्याविषयी आपल्या भाषेत मत व्यक्त करण्यास सांगणे. वापरावायची वर्कशिट्स I.L-5 ( इयत्ता 1,2,3) | |
सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये. ( मुलांच्या कृती) | सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये व सृजनशीलता यांचा विकास, डोळे व हात यांच्यामधील समन्वय. कृती-चित्र चीकटविणे ध्येय -1 उद्देश : · सूक्ष्म स्नायूंची वाढ होते. · चित्र निवडून संग्रह करण्याचे कौशल्य वृद्धिंगत होणे. · हात व बोटे यांचे कुशलता विकसित करून एकाग्रता वाढविणे. आवश्यक साहित्य: वर्तमान पत्रे/पुस्तके , रट्ट आणि फेविकॉल पद्धत: मुलांना वर्तुळाकार बसविणे. विविध चित्रे असलेली जुनी पुस्तके/वर्तमानपत्रे मुलांना देणे. त्यामधील मोठी चित्रे कापून रट्ट/ जुन्या रजिस्टर चे कवर/ चार्ट वरती चित्रे चिकटविन्यास सांगणे. नंतर चिकटविलेल्या चित्रावर उभ्या आडव्या वक्ररेषा (Zigzag) काढण्यास सांगणे. सुलभकाराने हि चित्रे वापरून पझल तयार करणे आणि ते खेळविणे. पझल तयार करण्यासाठी टाकावू वस्तूंचा वापर करून खेळणी तयार करण्यात मुलांना गुंतविणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांना स्वतः चित्रे कापून रट्टवर चिकटविन्यास सांगणे.व त्याविषयी आपल्या भाषेत मत व्यक्त करण्यास सांगणे. |
भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता | श्रवण करणे व बोलणे | सामर्थ्य : ध्वनी शास्त्राची ओळख, शब्दभांडाराची वृद्धी, चालना कौशल्यांचा विकास होतो. कृती : 15 लयबद्ध शब्द ऐकणे ( ध्येय -2 ) ECL-4 ( 4 थ्या दिवशीची या विभागातील कृती पुढे सुरु ठेवणे) उद्देश: · ध्वनिशास्त्राची ओळख करून देणे. · लयबद्ध शब्दांच्या माध्यमातून शब्दभांडार वाढविणे. · स्थूल तसेच सूक्ष्म स्नायू चालना कौशल्य विकसित करणे. पद्धत: मुलांना 4 थ्या दिवशी म्हणून घेतलेली बालगीते पुन्हा म्हणून घेणे.बालगीते गातेवेळी लयबद्ध शब्दावर थोडा जास्त जोर देणे. बालगीताला साजेसा अभिनय करण्यास सांगणे.जोर देवून म्हटलेले लयबद्ध शब्द वैयक्तिकरित्या म्हणून घेणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांनी शिक्षकाचे अनुकरण करत बालगीते तालबद्ध ,चालीमध्ये तसेच अभिनय करीत गायन करणे. गायिलेली गीते लिहुण्यास सांगणे.(14 व्या दिवशी पूर्ववत करणे.) |
आकलनासहित वाचन | सामर्थ्य : शब्दभांडाराची वृद्धी, स्व-अभिव्यक्ती,घटना/संदर्भ समजून घेणे. कृती-चित्र वाचणे.(ध्येय -2 ) उद्देश: विविध घटना/संदर्भ यांची चित्रे पाहून घटना किंवा संदर्भ स्पष्ट/वर्णन करणे. आवश्यक साहित्य: विविध घटना/स्थळ/जत्रा/मेळावे यांची चित्रे,बाग/बाजार/शाळा/प्राणी संग्रहालय/सन इत्यादींची चित्रे पद्धत: दिवस-4 मधील ‘चित्र वाचन’ हि कृती पुढे चालू ठेवून मुलांचे गट करून पूर्वी वापरलेले संदर्भ चित्रे देणे.त्यानंतर त्या चित्रांचे निरीक्षण करून त्यामधील संदर्भाचे वर्णन करणे आणि घटना वाचण्याची कृती करण्यास सांगणे टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना घटना/संदर्भ मुलांच्या अनुभवाशी जोडून वर्णन करण्यास सांगणे. | |
उद्देशीत लेखन | सामर्थ्य : हात व डोळे यांचे समन्वय,लेखनाच्या कौशल्याचा विकास ,सृजनशील अभिव्यक्ती. कृती-मुक्त चित्र रेखाटणे (ध्येय -2 ) ECW-6 उद्देश: · लेखनाचे प्रारंभिक कौशल्ये रुजविणे. · डोळे व हात या मधील समन्वय वृद्धिंगत करणे. · क्रियात्मक अभिव्यक्तीला वाव देणे. आवश्यक साहित्य:पाटी, पेन्सील/खडू पद्धत:पाटी वर मुक्तपणे लिहिण्यास,आपल्याला जे वाटते ,ते रेखाटण्याची संधी देणे.त्यांच्या लेखनाविषयी त्यांना बोलण्याची संधी देणे.प्रश्नांच्या द्वारे लेखनाबद्दल माहिती घेणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना त्यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्राविषयी बोलण्यास सांगणे. | |
मैदानी खेळ | Day 8 कृती:- 20 (a) चेंडू वर व खाली फेकणे.(ध्येय -1 ) सामर्थ्य: स्थूल स्नायू चालना कौशल्य विकसित करणे. आवश्यक साहित्य: चेंडू पद्धत: · मुलांना वर्तुळाकार बसवून चेंडू वर फेकण्यास सांगून पुन्हा पकडण्यास सांगणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना चेंडू वर फेकून पकडण्यास सांगणे तसेच जमिनीवर उसळी मारून पकडण्यास सांगणे. | |
रंजक कथा | Ø रंजक कथा पहिल्या/आदल्या दिवशीच्या उद्देशान्वये रंजक कथा सुरु ठेवणे. Ø Ø कथाकथन Ø शिक्षकांनी कथा कथन करण्याबरोबरच मुलांना प्रत्यक्षरीत्या सहभागी करून घेवून कथा पूर्ण करणे.उदा:कोणी काय म्हटले?त्यानंतर काय झाले?असे प्रश्न विचारणे कथा पूर्ण झाल्यानंतर साधे प्रश्न विचारणे. PÀxÉAiÀÄ£ÀÄß ºÉýzÀ £ÀAvÀgÀ ¸ जोरदार भांडण कोणाचे झाले? * सूर्याने कोणती युक्ती काढली? *शेवटी कोणाचा पराभव झाला? * गोष्टीचे तात्पर्य काय? (कथेचा आनंद घेण्याबरोबर , मुले कथा योग्यरीत्या श्रवण करत असल्याची खात्री करून घेणे.) | |
पुन्हा भेटू | · दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे. · दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे. · दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे. · ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे. |
00