विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम ‘खेळता खेळता शिक’ या तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे.उदाहरणार्थ
बाहुल्या,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे.
शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे.
विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच
विद्याप्रवेश – दैनंदिन कृती
आठवडा – 2
दिवस – 10
तासिका | कृतींचे विवरण | |
अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज) | 7 व्या दिवशी केलेली कृती पुनरावर्तीत करणे. | |
गुजगोष्टी | 9 व्या दिवशी सादर केलेले बालगीत पुन्हा म्हणणे व खालील काही साधे प्रश्न मुलांना विचारून उत्तरे मिळविणे. नमुना प्रश्न: · या गीतातील भाज्यांची नावे सांगा. · तुला कोणती भाजी आवडते? · तू मुळा पहिला आहेस का? · चवळी कशी आहे? | |
माझा वेळ (Free Indore play) | दिवस- 10 वा मुले आपल्या आवडत्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करणे. शिक्षकाने नियमावलीप्रमाणे / मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करणे. | |
पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती) | सामर्थ्य : तुलना , पर्यावरणाची जाणीव, रंगाची कल्पना, आकार-आकारमान कृती- 12 मला ओळखशील का? (ध्येय -3) उद्देश: वस्तूचा आकार, आकारमान आणि रंग यावर आधारित जोड्या जुळविणे. आवश्यक साहित्य : अवतीभोवती असलेल्या विविध वस्तू, ब्लॉक्स, खडे, बाटलीचे कॅप्स, लिंबू, चेंडू इ. पद्धत : एकसारख्या वस्तू ओळखण्यासाठी मुलांना 8-10 वस्तू देणे.मुले हि कृती गटामध्ये करू शकतात.प्रत्येक गटाला ब्लॉक्स, खडे, बाटलीचे कॅप्स, लिंबू, चेंडू अशा वस्तू देवून त्यातील बाटलीचे कॅप्स शोडण्यास सांगणे.दिलेल्या वस्तुंचा आकार,आकारमान, रंग इत्यादी गुणलक्षनाच्या आधारे तुलना करण्यास सांगणे.तसेच विभिन्न प्रकारच्या वस्तू देवून त्या वस्तू एकमेकांशी कशा वेगळ्या आहेत हे समजून घेण्यास सांगणे. टीप: 2 री च्या मुलांना वरीलप्रमाणे कृती करवून घेणे. 3 रीच्या मुलांना 10 ते 15 वस्तू गटामध्ये देवून त्यांचे आकारमान, आकार, रंग इ. आधारे जुळवण्यास सांगणे. * वापरावयाची सराव पत्रके: I.L-8 & 9 ( इयत्ता 1 ली , 2 री 3 री ) | |
सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये. ( मुलांच्या कृती) | सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये व सृजनशीलता यांचा विकास, डोळे व हात यांच्यामधील समन्वय. कृती -34 आकृती चिकटविणे/मला शोध. (ध्येय 1 व 3 ) उद्देश · कात्री योग्यरीत्या हातात पकडून आकृती/पेपर कापण्याची पद्धत समजून घेणे. · हात व बोटांचे कौशल्य विकसित होण्याबरोबरच एकग्रता वाढविणे. · वस्तूंची तुलना करण्यास शिकणे. आवश्यक साहित्य: 1.कात्री, रंगीत पेपर, फेविकोल 2.खडू, पेन्सील, पुस्तके, खडे/बिया/पिशवी( वस्तू 3 पेक्षा अधिक असाव्यात) पद्धत: 1.पांढऱ्या पेपर वर विविध आकृत्या ( वर्तुळ, त्रिकोण, चौकोन, आयत ) कापून दुसऱ्या रंगीत कागदावर चिकटविन्यास सांगणे. 2.शिक्षकांनी मुलाला एक वस्तू द्यावी.त्यासारख्या दिसणाऱ्या / त्यासंबधित वस्तू वर्गामध्ये शोधण्यास सांगणे.हा खेळ विविध वस्तूच्या सहाय्याने पुनरावर्तीत करणे. तसेच सुलभकाराने जमिनीवर दोन वर्तुळ काढून त्यांना A व B अशी नाव देणे. व शिक्षकाने दिलेली वस्तू A गटात व मुलांनी शोधलेल्या वस्तू B वर्तुळात ठेवण्यास सांगणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांना वस्तू शोधून त्यांची तुलना करून जोड्या जुळवण्यास सांगून हा खेळ खेळणे. |
भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता | श्रवण करणे व बोलणे | सामर्थ्य :ध्वनीशास्त्राची ओळख, अक्षर व उच्चार/आवाज यांचा समन्वय. कृती -20 नावाच्या पहिल्या अक्षरावरून वस्तू ओळखणे. (ध्येय-2) ECL-2 (2 ऱ्या दिवसापासून पुढे पूर्ववत करणे) उद्देश : *ध्वनिशास्त्राची ओळख रुजविणे. *अक्षर व त्यांचा उच्चार मधील सहसंबध ग्रहण करणे. *अंताक्षरी शब्द लिहिणे. सुचविलेला विषय- फळे. पद्धत : विविध कोडी वापरून मुलांना फळांची नावे तर्क करून सांगण्यास प्रोत्साहित करणे.उदा: शिक्षकाने “ माझ्या मनात असलेले फळ हिरव्या रंगाचे असून त्याचे पहिले अक्षर द्रा असे आहे” तर ते फळ कोणते? असे विचारून योग्य उत्तर मिळविणे. अशाप्रकारे विविध कोडी/उदाहरणे देणे. टीप: 2 री व 3 री च्या मुलांना शब्दांच्या पुढील भाग म्हणजे वाक्य रचतील किवा साधी वाक्ये रचतील अश्याप्रकारे कृती पुढे चालू ठेवणे. (22 व्या दिवशी पुढे पूर्ववत करणे) *वापरावयाची सराव पत्रके: EC-2 ( इयत्ता 1 ली , 2 री 3 री )
|
आकलनासहित वाचन | सामर्थ्य :शब्दसंपत्तीची वृद्धी, स्व-अभिव्यक्ती, घटना/संदर्भ वाचतात. कृती -1 A तर्कवाचन ( ध्येय-2) उद्देश: पुस्तकातील चित्र संदर्भ/ चित्र कथा पाहून योग्य अर्थ लावून अभिव्यक्त करणे. आवश्यक साहित्य : सचित्र कोश, चित्रकथांचे पुस्तक पद्धत : मुले चित्रकथेचे पुस्तक/कोश पाहून त्यामधील घटना/ संदर्भानुसार नक्कल करून वाचन करणे.टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना चित्रकथा/चित्रसंदर्भ साहित्याशी संबध जोडून सहजरीत्या वाचनात व्यक्त करण्यास सांगणे. | |
उद्देशीत लेखन | सामर्थ्य : लेखन कौशल्य,सृजनशीलता यांचा विकास, डोळे व हात यांच्यामधील समन्वय. कृती-2 मुक्त हस्त चित्र रेखाटने. ECW-6 (ध्येय -2) उद्देश : · लेखनाचे प्रारंभिक कौशल्ये रुजविणे. · डोळे व हात या मधील समन्वय वृद्धिंगत करणे. · क्रियात्मक अभिव्यक्तीला वाव देणे. आवश्यक साहित्य:पाटी, पेन्सील/खडू पद्धत: पाटी वर मुक्तपणे लिहिण्यास,आपल्याला जे वाटते ,ते रेखाटण्याची संधी देणे. त्यांच्या लेखनाविषयी त्यांना बोलण्याची संधी देणे. प्रश्नांच्या द्वारे लेखनाबद्दल माहिती घेणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना त्यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्राविषयी 4-5 वाक्ये बोलण्यास सांगणे | |
मैदानी खेळ | कृती – 24- चेंडू आपटून (Bounce) पकडणे. (ध्येय -1) सामर्थ्य :स्थूल स्नायू चालना कौशल्य विकसित होते. आवश्यक साहित्य: चेंडू. पद्धत: मुलांना समोरासमोर उभे करून एकेकट्याने चेंडू जमिनीला आपटून उडवण्यास सांगून पकडणे. टीप:इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना चेंडू निर्दिष्ट मुलाकडे फेकण्यास सुचविणे.चेंडूचा आकार बदलू शकता. | |
रंजक कथा | शीर्षक : मित्रांची कथा आवश्यक साहित्य: मुखवटे उदेश : Ø श्रवण कौशल्य वृन्दिंगत करणे. Ø तर्क करण्याचे कौशल्य वाढीस लावणे. Ø विचार शक्तीचा विकास करणे. Ø प्रश्नमनोभाव निर्माण करणे.
Ø पद्धत: बाहुल्या
बाहुल्यांचा उपयोग करून रंजक कथा हि तासिका मनोरंजनात्मक बनविणे.मोठ्या मुलांना सहभागी करून घेवून त्यांना विविध पात्रे देवून अभिनय सादर करणे. कथा सांगितल्यानंतर विविध प्रश्न विचारावे. (कथेचा आनंद घेण्याबरोबर , मुले कथा योग्यरीत्या श्रवण करत असल्याची खात्री करून घेणे.) | |
पुन्हा भेटू | · दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे. · दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे. · दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे. · ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे. |