VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -2 DAY – 7 (विद्याप्रवेश – दैनंदिन कृती)




 

         विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम
खेळता खेळता शिकया तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे
.उदाहरणार्थ
बाहुल्या
,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके
,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत
.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे
.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत
.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा
.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे
.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे
.




विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश – दैनंदिन कृती

आठवडा  

दिवस –  7    

तासिका

कृतींचे विवरण

अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)

(शिक्षकांचे मुलांसोबत हितगुज)

 

कृती 1 : चला उडूया पक्ष्याप्रमाणे

साहित्य: ड्रम

पद्धत:

पक्ष्याप्रमाणे उडण्याची नक्कल करत वर्गात प्रवेश करण्यास विद्यार्थ्यांना सांगणे.व शिक्षकांना “हाय टीचर” असे म्हणण्यास सांगणे.

शिक्षकाने हॅलो…………..(विध्यार्थ्याचे नाव ) घेत त्यांचे स्वागत करणे.

·                   Lef̧t right left असे म्हणत मार्च पास्ट करत वर्गात वर्तुळाकार थांबण्यास सांगणे. कृती आकर्षक वाटावी यासाठी ड्रम चा वापर करावा. (विध्यार्थी आपले गुडघे व्यवस्थितरित्या वाकवितात याची खात्री करा तसेच त्यांचे पाय जमिनीला स्पर्श करत आहेत याचीही खात्री करा)

कृती 2: लाल, पिवळा, हिरवा ( ट्राफिक सिग्नल)

आवश्यक साहित्य : ट्राफिक सिग्नलचे मॉडेल / लाल , पिवळा, हिरव्या रंगाचे कार्ड्स

·                   हि कृती दिलेल्या सूचनांचे पालन करत वर्तुळाकार उभे राहून करावी.

·                   ‘पिवळा दिवा” असे ऐकल्यानंतर/पाहिले असता विध्यार्थी वर्तुळाकार चालतील .

·                   ‘हिरवा दिवा’ असे ऐकल्यानंतर/पाहिले असता पक्ष्याप्रमाणे विध्यार्थी उडण्याची नक्कल करतील.

·                     ‘लाल दिवा’ असे ऐकल्यानंतर/ पाहिले  असता एकाच जागी थांबून हसतील.

·                     हि कृती 3-4 वेळा करावी.

गुजगोष्टी

पहिल्या दिवसाच्या गुजगोष्टी करणे.

माझा वेळ (Free Indore play)

मुले आपल्या आवडत्या अध्ययन कोपऱ्यात जावून कृती करणे.

 शिक्षकाने मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करणे.

पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती)

सामर्थ्य : शब्दांची ओळख,स्मरण आणि पर्यावरणाची जाणीव.

कृती  2 : ऐक व सांग ( ध्येय – 3 )

उद्देश : विविध ध्वनी ऐकणे.

आवश्यक साहित्य: मोबईल,टेप रेकॉर्डर

पद्धत : मुलांना विविध गटात बसण्यास सांगणे.प्रत्येक गटातील विध्यार्थी श्रवण उपकरणांच्या सहाय्याने प्राण्यांचे आवाज ऐकून ते आवाज कोणत्या प्राण्याचे हे ओळखणे.प्रत्येक विध्यार्थ्याला संधी मिळेपर्यंत कृती सुरु ठेवणे.

वर्ग – 2 , 3

1.शिक्षकाने विविध प्राणी व पक्ष्यांचे आवाज काढून ते ओळखण्यास सांगणे.

2. प्राणी व पक्ष्यांच्या आवाजाची नक्कल करण्यास सांगणे.

 

सृजनशीलता आणि सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये.

( मुलांच्या कृती)

सामर्थ्य : सूक्ष्म स्नायू चालना कौशल्ये व सृजनशीलता यांचा विकास, डोळे व हात यांच्यामधील समन्वय, आकारांची कल्पना.

कृती  33 – ट्रेस करणे ( वाळूमध्ये )  ध्येय – 1

उद्देश

·         सूक्ष्म स्नायूंची वाढ होते.

·         डोळे व हात यांच्यामधील समन्वय साधने.

·         लेखनासाठी पूरक कृती होते साहित्य – वाळू

·         पद्धत : मुलांना एका ट्रे मध्ये वाळू देणे. वाळूवरती लिहिण्यासाठी लहान काडी देणे.वाळूवरती विविध वक्राकार रेषा काढण्यास सांगणे.

·         इयत्ता 2 व 3 री च्या मुलांना सरळ रेषा व वक्राकार रेषा वापरून आपल्याला आवडते चित्र काढण्याची संधी देणे.

भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता

श्रवण करणे व बोलणे

सामर्थ्य :श्रवण कौशल्य, सृजनशीलता,स्व-अभिव्यक्ती,  औपचरिक संभाषण  

कृती:8 उत्स्फूर्त भाषण (ध्येय-2) ECL-6

उद्देश: *निवडलेल्या विषयावर अस्खलितपणे बोलणे.

*औपचरिक संभाषणाचे कौशल्य विकसित करणे.

* श्रवण केलेल्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करणे.

* सृजनशील स्व-अभिव्यक्तीला वाव देणे.

आवश्यक साहित्य: प्राणी, पक्षी, वाहने यांची चित्रे/दृकपट्या, डब्बा/बॉक्स

*पद्धत :डब्ब्यामध्ये प्राणी, पक्षी, वाहने यांची चित्रे/दृकपट्या ठेवणे.मुलांना एक दृकपट्टी उचलण्यास सांगणे.व त्यामधील असलेल्या चित्रावर आपले मत व्यक्त करण्याची संधी देणे.

*इयत्ता 2 रीच्या मुलांना 2-3 मिनिटांचा अवधी देणे.

*इयत्ता 3 रीच्या मुलांना निवडलेल्या विषयासंबधी दैनंदिन वापर ,फायदे/तोटे इ.अंशावर बोलण्यास सांगणे.  

आकलानासहित वाचन

सामर्थ्य:मुद्रित पाठाची ओळख, शब्द ओळखणे, अर्थग्रहण, शब्द्संपतीची वृद्धी आणि पर्यावरणाची जाणीव  

चित्र संग्रह ( ध्येय-2) विषय:तुम्ही पाहिलेल्या बागेतील वस्तू. उद्देश : चित्रातील वस्तू/व्यक्ती/घटनाना नावे देणे,अंदाज बांधणे, समजून घेवून पाठ्याक्रमाशी संबध जोडणे.

·       मुलांनी चित्र वाचून चर्चा करणे, अर्थ समजून घेवून वैयक्तिक चित्रसंग्रह तयार करणे.आणि वैयक्तिक तसेच समूहामध्ये सादरीकरण करणे. गटामध्ये बसून भित्तीपत्रके तयार करणे.

आवश्यक साहित्य: मुलांनी स्वतः काढलेली चित्रे.

पद्धत: ‘तुम्ही पाहिलेल्या बागेतील वस्तू /विषयासंबंधी मुलांनी काढलेली चित्रे कृती संचयीका मधून काढून त्यावर सहजरीत्या बोलण्यास प्रोत्साहित करणे.शिक्षकांनी 2 री व 3 री च्या मुलांनी 1 लीच्या मुलांना सोबत घेवून विषयावर विस्तृत चर्चा करणे.चर्चेदरम्यान सर्व मुलांनी मत व्यक्त केल्याची खात्री करणे.तसेच 2 री व 3 री च्या मुलांना स्वतंत्ररित्या बोलण्यास संधी देणे. (‘तुम्ही पाहिलेल्या बागेतील वस्तू /विषयासंबंधी- या कृतीचा पुढील/उर्वरित भागच 11 व्या दिवशी पुढे सुरु ठेवणे.  

उद्देशीत लेखन

सामर्थ्य:प्रारंभिक लेखन कौशल्ये,लेखनाकडे कल वाढविणे.

कृती:पहा व रेखाटा ((ध्येय-2)  ECW-1

उद्देश

*लेखनाचे प्रारंभिक कौशल्ये रुजविणे.

*लेखनाविषयी आवड / कल वाढविणे.

*आवश्यक साहित्य: वर्तमान पत्रे, रिकामी पाने, क्रेयोन्स पेन्सिल इत्यादी.

पद्धत: मुलांना : वर्तमान पत्रे/ रिकामी पाने देणे.त्यांना त्यांच्या इच्छेनुसार रेखाटण्यास /लिहिण्यास सांगणे.सर्व मुलांनी लिहिलेले/ रेखाटलेले चित्र सर्वांना दाखवून प्रोत्साहित करणे.2 री व 3 री च्या मुलांना अक्षर/अंक वापरून चित्र रेखाटण्यास प्रेरित करणे.

मैदानी खेळ

 

कृती: बुट्टीमध्ये चेंडू फेक  (ध्येय-1)

सामर्थ्य:स्थूल स्नायू चालना कौशल्य विकसित करणे.

आवश्यक साहित्य: 10 ते 20 चेंडू

पद्धत: एक बुट्टी थोड्या अंतरावर ठेवणे.

एका ठराविक अंतरावर रेषा ओढणे.

मुलांना त्या रेषेवर थांबून एकेक चेंडू बुट्टीमध्ये टाकण्यास सांगणे.इयत्ता 2 री व 3 री च्या मुलांना बुट्टीचे रेषेपासून अंतर थोडे वाढवून खेळ खेळणे.

00


रंजक कथा

शीर्षक:सूर्य आणि वारा

Ø  आवश्यक साहित्य: कथा साहित्य.

उद्देश:

Ø ऐकण्याचे सामर्थ्य वृद्धिंगत करणे.

Ø

कथाकन

कल्पक वृत्ती वाढविणे.

पद्धत:

 

 

Ø शिक्षकांनी कथा सांगण्यापूर्वी वाचून अर्थ समजून घेणे.

Ø योग्य हावभावसहित सोप्या भाषेमध्ये कथा सांगावी.

Ø कथा सांगतेवेळी मुलांना वर्तुळाकार बसविणे.

Ø साधे सोपे प्रश्न विचारून कथा समजून घेण्यास मदत करणे.

                                                                          कथा                     

एके काळी… सूर्य आणि वारा यांच्यामध्ये भांडण झाले की कोण अधिक सामर्थ्यवान आहे? वारा जोरदार असल्याचे सांगत होता, परंतु सूर्य स्वतःस महान मानत होता. प्रकरण खूप गुंतागुंतीचे होत चालले होते.

मग त्याला समोर एक प्रवासी येताना दिसला. प्रवासी पाहून वाऱ्याला एक युक्ती सुचली. तो सूर्याला म्हणाला, “बघ, एक प्रवासी येत आहे. आपल्यातील जो कोणी त्या प्रवाश्याच्या अंगावरील चादर हटवू शकेल तो शक्तिशाली असेल.” सूर्य तयार झाला.

सूर्य ढगांच्या मागे लपला. वारा जोरात वाहू लागला. वाऱ्याचा वेग जितका वेगवान होत असे तितका तो प्रवाशी चादर घट्ट पकडत असे. खूप वेळ प्रयत्न करून वर आता थकला होता. पण तरी त्याला प्रवाशाची चादर हटवता आली नाही. अखेर तो शांत झाला.आता सूर्याची वेळ होती. ढगांच्या मागून बाहेर आला वर तो चमकू लागला. कडक उन्हाने त्रस्त झालेल्या प्रवाशाने   चादर लगेच काढून टाकली. वाऱ्याने पराभव स्वीकारला आणि सूर्य विजयी झाला.

प्रश्न:*जोरदार भांडण कोणाचे झाले?   * सूर्याने कोणती युक्ती काढली?   *शेवटी कोणाचा पराभव झाला?

* गोष्टीचे तात्पर्य काय?

(कथेचा आनंद घेण्याबरोबर , मुले कथा योग्यरीत्या श्रवण करत असल्याची खात्री करून घेणे.)

पुन्हा भेटू

·        दिवसभरात केलेल्या कृती पुनरावर्तीत करणे.

·        दिवसभरात केलेल्या कृती पालकांशी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत चर्चा करण्यास प्रोत्साहित करणे.

·        दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने शाळेत यावीत, यासाठी एक आनंददायी संदर्भ निर्माण करून मुलांना निरोप देणे.

·        ‘तू करून बघ’ हि कृती करण्यासाठी योग्य योजना आखणे.

 



 

Share with your best friend :)