2022-23 सालातील विद्यार्थ्यांची माहिती SATS पोर्टलवर नोंद करणेबाबत…
परिपत्रक दि. 09/05/2022
23/02/2022 रोजीच्या आदेशानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्ष दि. 09-04-2022 रोजी संपत असल्याने इयत्ता 1ली ते 9वी वर्गाच्या वार्षिक परीक्षा व इतर शैक्षणिक उपक्रम यांची SATS वर नोंद करणेसाठी वेळापत्रक जाहीर केले होते.त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळेचे निकाल दि. 09-04-2022 ते 16-04-2022 या कालावधीत SATS वर घोषित करणेस सांगण्यात आले होते.पण अजूनही बरीच माहिती अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.
दि.20-04-2022 रोजीच्या परिपत्रकानुसार 2022-23 या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक उपक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार 2022-23 हे शैक्षणिक वर्ष दि. 16-05-2022 पासून सुरु होणार आहे.या पार्श्वभूमीवर खालील वेळापत्रकानुसार 2022-23 सालातील विद्यार्थ्यांची माहिती SATS पोर्टलवर अद्यावत करणेस योग्य ती कार्यवाही करावी.
अ.नं. | विवरण | दिनांक |
1 | अपूर्ण निकाल SATSवर अपडेट करणे | अंतिम दिनांक 14.05.2022 |
2 | SATSवर Promote Student करणे. | अंतिम दिनांक 14.05.2022 |
3 | SATSवर विद्यार्थ्यांचे Transfer Certificate issue | 16.05.2022 ते 31.07.2022 |
4 | पास झालेले विद्यार्थी व नवीन विद्यार्थ्यांची SATSवर नोंद करणे. | 16.05.2022 ते 31.07.2022 |
अधिकृत आदेश खालीलप्रमाणे –