शिक्षक/अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा माहिती शिक्षक मित्र पोर्टल वर अद्यावत करणेबाबत….
आदेश दि. 05/05/2022
कांही महत्वाचे मुद्दे खाली देण्यात आले आहेत…
राज्यातील सर्व सरकारी प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा माहिती अद्यावत करण्याची सुविधा शिक्षक मित्र (EEDS) पोर्टलवर सुरू करण्यात आलेली आहे.शिक्षक मित्र (EEDS) पोर्टलवर शिक्षक/अधिकारी/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा माहिती पूर्णपणे अद्यावत झाली नसल्याने खालील सूचनांचा विचार करून दिलेल्या कालावधी पूर्वी हे कार्य पूर्ण करणे.
1.2021-22 सालातील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याने बदली झालेल्या शिक्षक/अधिकारी/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा माहिती EEDS पोर्टलवर अपडेट करणे.
2. शिक्षण विभागातील सर्व शिक्षक/अधिकारी/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवा तपशील (पदोन्नती, सेवानिवृत्ती,मृत्यू, स्वनिवृत्त) EEDS पोर्टलवरमध्ये अपडेट करणे.
3. शिक्षण विभागातील सर्व शिक्षक/अधिकारी/शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सेवा तपशिलांमध्ये अनेक त्रुटी आहेत.(भरती पद्धती,PP Declaration, सद्याचा हुद्दा इ.) या त्रुटी दुरुस्त करून सर्व सेवा माहिती EEDS पोर्टलवरमध्ये अपडेट करणे.
EEDS पोर्टलवरमध्ये सर्व शिक्षक/अधिकारी/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अपूर्ण व चुकीची माहिती अपडेट करण्यासाठी 16.05.2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
वरील मुद्यांना अनुसरून संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकामध्ये असलेल्या माहिती प्रमाणे EEDS पोर्टलवर सेवा माहिती अद्यावत करणे सक्तीचे असून ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे.दिलेल्या निर्दिष्ट वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी त्यास जबाबदार राहतील EEDS पोर्टलबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास कृपया karonlineserviceshelp@gmail.com या ई-मेलवर कळवणे.