दहावी बोर्ड परीक्षा २०१९ व २०२० मध्ये प्रश्नपत्रिकेत आलेल्या प्रश्नांची यादी
STATE – KARNATAKA
EXAM – SSLC
BOARD – KSEEB,BANGALORE.
SUBJECT – SCIENCE
CATEGORY – QUESTIONS ASKED PREVIOUS EXAM
March/April 2019 SSLC EXAMINATION Science
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 5 x 3 = 15
35. बहिर्वक्र भिंगामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमांची
रेषीय ( किरण ) आकृती काढा जेव्हा वस्तू खालीलप्रमाणे ठेवल्या आहेत :
(i) बिंदू F1 वर
(ii) 2F1 च्या पुढे
36. (i) संपृक्त आणि असंपृक्त
हैड्रोकार्बन्समधील फरक लिहा.
(ii) पाच कार्बन अणु असणाऱ्या अल्कीनचे रेणूसूत्र आणि
रचनासूत्र लिहा.
किंवा
(i) कार्बन अणु C4- ॲनआयन आणि C4+ कॅटआयन स्वरूप प्राप्त करत नाही. का ?
(ii) इथेनॉलचे रूपांतर इथेनॉईक आम्लामध्ये कसे केले जाते
?
37. मानवी हृदयाच्या छेदाची आकृती काढून त्याच्या खालील
भागांना नांवे द्या :
(i) महाप्रवाहिनी
(ii) ऑक्सीजन विरहित रक्त घेणारा हृदयाचा कप्पा ( Chamber ).
38. (i) बायोगॅस ( जैविक वायू ) च्या मुख्य
घटकाचे नांव लिहा. उत्तम इंधन बनविणाऱ्या बायोगॅस (जैविक वायू) चे गुणधर्म (
लक्षणे) लिहा.
(ii) सूर्याची उष्णता ऊर्जा वापरुन कार्य करणाऱ्या दोन
उपकरणांची नांवे लिहा.
किंवा
(i) सौर घटाचे फायदे लिहा.
(ii) केंद्रकीय विद्युत शक्ती निर्मितीचे दोन धोके लिहा.
39. कोष्टकाचे निरीक्षण करा आणि त्या खालील प्रश्नांची
उत्तरे लिहा.
सारख्याच आवर्तनामध्ये येणारी दोन मूलद्रव्ये आणि सारख्याच
( एकाच ) गटामध्ये येणारी दोन मूलद्रव्ये ओळखा. तुमच्या निष्कर्षाचे कारण लिहा.