मराठी विषयातील महत्वाचे प्रश्न व त्याची उत्तरे
गद्य विभाग
एका वाक्यात उत्तरे लिहा
१) कोणाच्या सूचनेवरून केसोबासांनी मराठीत ग्रंथ रचना केली?
उत्तर :- नागदेवाचार्याच्या
२) दृष्टांतांचे संकलन कोणी केले?
उत्तर :- केसोबासांनी
३) महानुभवपंथाचे संस्थापक कोण ?
उत्तर :- श्री चक्रधरस्वामी
४) सोंड पाहणाऱ्याला हत्ती कशासारखा वाटला ?
उत्तर :- मुसळासारखा
५) अनंतशक्ती परमेश्वरू या पाठाचा साहित्य प्रकार कोणता ?
उत्तर :- प्राचीन गद्य
6) डॉ आंबेडकरांनी कोणती नियतकालीके सुरू केली ?
उत्तर :- मूकनायक, जनता
7) ‘विद्यार्थ्यानो जागृत व्हा‘ पाठाचा साहित्य प्रकार कोणता ?
उत्तर :- वैचारिक निबंध
8) दैवी शक्ती कोणती ?
उत्तर :- आत्मविश्वास
9) अकरावे अस्पृश्य विद्यार्थी संमेलन कुठे व केव्हा झाले ?
उत्तर :- पूणे येथे १९३८ साली
10) पहिले दैवत : विद्या : : दुसरे दैवत : ………………………….
उत्तर : – विनय
१1) ‘चि.वि. जोशी‘ यांच्या मानसपुत्राची नावे लिहा ?
उत्तर :-
चिमणराव आणि गुंड्याभाऊ
12) लेखकाच्या कुत्राचे नाव काय होते ?
उत्तर :- वसंत
13) माझ्या ‘बापाची पेंड‘ हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर :- द. मा. मिरासदार
14) आई समजून घेताना या पाठाचा साहित्य प्रकार कोणता?
उत्तर :- आत्मकथन
15) उत्तम कांबळेच्या आईचे नाव काय ?
उत्तर :- इलंदा
SSLC बोर्ड परीक्षा जुलै 2021
https://www.smartguruji.in/2021/07/blog-post_87.html
16) उत्तम कांबळेचे वडिल काठे काम करीत होते ?
उत्तर :- सैन्यात
17) लेखकाला रोज किती भाकरी खायला मिळते ?
उत्तर :- फक्त दीड
18) फेड ही कथा कोणाची आहे ?
उत्तर :- जी. ए. कुलकर्णी
१9) किराणा घराण्याचे संस्थापक कोण ?
उत्तर :- अब्दुल करीम खाँ
२0) गंगूबाईना शारदांबेच्या अंगावरचे वस्त्र कोणी दिले?
उत्तर :- शंकराचार्य
21) गंगूबाईचे निधन केव्हा झाले ?
उत्तर :- २१ जुलै २००९ सकाळी ७ वा. १० मि.
पद्य विभाग
एका वाक्यात उत्तरे लिहा
१) ‘विरहिणी‘ म्हणजे काय ?
उत्तर :- देवाच्या विरहाने आर्त झालेल्या भक्ताच्या अवस्थेचे वर्णन असणारी काव्य रचना.
२) पाहूणे म्हणून घरी कोण यावे असे कवीला वाटते ?
उत्तर :- पाहूणे म्हणून घरी पंढरीचा विठ्ठल यावे असे कवीला वाटते.
३) हवा असलेला शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला कोणकोणत्या गोष्टी देऊ करतो ?
उत्तर :- हवा असलेला शकून सांगण्यासाठी कवी कावळ्याला दहीभाताचा घास, वाटीभरून दूध पाय सजविण्यासाठी सोने, तसेच पिकलेल्या रसाळ आंब्याची डहाळी देऊ करितो.
4) विदर्भ देशाच्या राजाचे नाव काय?
उत्तर :- विदर्भ देशाच्या राजाचे नाव ‘भीमक‘ होय.
5) नरेंद्र, शैल्य, नृसिंह यांच्या रचना कोणत्या?
उत्तर :- नरेंद्राने श्रीकृष्णचरित्रावर रचना करण्याची घोषणा केली, शैल्य याने रामायणावर रचना केली तर नृसिंह याने नलोपाख्यान रचले.
6) नरेंद्र कोणाच्या दरबारात कवीहोते?
उत्तर :- नरेंद्र रामदेवरायाच्या दरबारात कवी होते.
7) रूक्मिणीच्या गुरूचे नाव काय ?
उत्तर :- सुदेव हे रुक्मिणीच्या गुरूचे नाव होय.
8) रूक्मिणीचे लग्न कोणाशी ठरविले होते ?
उत्तर :- रूक्मिणीचे लग्न शिशूपालाशी ठरविले होते.
9) श्रीकृष्णाने कोणत्या पद्धतीने लग्न करावे असे रूक्मिणीला वाटते ?
उत्तर :- श्रीकृष्णाने राक्षस पद्धतीने लग्न करावे असं रूक्मिणीला वाटते.
10) शिव कोणाचे पाय नमवितो ?
उत्तर :- शिव श्रीकृष्णाचे पाय नमवितो.
१1) पाहूणे कोठे पसरले आहेत?
उत्तर :- पाहूणे ओटीवर पसरले आहेत.
1२) पाहूणे राजरोस कशावर हल्ला करतात?
उत्तर :- पाहूणे राजरोस खाऊच्या डब्यावर हल्ला करतात.
1३) शेवटचा पाहूणा किती दिवस ठाण मांडून बसणार आहे ?
उत्तर:-शेवटचा पाहूणा किती दिवस ठाण मांडून बसणार आहे हे निश्चित सांगता येत नाही.
१4) संत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव लिहा.
उत्तर :- संत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव गाणिक बंडोजी
ठाकूर हे आहे.
15) या भारतात बंधूभाव कवितेचे मूल्य कोणते ?
उत्तर :- या भारतात बंधूभाव कवितेचे मूल्य देशभक्ती हे होय.
16) भारतात नित्य काय वसू दे?
उत्तर :- भारतात नित्य बंधूभाव वसू दे.
17) अमीर गरीब कसे रहावेत?
उत्तर :- अमीर गरीब एकमताने रहावेत.
18) सर्व संप्रदाय कसे दिसावेत ?
उत्तर :- सर्व संप्रदाय एक दिसावेत.
19) अस्पृश्यता जगातून कशी नष्ट व्हावी ?
उत्तर :-अस्पृश्यता जगातून समूळ नष्ट व्हावी.
20) सत्कार कोणाचा होत आहे ?
उत्तर :- पहिल्या तृणपात्याचा सत्कार होत आहे.
२1) स्वागतगीत कोणी म्हटले ?
उत्तर :- स्वागतगीत खगांनी म्हटले.
22) अत्तर म्हणजे काय असावे ?
उत्तर :-पहिला पाऊस पडल्यावर जो मातीचा सुगंध येतो त्याला अत्तर असे म्हटले आहे.
23) या ठिकाणी गुलाल कोणता आहे ?
उत्तर :-या कवितेत कवीने लाल मातीला गुलाल असे म्हटले आहे.
24) गुराख्याची फजिती पाहून माय काय करते ?
उत्तर :- गुराख्याची फजिती पाहून माय जात्यावर रचलेल्या ओव्या म्हणते.
२5) गुराख्याचे पाय कशाने निब्बर होतात ?
उत्तर :-गुराख्याचे पाय काट्याकुट्यात जाऊन निब्बर होतात.
26) पावसाने झोडपल्यावर गुराखी
कोठे उभा असे ?
उत्तर :- पावसाने झोडपल्यावर गुराखी गायीच्या पोटाखाली
(बाजूला) उभा असे.
27) धरण कवितेतील स्त्रीने आपले
तान्हे लेकरू कोठे ठेवले आहे ?
उत्तर :-धरण कवितेतील स्त्रीने आपले तान्हे लेकरू पाटीखाली (बुट्टीखाली) ठेवले आहे.
२8) वेल कोठे चढते ?
उत्तर :- वेल मांडवावर चढते.
29) ती रान का धुंडाळते?
उत्तर :- ती स्त्री घोटभर पाण्यासाठी रान धुंडाळते.
30) भूकेलेली पोरे कशी धावतात?
उत्तर :-भुकेलेली पोरे सैरावैरा धावतात.
31) भूकेलेले जीव काय देतात ?
उत्तर :-भुकेलेले जीव इशारा देतात.
३2) भूकेलेल्या पोटाला काय वर्ज्य नाही ?
उत्तर :-भुकेलेल्या पोटाला देवरक्तही वर्ज्य नाही.
३3) विठ्ठलाला काय दाखव अशी विनवणी करतात ?
उत्तर :-विठ्ठलाला देवपण दाखव अशी विनवणी करतात.
३4) विठ्ठलाच्या पोटी काय आहे ?
उत्तर :- विठ्ठलाच्या पोटी माया आहे.
SSLC परीक्षेसाठी खूप उपयुक्त
व्याकरणावरील नवीन व उपयुक्त ऑनलाईन टेस्ट एकाच लिंकमध्ये
SSLC बोर्ड परीक्षा जुलै 2021
https://www.smartguruji.in/2021/07/blog-post_87.html
खालील घटकावरील नवीन सराव टेस्ट
नमुना प्रश्नपत्रिकेनुसार व्याकरणातील खालील घटकावर प्रश्न येतील
काळ व काळाचे प्रकार
म्हणी व अर्थ
शब्दांच्या जाती
समास
प्रयोग
वृत्त
शब्दसमुहाबद्दल एक शब्द
विभक्ती प्रत्यय
अलंकार
संधी
ALL THE BEST