पाठ – 6
दिनूचे बिल
अ. नवीन शब्दांचे अर्थ.
कुरवाळणे – गोंजारणे
डॉक्टर – वैद्य
एक्स रे – क्ष किरण.
ओशाळणे – लाज वाटणे
बिल (इंग्लिश शब्द)
खर्चाचा तपशील देणारा कागद दृष्टीस पडणे दिसणे
आ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
1.दिनूचे वडील कोण होते?
उत्तर –दिनूचे वडील डॉक्टर होते.
2. दिनू वडिलांबरोबर कोठे जात असे?
उत्तर –दिनू वडिलांबरोबर दवाखान्यात
जात असे.
3. काय पाहिल्यावर दिनूला हसू आले?
उत्तर –वडिलांनी दिलेले बिल पाहिल्यावर
दिनूला हसू आले.
4. आईने दिनूच्या उशाशी किती रुपये ठेवले होते?
उत्तर –आईने दिनूच्या उशाशी 10 रुपये
ठेवले होते.
5. दिनूने घरकामात मदत केल्याची किंमत किती लावली
होती?
उत्तर –दिनूने घरकामात मदत
केल्याची किंमत 2 रुपये लावली होती.
6. आईने दिनूला किती रुपयांचे बिल पाठविले होते?
उत्तर –आईने दिनूला शून्य रुपयांचे
बिल पाठविले होते.
7. तुला पैसे मिळाल्यावर तू काय करतोस?
उत्तर –मला पैसे मिळाल्यावर मी
त्याचा खाऊ खातो,शाळेचे साहित्य घेतो किंवा बचत करून ठेवतो.
इ. खालील प्रश्नांची उत्तरे 2 3 वाक्यात लिहा.
1. दिनूच्या वडिलांकडे लोक कशासाठी येत असत?
उत्तर –दिनूचे वडील डॉक्टर होते.त्यांच्याकडे
लोक तपासून घेण्यासाठी,औषध घेण्यासाठी येत असतकोणी खोकला,सर्दी झाली आहे म्हणत असे
तर कोणी पोटात दुखत आहे म्हणत असे..
2. आईचे बिल पाहून दिनूची अवस्था कशी झाली?
उत्तर –आईचे बिल पाहून दिनूच्या
डोळ्यात एकदम पाणी आले.त्याचा गळा भरुन आला. त्याच्या हातातला कागद गळून पडला. ते
पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावत गेला. काही न बोलता त्याने आईला पैसे परत दिले. व
आईच्या मांडीवर डोके ठेवून रडू लागला.
3. आईने दिनूला कोणता बोध सांगितला?
उत्तर –जीवनातल्या सगळ्याच
गोष्टींची अशी बिले करून किंमत करता येत नाही.आपल्या आई-बाबांच्या कार्याची किंमत करता
येत नाही..
ई. खालील वाक्ये कोणी कोणाला म्हटली आहेत ते
संदर्भानुसार लिहा.
1.”बाबा, बिल म्हणजे काय हो?” “
उत्तर – वरील वाक्य ‘दिनूचे बिल’
या पाठातील असून हे वाक्य दिनूने आपल्या बाबांना जेंव्हा त्यांच्या दवाखान्यात गेला
होता तेंव्हा म्हटले आहे.
2.‘बाळा, जीवनातल्या सगळ्याच गोष्टींची बिले करुन किंमत
करता येत नाही.‘
उत्तर –वरील वाक्य ‘दिनूचे बिल’
या पाठातील असून हे वाक्य आईने दिनूला म्हटले आहे.जेंव्हा आईचे बिल पाहून दिनू रडत
होता तेंव्हा म्हटले आहे.
3. “डॉक्टर माझे पोट दुखते आहे”
उत्तर –वरील वाक्य ‘दिनूचे बिल’
या पाठातील असून हे वाक्य दिनूच्या बाबांच्या दवाखान्यात आलेल्या व्यक्तीने म्हटले
आहे.
4. “हे बघ, याला बिल म्हणतात. वाच.”
उत्तर –वरील वाक्य ‘दिनूचे बिल’
या पाठातील असून हे वाक्य दिनुच्या बाबांनी दिनूला उद्देशून म्हटले आहे.
abc