पाठ – 7
तेनालीरामाचे चातुर्य
अ. नवीन शब्दांचे अर्थ
चाणाक्ष – हुशार, चतुर
तरबेज – कुशल
चातुर्य – शहाणपणा
ओसरी – सोपा
मोहर – एक सोन्याचे नाणे
फर्माविणे – हुकूम देणे
दरबारी- दरबारातील मानकरी
कोषागार -खजिना
कर -राज्य चालविण्यासाठी
नागरिकांनी सरकारकडे भरावयाची रक्कम
खजिनदार -खजिन्याची
जबाबदारी सांभाळणारा अधिकारी
कृतज्ञ – उपकाराची जाणीव
असणारा
आ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1.तेनालीराम हा कोण होता?
उत्तर –तेनालीराम हा कृष्णदेवराय
यांच्या दरबारातील चाणाक्ष सल्लागार होता.
2. शेती का पिकली नाही?
उत्तर –भीषण दुष्काळामुळे शेती
पिकली नाही.
3. राजाने शेतकऱ्यांना पाचशे मौहरा कशासाठी
दिल्या?
उत्तर –राजाने बियाणे आणण्यासाठी
शेतकऱ्यांना पाचशे मोहरा दिल्या.
4. तेनालीराम वेषांतर करुन कोठे हिंडत होता?
उत्तर –तेनालीराम वेषांतर करुन गावोगावी
हिंडत होता.
5. न्याय कोणाला मिळाला होता?
उत्तर –न्याय शेतकऱ्यांना मिळाला
होता.
6. कृष्णदेवराय कोणावर प्रसन्न झाले?
उत्तर –तेनालीरामच्या चातुर्यावर
कृष्णदेवराय प्रसन्न झाले.
इ. दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
1. दुष्काळ पडल्यामुळे काय काय घडले?
उत्तर – विहिरींचे पाणी तलाव
कोरडे पडले, जनावरे
पाण्यावाचून तडफडू लागली. लोकांच्या नजरा आकाशाकडे लागल्या. त्यावर्षी
दुष्काळामुळे शेती पिकली नाही.
2. शेतकऱ्यांना कशाचे खूप समाधान झाले?
उत्तर – दुसऱ्याच वर्षी
निसर्गाच्या कृपेने पाऊस चांगला झाला. नद्या नाले खळाळून वाहू लागले. तलांवाना, विहिरींना पाणी आले.
पेरण्या झाल्या. शेतं डोलू लागली. पिकं तरारली. कापणी झाली. भरपूर उत्पन्न मिळाले.
शेतकऱ्यांना खूप समाधान झाले.
3.काही शेतकऱ्यांनी पैसे का परत केले नाहीत?
उत्तर – कारण महाराजांनी
दिलेल्या पाचशे मोहरा शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.भ्रष्टाचारामुळे 500 पैकी
दोनशे-तीनशे मोहराच मिळाल्या आणि त्यामुळे एवढ्या कमी रक्कमेत कमी बियाणे पेरल्याने शेतकऱ्यांच्या
उत्पन्नात घट झाली.म्हणून कांही शेतकऱ्यानी पैसे परत केले नाहीत.
4. बर्फाचा तुकडा लहान कसा झाला?
उत्तर – दरबारातील अनेक मंडळींनी
बर्फाची हाताळणी केल्यामुळे बर्फाचा आकार लहान झाला.
5. शेतकऱ्यांनी तेनालीरामचा जयजयकार केव्हा केला?
उत्तर – महाराजानी भ्रष्टाचारात
सामील झालेल्याना शिक्षा दिली. सर्व दरबार तेनालीरामच्या या उत्तराने अवाक् झाला
होता.म्हणून गावकरी व शेतकऱ्यांनी
तेनालीरामचा जयजयकार केला.
ई. समानार्थी शब्द लिही.
1. पाणी – जल
2. खूप – भरपूर
3. नदी – सरिता
4. आकाश – नभ
5. माफी – क्षमा
6. सद्भावना – सदिच्छा
उ.खालील वाक्ये घडलेल्या घटनेनुसार
क्रमवार लिही.
1. निरपराध शेतकऱ्यांना
न्याय मिळाला होता.
2. शेतकऱ्यांचे खूप
समाधान झाले.
3. राजाने शेतकऱ्यांना
बियाणे आणण्यासाठी पाचशे मोहरा दिल्या.
4. राज्यात भीषण दुष्काळ
पडला होता.
5. तेनालीरामच्या
चातुर्यावर कृष्णदेवराय प्रसन्न झाले.
6. बर्फाचा तुकडा
दरबारातील प्रत्येकाने हातात घ्यावा व पुढच्यास द्यावा.
उत्तर –
1. राज्यात भीषण दुष्काळ
पडला होता.
2. राजाने शेतकऱ्यांना
बियाणे आणण्यासाठी पाचशे मोहरा दिल्या.
3. शेतकऱ्यांचे खूप समाधान
झाले.
4. बर्फाचा तुकडा
दरबारातील प्रत्येकाने हातात घ्यावा व पुढच्यास द्यावा.
5. निरपराध शेतकऱ्यांना
न्याय मिळाला होता.
6. तेनालीरामच्या
चातुर्यावर कृष्णदेवराय प्रसन्न झाले.
ऊ. खालील व्यक्तींचा त्यांच्या हुद्यानुसार क्रम
लाव.
मंत्री, सरदार, शेतकरी, राजा, सेनापती, सुभेदार, सैनिक.
उत्तर –राजा , मंत्री
, सेनापती, सुभेदार , सरदार , सैनिक , शेतकरी
ए. पुढे दिलेल्या शब्दांचा योग्य क्रम जुळवून
अर्थपूर्ण शब्द तयार कर.
1. व रा कृदे ष्ण य – कृष्णदेवराय
2. जी न र ख दा – खजीनदार
3.गा षा को र – कोषागार
4. बा र र द – दरबार
5. हा रा म ज – महाराज
6. ना द् स व भा – सदभावना
7. तु र्य चा – चातूर्य