नवीन शब्दार्थ :
विश्व – जग
गुऱ्हाळ – उलटसुलट चर्चा
विस्फोट – मोठा उद्रेक
चिंताजनक – काळजी करण्याजोगी
विकसनशील – विकासाकडे वाटचाल कारणारे
अत्यल्प – कमी
जननी – आई
अनिष्ट – वाईट
सकस – सत्वयुक्त
निवारा –आसरा
भस्मासुर – डोक्यावर हात ठेवताच
भस्म करणारा – असूर
निरामय – आनंदी
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. संपूर्ण विश्वाला भेडसावणारी समस्या कोणती?
उत्तर – वाढती लोकासंख्या ही सद्या संपूर्ण विश्वाला भेडसावणारी समस्या आहे.
२. वाढती लोकसंख्या ही समस्या कोणत्या देशांना अडसर ठरत आहे?
उत्तर –विकसनशील
देशांना वाढती लोकसंख्या ही समस्या अडसर ठरत आहे.
३. पूर्वी लोकसंख्येवर नियंत्रण कोण घालत असे?
उत्तर –पूर्वी पृथ्वीवर येणाऱ्या रोगाच्या साथी,युद्ध,दुष्काळ व महापूर या बाबी लोकसंख्येवर नियंत्रण घालत असत.
४. जागतिक लोकसंख्यादिन कोणता ?
उत्तर –जागतिक
लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो.
५. आपल्या गरजा कोणत्या?
उत्तर –अन्न,वस्त्र,पाणी,निवारा,हवा,शिक्षण या आपल्या गरजा आहेत.
६. झोपडपट्टया का वाढत आहेत?
उत्तर –लोकसंख्या वाढल्यामुळे शहरात निवाऱ्याची सोय न झाल्यामुळे झोपडपट्टया का वाढत आहेत.
७. शैक्षणिक सुविधा न मिळाल्यामुळे कशावर परिणाम होत आहे?
उत्तर –शैक्षणिक सुविधा न मिळाल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे
८. दूषित हवेमुळे कोणत्या रोगांचा प्रसार होत आहे?
उत्तर –दूषित हवेमुळे क्षय,दमा,कर्करोग या रोगांचा प्रसार होत आहे.
९. आपले राष्ट्रीय कर्तव्य कोणते?
उत्तर –कुटुंब नयोजन हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.
आ. चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा.
१. लोकसंख्येचा विस्फोट ही देशापुढील समस्या कशी बनली आहे?
उत्तर –लोकसंख्या वाढल्याने अन्न,वस्त्र,शिक्षण,निवारा या मुलभूत गरजांची टंचाई निर्माण होते.देशात बेरोजगारी वाढते.बेकारी,गुन्हेगारी वाढते.लोकसंख्या वाढीमुळे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा न मिळाल्याने शैक्षणिक गुणवत्ता खालावते.महागाई वाढते,जंगलसंपत्ती कमी होते,प्रदूषण वाढते. इत्यादी कारणांमुळे लोकसंख्येचा विस्फोट ही देशापुढील समस्या बनली आहे.
२. लोकसंख्येवर
निसर्गामार्फत कसे नियंत्रण ठेवले जात असे?
उत्तर –पूर्वीच्या काळात पृथ्वीवर येणाऱ्या रोगाच्या साथी,महापूर,युद्ध,दुष्काळ
यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या कमी होता असे.अशा पद्धतीने लोकसंख्येवर
निसर्गामार्फत नियंत्रण ठेवले जात असे.
३. वाढत्या लोकसंख्येचा, युवकांवर कोणता परिणाम होत आहे?
उत्तर –लोकसंख्यावाढीमुळे सर्वांनां नोकऱ्या उद्योग मिळत नाहीत.युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते.कित्येक तरुण शिक्षण घेऊनही उद्योगधंदे नसल्यामुळे बेकार झाले आहेत.त्याचा परिणाम नैतिकमूल्यांवर होत आहे.
४. लोकसंख्या व पर्यावरण प्रदूषण यांचा कसा संबंध आहे?
उत्तर –वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलसंपत्ती कमी होत आहे. आणि याचा परिणाम म्हणून पर्यावरणप्रदूषण ही समस्या उद्भवली आहे. म्हणजेच पर्यावरणाचे प्रदूषण वाढण्यामागेही लोकसंख्या कारणीभूत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकसंख्येच्या अफाट वाढीमुळे वाहनांचे प्रमाण वाढले व त्यांच्या अती वापरामुळे ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण या समस्या निमार्ण झाल्यामुळे, त्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे.
इ. पाठाच्या आधारे रिकाम्या जागा भरा.
१. इ.स. १७१८ मध्ये थॉमस माल्थस यांनी लोकसंख्येवर निबंध सादर केला.
२. ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे.
३. लोकसंख्यावाढ ही साऱ्या समस्यांची जननी आहे
४.शिक्षण ही प्रत्येक मानवाची जीवनावश्यक गरज आहे.
5.दिवसेंदिवस महागाईचा भस्मासुर चटके देत आहे.
ई. जोड्या जुळवा.
अ ब
१.साधनसंपत्तीचा तुटवडा वस्तूंची टंचाई
२. निवाऱ्याची समस्या झोपडपट्टी
३. वाढती गुन्हेगारी बेकारी
४. वायुप्रदूषण राष्ट्रीय कर्तव्य
५. कुटुंब श्वसन रोग
उत्तर –
उ. शब्दातील फरक सांगा.
१) चिंता – चिता
चिंता – काळजी
चिता – सरण
२) वस्तू – वास्तु
वस्तू – पदार्थ
वास्तू – घर
३) नियंत्रण – निमंत्रण
नियंत्रण – ताबा
निमंत्रण – आमंत्रण
४) अध्ययन – अध्यापन –
अध्ययन – शिकणे
अध्यापन – शिकवणे
ऊ. विरुध्दार्थी शब्द लिही. –
प्रगती × अधोगती
नैसर्गिक ×
कृत्रिम
आरोग्य × अनारोग्य
उद्योग × निरुद्योग
ए. शब्दसमूहास एक शब्द लिही –
१. आपोआप निर्माण झालेले – नैसर्गिक
२. कामधंदा नसलेला बेरोजगार – बेकार
3.लोकांत भिती निर्माण करणारे – दहशतवादी
४. विकासाकडे वाटचाल करणारा – विकसनशील
५. निसर्गातील सजीव निर्जीव घटक मिळून बनलेले – पर्यावरण
ऐ. जर, तर, वापरून वाक्ये पूर्ण कर.
१. लोकसंख्या वाढ मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत.
जर लोकसंख्या वाढली तर मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत.
२. अधिक झाडे वाढविणे हवा शुद्ध राहते.
जर अधिक झाडे वाढविली तर हवा शुद्ध राहते.
३. चांगले शिक्षण मिळणे देशाची प्रगती होते.
जर चांगले शिक्षण मिळाले तर देशाची प्रगती होते.
४. वस्तूंची टंचाई भाववाढ होते.
जर वस्तूंची टंचाई निर्माण झाली तर भाववाढ होते.
औ. खालील विशेषणांपासून भाववाचक नामे बनव –
सुंदर – सुंदरता
गरीब – गरिबी
प्रामाणिक – प्रामाणिकपणा
मधुर – माधुर्य
प्रतिभा – प्रतिभावान
CLICK HERE TO DOWNLOAD PDF NOTES