सहावी मराठी
19. चुकलेले पांखरू
नवीन शब्दार्थ
अंतः करण – मन
त्राण- दम
दौडत -धावत
भाईर – बाहेर
त्येचा – त्याचा
इसम – माणूस, व्यक्ती
सबूद – शब्द
तीर – बाण
अ. खालील प्रश्नांची
उत्तरे एक-दोन वाक्यात लिही.
1. जिवाची आई का रडत होती ?
उत्तर: कारण जिवाचे वडील लढाई लढताना मरण पावले होते म्हणून जिवाची आई रडत होती.
2. जिवाच्या वडिलाना कोणी मारलं ?
उत्तर :शिवाजी महाराजांनी जिवाच्या वडिलांना मारलं होत.
3. शिवाजीचे वडील कोणाच्या दरबारात जहागीरदार होते ?
उत्तर : शिवाजी महाराजांचे वडील विजापूर सरकारच्या दरबारात जहागीरदार होते.
4. जिवाला गडावर जाताना कोण आडवतात ?
उत्तर : जिवाला गडावर जाताना चौकीवरचे पहारेकरी अडवतात.
5. जिवाला कोणती शिक्षा होईल असे महाराज बोलतात ?
उत्तर : जिवाला तोफेच्या तोंडी देणे,कडेलोट करणे अशा शिक्षा होतील असे महाराज बोलतात.
आ.खालील
प्रश्नांची उत्तरे तीन-चार वाक्यात लिही.
1. जिवा शिवाजी महाराजांना मारण्यासाठी गडावर कसा पोहचला ?
उत्तर : रात्री झोपलेल्या आईच्या कुशीतून, जिवा अलगद उठतो आणि सावकाश पावले टाकीत बाहेर पडतो. चिमुकली तलवार लटकावून, अंधारातून गडाकडे निघतो. शिवाजीला मारायला काळया कुट्ट अंधारातून रात्रभर चालून तो गड गाठतो. पण गडावर प्रवेश करताना गडाचे पहारेकरी त्याला अडवतात. ते पहारेकरी जिवाशी लुटुपुटूची झटापट करून निसटून जायला वाव देतात. अशाप्रकारे जिवा गडावर पोहोचला.
2. गडावर जाताना त्याला (जिवाला) कोणत्या समस्याना तोंड द्यावे लागले?
उत्तर: जिवा शिवाजीला मारायला काळया कुट्ट अंधारातून रात्रभर चालून तो गड गाठतो.पण गडावर प्रवेश करताना गडाचे पहारेकरी,चौकीचे चौकीदार यांना चुकवणे त्यांच्याशी लुटूपुटूची लढाई करणे इत्यादी समस्यांना जिवाला तोंड द्यावे लागले.
3. जिवाला
शिवाजी महाराजांना कशासाठी भेटायचं होतं ?
उत्तरःजिवाची आई जिवाला सांगते की शिवाजी महाराजांच्या तलवारीने जिवाच्या वडिलांचा जीव घेतला.हे कळताच आपल्या वडिलांना ठार मारणाऱ्या शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी जिवाला शिवाजी महाराजांना भेटायचं होतं.
4. भालदार मोठमोठ्याने का हसू लागले ?
उत्तर : अनेक चौक्या चुकवत जिवा दरबाराजवळ पोहोचतो.तिथे दारावरचे भालदार त्याला अडवतात.तेंव्हा जिवा त्यांना म्हणतो की, तुम्ही का आडव येता माझे तुमच्याशी भांडण नाही म्हणून मी तुम्हाला मारणार नाही,मला फक्त शिवाजीला मारायचं आहे.तुमचा शिवाजी इतका घाबरला आहे की काय म्हणून तुम्ही मला बाहेरच अडवत आहात? जिवाचे असे धाडसी व निरागस बोलणे ऐकून भालदार मोठमोठ्याने हसू लागतात.
5. भालेदाराना फसवून जिवा दरबारापर्यंत कसा पोहचला ?
उत्तर: अनेक चौक्या चुकवत जिवा दरबाराजवळ पोहोचतो.तिथे दारावरचे भालदार त्याला अडवतात.तिथे जिवाचे धाडसी व निरागस बोलणे ऐकून भालदार मोठमोठ्याने हसू लागतात.ती संधी साधून जिवा आत घुसतो व सगळीकडे हिंडत धुंडत शिवाजी महाराजांचा दरबार शोधून काढून दरबारात पोहोचतो.
6. जिवाला दरबारात कोणते दृष्य पहायला मिळाले ?
उत्तर – शिवाजी महाराज दरबारात मोठ्या मंडळीशी बोलत बसले आहेत व त्यांच्यांशी गहन विषयावर चर्चा करत आहेत.असे दृष्य जिवाला हे पहायला मिळते.
7. शिक्षा देण्याचे सांगताच जिवा कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतो ?
उत्तर- महाराजांनी जिवाला कडेलोटाची शिक्षा देण्याचे सांगताच जिवा न घाबरता म्हणतो की मी इकडे आलोय हे आईला माहिती नाही, मी आईला भेटून सांगून येतो मग तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगतो.
8.जिवाने महाराजांना काय वचन दिले ?
उत्तर: मी इकडे आलोय हे आईला माहिती नाही,मी आईला भेटून सांगतो व दिवस बुडायच्या आत तुमच्या समोर हजर होतो आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगतो.असे जिवाने महाराजांना वचन दिले.
इ.खालील वाक्ये कोणी कोणास म्हटली ते लिही.
1. “आये,माजा बाबा कुठं गेला ग? कंदी यायचा तो परत?”
उत्तर : वरील वाक्य चुकलेले पांखरू या पाठातील असून हे वाक्य छोट्या जिवाने आपल्या आईला उद्देशून म्हटले आहे.
2. ” तो काय एका जागी हातोय ?”
उत्तर :वरील वाक्य चुकलेले पांखरू या पाठातील असून हे वाक्य हे वाक्य जिवाच्या आईने जिवाला उद्देशून म्हटले आहे.
3. “भाकरीशी इमान राखण्यासाठी माझ्या धन्यानी आपल्याला विरोध केला.”
उत्तर : वरील वाक्य चुकलेले पांखरू या पाठातील असून हे वाक्य जिवाच्या आईने शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटले आहे.
ई.खाली काही बोली भाषेतील शब्द दिले आहेत. त्याचा अर्थ शिक्षकाच्या/ पालकांच्या मदतीने प्रमाण भाषेत लिही.
आये – आई
कंदी – केंव्हा
नाय – नाही
कुनीबी – कोणीही
विस्कुट – वाईट
म्हंजी – म्हणजे
सबूद – शब्द
बारीला – या वेळेला
सम्दी – सगळे
उ.खालील वाक्प्रचारांचा अर्थ समजून घे व लिही.
1. कपाळ पांढरं होणे-पती मरण पावणे,विधवा होणे
2. गळ्यात पडणे – मनात नसताना एखादी गोष्ट करावी लागणे
3. धूम ठोकणे – पळून जाणे
4. जीवावर उठणे- ठार मारण्याचा निश्चय करणे
ऊ.विरुद्धार्थी शब्द लिही.
स्वर्ग x नरक
प्रवेश x बाहेर
मारणे x तारणे
शिक्षा x बक्षीस
इमान -बेईमान
धीट x भित्रा
विरोध बिनविरोध
चटकन x उशिरा