विभक्तीविचार
एखादे वाक्य तयार करताना ते वाक्य अर्थपूर्ण करताना त्या वाक्यात वापरलेले शब्द जसेच्या तसे
सामान्य रुपात न वापरता त्या शब्दांच्या स्वरूपात बदल करावा लागतो.त्याशिवाय वाक्य अर्थपूर्ण होणार नाही.
उदा. बाबा मुलगा शिक्षा केली.(असे जसेच्या तसे शब्द एकमेकासमोर ते अर्थपूर्ण वाक्य होऊ शकत
नाही.)
वरील उदा. अर्थपूर्ण होण्यासाठी ‘बाबांनी मुलग्याला शिक्षा केली.’ अशी रचना करावी लागेल.
नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी अथवा इतर शब्दांशी असणारा
संबंध ज्या ज्या विकारांनी दाखवलेले असते त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.
नाम किंवा सर्वनामाचे विभक्तीत रुपांतर करण्यासाठी जी अक्षरे जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. उदा. घरांनी, गुलाबाचा
नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय लागण्यापूर्वी त्याच्या रुपात जो बदल होतो त्याला सामान्यरूप म्हणतात.
उदा – घर – मूळ शब्द
नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय लागल्यानंतर त्याच्या रुपात जो बदल होतो त्याला विभक्तीचे रूप म्हणतात.
उदा – घरास – विभक्तीचे रूप
(मुलगा – मूळ शब्द मुलग्या – सामान्य रूप मुलग्याला – विभक्तीचे रूप )
विभक्तीचे प्रकार –
विभक्तीचे प्रकार आठ आहेत.
वाक्यामध्ये नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असणारा सबंध आठ प्रकारचा असतो.म्हणुन विभक्तीचे आठ प्रकार पडतात.
1) प्रथमा विभक्ती
2)द्वितीया विभक्ती
3)तृतीया विभक्ती
4)चतुथी विभक्ती
5) पंचमी विभक्ती
6)षष्ठी विभक्ती
7)सप्तमी विभक्ती
8) संबोधन
द्वितीया व चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय एकसारखे आहेत.तर ते कसे ओळखावे?
जर एखाद्या वाक्यात नाम किंवा सर्वनामाला स,ला,ना,ते यापैकी प्रत्यय असतील पण त्या वाक्यात देण्याची,बोलण्याची किंवा सांगण्याची क्रिया झाली असेल तर तो चतुर्थी विभक्ती समजावा.
उदा. आजीने मुलांना पैसे दिले. (मुलांना – चतुर्थी)
द्वितीया विभक्ती – कर्त्याची क्रिया कर्मावर होत असेल आणि त्या वाक्याचा देणे,बोलणे,सांगणे याचा संबंध नसेल तर तो द्वितीय विभक्ती समजावा.
उदा. आजीने मुलांना पकडले. (मुलांना – द्वितीया)
विभक्ती प्रत्यय तक्ता
विभक्ती – (एकवचन) – (अनेकवचन)
१) प्रथमा – प्रत्यय नाही – प्रत्यय नाही
२) द्वितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते
३) तृतीया – ने, ए, शी – नी, शी, ही
४) चतुर्थी – स, ला, ते – स, ला, ना, ते
५) पंचमी – ऊन, हून – ऊन, हून
६) षष्ठी – चा, ची, चे – चे, च्या, ची
७) सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ
८) संबोधन – प्रत्यय नाही – नो
विभक्तीतील रूपे
विभक्ती – (एकवचन) – (अनेकवचन)
१) प्रथमा – घर
२) द्वितीया – घरास, घराला – घरास, घराना
३) तृतीया – घराने, घराशी – घरांनी, घराशी
४) चतुर्थी – घरास, घरा ला – घरास, घरांना
५) पंचमी – घरा तून, घरा हून – घरातून, घराहून
६) षष्ठी – घराचा, घराची, घराचे घरांचा, घरांची, घरांचे
७) सप्तमी – घरात – घरात
८) संबोधन – घरांनो
विभक्ती घटकावरील ऑनलाईन टेस्ट – CLICK HERE