पाठ – ११
नवीन शब्दांचे अर्थ
ग्रिटिंग कार्ड – शुभेच्छा कार्ड
साठविलेले – जमा केलेले
धमाल – मजा
हट्ट – आग्रह
अभ्यास
अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.
१. पिंकीचे खरे नाव कोणते ?
उत्तर – पिंकीचे खरे नाव प्राजक्ता
होते.
२. पिंकीने केलेल्या वस्तुंची नावे लिहा.
उत्तर- निसर्गाचे सुंदर चित्र,गुलाबाचे कागदी फूल,भेटकार्ड इत्यादी वस्तू पिंकीने केल्या होत्या.
३. पिंकीने भेटकार्ड का तयार केले? तू काय करशील?
उत्तर –पुजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पिंकीने भेटकार्ड तयार केले.मी देखील माझ्या मित्र/मैत्रिणीच्या वाढदिवसाला असे छान भेटकार्ड तयार करीन.
४. सुट्टीच्या दिवशी तू कोण कोणती कामे करतोस?
उत्तर – सुट्टीच्या दिवशी मी अशाच छान वस्तू तयार करण्याचा प्रयत्न करीन.
आ. पिंकीने भेटकार्ड कसे तयार केले? थोडक्यात लिहा.
उत्तर – पिंकीने जमा केलेल्या लग्नपत्रिका, ग्रिटिंग कार्ड, रंगीत नक्षी एकत्र केले. त्यातील सुंदर फुले, पक्षी, रंगीत नक्षी वगैरे कापून घेऊन कार्डशीटवर चिकटवून एक सुंदर भेटकार्ड तयार केले.त्याच्या बाजुने स्केचपेनने बॉर्डर आखली.आतील पानावर ‘पूजास
वाढदिवसाच्या शुभेच्छा‘ असे लिहिले.त्यावर चकमक चिकटवली व सुंदर असे भेटकार्ड तयार केले.
उ. घराशी संबंधित असणान्या शब्दांना गोल
1. व्हरांडा , अंगण , छत , गोठा
2. खांब , झेंडा , नदी , रस्ता
3. स्वयंपाकघर , गच्ची , जिना , पायवाट
4. ओढा , पूल , खोली , कपाट
ऊ. खालील शब्दसमूहास एक शब्द लिहा.
१. जिलेबी, लाडू, पेढा, म्हैसूरपाक
उत्तर – गोड पदार्थ
२. गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी.
उत्तर – नद्या
३. जोंधळा, गहू, तांदूळ, नाचणा
उत्तर – धान्य
४. बेळगावी, बिदर, धारवाड, कारवार
उत्तर – जिल्हे
५. शर्ट, पँट, कोट, जॅकेट
उत्तर – कपडे
ए. या कामासाठी तू कोणाकडे जातोस ?
१. दळण दळून आणणे
उत्तर – पीठ गिरणवाला
२. दूध खरेदी करणे.
उत्तर – गवळी
३. चप्पल शिवून घेणे.
उत्तर – चांभार
४. केस कापून घेणे.
उत्तर – न्हावी
५. वही
पुस्तक खरेदी करणे.
उत्तर – वहीवाला / स्टेशनरी
६. मडकी खरेदी करणे.
उत्तर – कुंभार
ऐ. पाण्यात कोणती वस्तू बुडेल,कोणती वस्तू तरंगेल?
वस्तू | बुडेल | तरंगेल |
दगड | बुडेल |
|
कागद | – | तरंगेल |
रबरी चेंडू | – | तरंगेल |
फांदी | बुडेल | – |
खडू | बुडेल | – |
पेन्सिल | बुडेल | – |
पान | – | तरंगेल |
ताट | बुडेल |
|