6th MARATHI 16. SANVADINI (पाठ – १६ संवादिनी )




 

 इयत्ता – सहावी 

विषय मराठी 

पाठ – १६ 

संवादिनी 




 


नवीन
शब्दार्थः


शिरकाव- प्रवेश करणे

संवादिनी -वाद्याचा एक प्रकार (पेटी)

मैफिल -संगीत सभा

पाईप ऑर्गन -जुन्या काळातील संवादिनी

अग्रगण्य- प्रमुख

गझल -गाण्याचा एक प्रकार

अ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिही.

1. भारतीय उप खंडातील लोकप्रिय स्वर वाद्य
कोणते
?


उत्तर – भारतीय उप खंडातील लोकप्रिय स्वर वाद्य
संवादिनी हे आहे.


2. सर्वप्रथम संवादिनीचा वापर कोणत्या देशात
झाला
?


उत्तर – सर्वप्रथम संवादिनीचा वापर युरोप खंडातील
फ्रान्स या देशात झाला.


3. हार्मोनियम हे वाद्य कोणी तयार केले?

उत्तर – हार्मोनियम हे वाद्य अलेक्झांडर फ्रँकाईस
ड्युबेन यांनी तयार केले.


4. ‘रीडम्हणजे काय?

उत्तर – हवा फुंकल्याबरोबर ज्या पिपाणीतून आवाज येतो
त्या पिपाणीला
रीडअसे म्हणतात.


5. बेळगावमधील प्रसिद्ध संवादिनी वादकाचे नाव
लिही.


उत्तर – पंडित रामभाऊ विजापूरे




 

आ. रिकाम्या जागी योग्य शब्द भर

1. संवादिनीची मूळ कल्पना पाइप ऑर्गन या वाद्यापासून आली.

2. संवादिनीचा शोध 1842 साली लागला


3. स्वर लांबविता यावा यासाठी संवादिनीमध्ये कातड्याचा भाता बसविण्यात आला.


4. संवादिनीची रीडस
कुकड व
पालीठाणा या ठिकाणी तयार होतात.


5. भारतामध्ये या वाद्याचा अभ्यास गेली 100 वर्षे
सुरू आहे.


इ. खालील प्रश्नांची उत्तरे तीन वाक्यात लिही.

1. संवादिनीची लोकप्रियता कशी वाढली?

उत्तर – सुरुवातीला संवादिनी हे वाद्य अमेरिका व युरोपमध्ये जास्त लोकप्रिय झाले.उचलून नेता येण्यासारखे असल्यामुळे सहलीला जाताना करमणूकीसाठी हे वाद्य नेण्यात येऊ लागले.एवढेच नव्हे तर युद्धावर जाणारे सैनिक देखील याचा वापर करू लागले.अगदी साध्या माणसापासून ते मोठमोठ्या संगीतकारापर्यंत
सर्वजण वाद्याचा खूप वापर करू लागले व हळूहळू संवादिनीची लोकप्रियता वाढत गेली.


2. संवादिनी भारतात कशी आली ?

उत्तर – काही जण म्हणतात की पारशी नाटक कंपन्यानी हे वाद्य भारतात आणले.ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी हे
वाद्य भारतात आणले असे काही जण म्हणतात. भारतात नाटक करणारे जे काही संघ होते त्यांनी ह्या वाद्याचा सर्वप्रथम उपयोग करून घेतला.त्यानंतर कीर्तनात त्याचा शिरकाव झाला. काही काळानंतर शास्त्रीय


संगीत गायकानी साथीसाठी त्याचा वापर केला आणि ते वाद्य त्याना देखील पटले.

3. भारतातील जगप्रसिद्ध संवादिनी वादकांची
यादी कर.


उत्तर – भारतामध्ये ह्या वाद्याचा अभ्यास गेली 100 वर्षे
सुरु आहे. पं. गोविंदराव टेंबे
, पं.विठ्ठलराव कोरगांवकर,
पं. मधुकर पेडणेकर, पं. मनोहर चिमोटे,
पं. हनुमंतराव वाळवेकर, पं. ज्ञानप्रकाश
घोष
, पं. तुलसीदास बोरकर, पं.
पुरुषोत्तम वालावलकर
, पं. आप्पा जळगांवकर, पं. वसंत कनकापुर आदि संवादिनी वादकांची नावे आज जगभर प्रसिद्ध झालेली
आहेत.



 

गटात जुळणाऱ्या शब्दाभोवती गोल कर.

1.तबला, मृदंग,ढोल, संवादिनी

उत्तर – संवादिनी

2.बासरी, टाळ,सनई, पिपाणी.

उत्तर – टाळ

3. माऊथ ऑर्गन, विणा,तंबोरा, सतार.

उत्तर – माऊथ ऑर्गन

4. कथ्थक,लावणी,भरतनाट्यम,यक्षगान

उत्तर –

5. पं.गोविंदराव, पं.रामभाऊ,
पं. भिमसेन जोशी, पं.पुरषोत्तम


उत्तर – पं. भिमसेन जोशी

उ.खालील वाक्ये पाठानुक्राने लिहा.

1.व्दारकानाथ घोष यांनी हातपेटी तयार केली.

2.पारशी नाटक कंपन्यानी हे वाद्य भारतात आणले.

3. अलेक्झांडर फ्रँकॉईस ड्युबेन यांनी पाय पेटी हे वाद्य तयार केले.

4. पं रामभाऊ विजापूरे हे नांव संगीत जगतात आदराने घेतले जाते.

5. संवादिनीची मूळ कल्पना पाईप ऑर्गन या वाद्यापासून आली.

उत्तर –

1.संवादिनीची मूळ कल्पना पाईप ऑर्गन या वाद्यापासून आली.

2.अलेक्झांडर फ्रँकॉईस ड्युबेन यांनी पाय पेटी हे वाद्य तयार केले.

3.पारशी नाटक कंपन्यानी हे वाद्य भारतात आणले.

4.व्दारकानाथ घोष यांनी हातपेटी तयार केली.

5.पं रामभाऊ विजापूरे हे नांव संगीत जगतात
आदराने घेतले जाते.




 

ऊ. खालील शब्द वाक्यात उपयोग कर.

1. करमणूक –
मनोरंजन

पूर्वीचे लोक मनोरंजन म्हणून प्राण्यांच्या शर्यती लावायचे.

2. शास्त्रीय संगीत – एक भारतीय संगीत प्रकार

शास्त्रीय संगीत हा भारतातील खूप जुना संगीत प्रकार आहे.

3.प्रसिद्ध – प्रचलित

बेळगावचा कुंदा जास्त प्रसिद्ध आहे.

ऐ. उदाहरणात दाखविल्याप्रमाणे वाद्याचा प्रकार लिहा.

1. संवादिनी – स्वरवाद्य

2.ढोलकी – तालवाद्य

3. वीणा – तंतुवाद्य

4. नगारा – तालवाद्य

5. माऊथ ऑर्गन – स्वरवाद्य

6. व्हायोलीन – तंतूवाद्य




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *