परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1,2,3 व 4 गुणाचे प्रश्न
घटक 3. धातू व अधातू
By- Tejaswi T. Mane (Science Teacher,Shri Sai
High School,Mangur. Range – Nipani)
1 MARK प्रश्नसंच
1 खोलीच्या तापमानाला द्रवरूप अवस्थेत असणारे धातू व अधातू लिहा.
2. उत्तम उष्णता वाहक असणारा धातू कोणता?
3. सोने या धातूचे दोन गुणधर्म सांगा.
4……..
हा धातू हातावरती घेतल्यास लगेच वितळतो.
5. ‘X’ मूलद्रव्याचे ऑक्साईड्स तांबडा लिटमस निळा करतात.तर ‘X’ हा धातू आहे कि अधातू –
6. असा अधातू जो चकाकतो आणि धातू जो चकाकत नाही.
7. ऑक्साईड्च्या गुणधर्मावरून धातू वा अधातुमधील फरक सांगा.
8. धातू आम्लाशी क्रिया करून कोणता वायू तयार करतात?
9. कोणते धातू सौम्य
HNO3 शी क्रिया करून वायू तयार करतात?
10. चांदीची भांडी हवेत उघडी ठेवल्यास काळी पडतात.
2 marks प्रश्न
2 marks प्रश्न
1. धातूचे चार भौतिक गुणधर्म लिहा.
2. दोन घनरूप धातूंची नावे सांगून संज्ञा लिहा.
3. पाण्याबरोबर क्रिया करून पाण्यावर तरंगणाऱ्या दोन धातूंची नावे सांगा.
4.कॅल्शियम धातू पाण्यावर तरंगतो.कारण लिहा.रासायनिक क्रिया लिहा.
5. नावे लिहा.
a) जो धातू रॉकेलमध्ये साठवितात.
b) चकाकी असणारा धातू –
c) हातावर घेतल्यास वितळणारा धातू –
e) उष्णतेचे मंदवाहक असणारा वायू –
7. कारणे लिहा.
a) धातू विद्युतचे सुवाहक आहेत पण अधातू दुर्वाहक आहेत.
b) आयनिक संयुगाना उच्च विलय व उत्कलन बिंदू असतो.
8. कारणे द्या.
a) सोडियम हा धातू रॉकेलमध्ये का ठेवतात.
b) अल्युमिनियम क्रियाशील असूनही त्यापासून भांडी बनवतात.
7. कारणे द्या.
a) शाळेतील घंटा धातूपासून बनवलेली असते.
b) इलेक्ट्रिक तारा तांब्यापासून बनलेल्या असतात.
9. द्रवरूप अवस्थेतील धातू जो B.P मशीनमध्ये वापरला जातो.त्याचे कोणते धातूक पृथ्वीवर उपलब्ध असते.त्याचे शुद्धीकरण कसे होते.
10. धातू X हा Y अधातूशी संयोग पावतो.इलेक्ट्रॉन्सची देवाण घेवाण होते व ‘Z’ संयुग बनते.
a) Z मधील बांधाचा प्रकार कोणता?
b) ‘Z’ चा विलय बिंदू व उत्कलन बिंदू बद्दल काय सांगाल?
c) ‘Z’ हे संयुग पेट्रोल,केरोसीन मध्ये विरघळेल का?
d) ‘Z’ संयुग विद्युतचे सुवाहक असेल का?
11. लोखंडी खिळा
च्या जलीय द्रावणात टाकल्यास तुमचे दोन निष्कर्ष सांगा.
12. P आणि Q या दोन धातूंपैकी P हे कमी क्रियाशील आहे.तर धातूच्या क्रियाशिलतेवरून उतरत्या क्रमात मांडा.तुमच्या उत्तरास एक रासायनिक समीकरण लिहा.
1. अल्युमिनियम आणि तांब्याची भांडी जेवणाची भांडी म्हणून वापरतात कारण –
3 MARKS QUESTIONS
1.सोडियमचे तीन गुणधर्म लिहा जे धातूच्या गुणधर्माहून पूर्णपणे भिन्न आहेत.
a) सोडियम धातू मऊ आहे.सहजपणे
चाकूने कापता येतो.
b) घनता कमी असते.
c) विलयबिंदू कमी असतो.
2. A) धातू व अधातूमधील फरक लिहा.
i) ऑक्साईडचे गुणधर्म ii) वाहकता
उत्तर – i) ऑक्साईडचे गुणधर्म
a) धातूचे ऑक्साईड – अल्कधर्मी किंवा उभयधर्मी
b) अधातुचे ऑक्साईड – आम्लधर्मी किंवा उदासीन
ii) वाहकता –
a) धातू विद्युत व उष्णतेचे सुवाहक
b) अधातू दुर्वाहक आहेत.
B) कोणता अधातू चकाकतो व कोणता धातू द्रवरूप अवस्थेत असतो.
उत्तर – चकाकणारा अधातू – आयोडीन
द्रवरूप धातू – पारा
3) खालील गुणधर्मावरून प्रत्येकी उदाहरण द्या.
i) तन्यता व वर्धनियता धातू
उत्तर – सोने व चांदी
ii) उष्णतेचे उत्तम वाहक व दुर्वाहक
उत्तर – चांदी उष्णतेचा सुवाहक
शिसे उष्णतेचा दुर्वाहक
iii) उच्च विलयबिंदू
असणारा धातू व कमी विलयबिंदू असणारा धातू –
उत्तर – उच्च विलयबिंदू असणारा धातू – टंगस्टन आणि लोखंड
कमी विलयबिंदू असणारा धातू – गॅलियम आणि कॅसियम
4) i) ‘X’ हा अधातू आहे.Y आणि Z हे त्याची रूपे आहेत.Y हा सर्वात कठीण पदार्थ आहे तर ‘Z’ हा विद्युतचे उत्तम सुवाहक आहे.तर
X,Y आणि Z ओळखा.
उत्तर – X कार्बन – अधातू आहे.
Y
हिरा – सर्वात कठीण
Z
ग्राफाईट – विद्युतचे सुवाहक
ii) ‘X’ हा ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो व XO2 ऑक्साईड तयार होतो.त्याच्या जलीय द्रावणात निळा लिटमस पेपर तांबडा होतो.तर X धातू आहे अधातू ओळखा.
उत्तर – X हा धातू आहे.
iii) ब्राँझ मिश्रधातू बनविण्यासाठी तांबे या
धातूमध्ये कोणता धातू मिसळतात?
उत्तर – ब्राँझ = तांबे + कथील (कथिल हा धातू मिसळतात.)
5) कारणे द्या.
i) अधातू आम्लाशी क्रिया करून हैड्रोजन वायू निर्माण होत नाही.
उत्तर – कारण अधातू इलेक्ट्रॉन्स स्वीकारतात.ते देऊ शकत नाहीत.त्यामुळे H+ आयन्स निर्माण होत नाहीत.म्हणून H2 वायूची निर्मिती होत नाही.
ii) हैड्रोजन धातू नाही तरीही क्रियाशील क्रमवारीत हैद्रीजन वायू असतो.
उत्तर – कारण हैड्रोजन धातूसारखे इलेक्ट्रॉन्स देणारा गुणधर्म दर्शवितो.H+ आयन्स (कॅटायन) बनतो.
iii) अल्युमिनियम जास्त क्रियाशील असूनही लोखंड गंजते
उत्तर – कारण अल्युमिनियमवर जाड संरक्षण थर जमा होतो.तो थर अल्युमिनियम ऑक्साईडचा असतो.तो गंजण्यास प्रतिबंध करतो.
6) खालील विधानांना कारणे द्या.
i) धातू विद्युतचे वहन करतो.
उत्तर – धातू विद्युतचे वहन करतात कारण धातुबंध तयार होतात.ते बंध तयार होण्यासाठी त्यांच्यामध्ये फिरते इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉन्सचे वहन
झाल्यामुळे विद्युतचे वहन होते.
ii) धातूशी क्रिया करून ही वायूची निर्मिती करत नाही.
उत्तर – कारण हा ऑक्सिडीकारक एजंट म्हणून कार्य करतो.तो ऑक्सिडेशन करून H2O निर्मिती करतो.NO किंवा NO2 वायू उत्पादित होतात.
iii) सोन्याचे दागिने करताना 22 कॅरेट सोने वापरले जाते की 24 कॅरेट सोने.स्पष्टीकरण द्या.
उत्तर – शुद्ध सोने 24 कॅरेट हे मऊ असते.त्यामुळे दागिन्यामध्ये वापरत नाहीत.त्यामध्ये तांबे किंवा चांदी मिसळतात. तेंव्हा मिश्रधातू तयार होतो. to कठीण बनतो.त्यामुळे सहसा 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो.ज्यामध्ये 22 कॅरेट सोने व 2 भाग तांबे किंवा चांदी असते.
7) कारणे द्या.
i) अल्युमिनियम क्रियाशील धातू असूनही अन्न पदार्थ पॅकींगमध्ये अल्युमिनियम फॉईल वापरली जाते.
उत्तर – कारण अल्युमिनियम वर ऑक्साईडचा जाड संरक्षण ठर तयार होतो.तो थर गंजण्यास विरोध करतो.इतर रासायनिक क्रिया घडत नाहीत.त्यामुळे अन्न सुरक्षित राहते.
ii) कॅल्शियम पाण्याशी क्रिया करताना पाण्यावर तरंगतो.
उत्तर – कारण हैड्रोजन वायूचे बुडबुडे तयार होऊन ते कॅल्शियमला पृष्ठभागाशी धरून ठेवतात.
8) a) खालील धातू क्रियाशिलतेच्या उतरत्या क्रमात मांडा.
Al , Au ,Na , Cu
उत्तर – Na
Al
Cu
Au
b) अल्युमिनियमची पावडर मँगनीज डाय ऑक्साईड बरोबर तापवली असता घडणारी रासायनिक क्रिया लिहा.
उत्तर –
9) समतोलीत रासायनिक क्रिया लिहा.
i) अल्युमिनियमला हवेत उष्णता दिल्यास मिळणारे उत्पादित पदार्थ लिहा.
उत्तर – 4Al + 3O2 → 2Al2O3
ii) लोखंड पाण्याच्या वाफेवर क्रिया केल्यास-
उत्तर – 3Fe + 4H2O → Fe3O4 + 4H2
iii) कॅल्शियम पाण्याशी क्रिया करतो व पाण्यावर तरंगतो. का?
उत्तर – Ca + 2H2O → Ca(OH)2 + H2
कारण H2 वायूचे बुडबुडे कॅल्शियमला पृष्ठभागाशी धरून ठेवतो.
10) समतोलीत समीकरणे
लिहा.
i) तांबे हवेत तपविल्यास –
उत्तर – 2Cu + O2 → 2CuO
ii) अल्युमिनियमला हवेत तापविल्यास –
उत्तर – 4Al + 3O2 → 2Al2O3
iii) अल्युमिनियम ऑक्साईड व सोडियम हायड्रॉक्साईडची क्रिया –
उत्तर – Al2O3 + 2NaOH → 2NaAlO3 + H2O
11) लोखंडाचे गंजणे एका उपक्रमातून स्पष्ट करा.
i) तीन परीक्षानळी घ्या.प्रत्येकात एक एक लोखंडी खिळा टाका.
ii) पहिल्या परीक्षानळीत पाणी घाला व बुच लावून बंद करा.
iii) दुसऱ्या परीक्षानळीत गरम पाणी व तेल घाला.
iv) तिसऱ्या परीक्षानळीत CaCl2 घाला.
v) दोन दिवसानंतर तुम्ही निरीक्षण करा.
vi) पहिल्या परीक्षानळीतील खिळा गंजलेला दिसेल तर दुसऱ्या व तिसऱ्या परीक्षानळीतील खिळे गंजणार नाहीत.
यावरून असे कळते की,पाणी,हवा,आर्द्रतामुळे लोखंडावर गंज चढतो.
12) तुम्हाला तीन धातू देण्यात आले आहेत. Na,Mg व
Cu. त्यांच्या क्रियाशिलतेवरून उतरत्या क्रमात मांडणी करा.
उत्तर – i)
सोडियम धातू हवेत उघडा ठेवल्यास लगेच ज्वलन क्रिया होते व पेट घेतो.कारण सोडियम उच्च क्रियाशील धातू आहे.म्हणून त्याला केरोसिनमध्ये
ठेवतात.
Ø
मँग्नेशियमला हवेत तापविले असता जळतो.त्यामुळे तो सोडियमपेक्षा कमी क्रियाशील आहे.
Ø
तांबे हवेत जळत नाही.तांब्याची पावडर / कण जळतात.म्हणून क्रियाशिलतेनुसार O2 शी क्रिया करताना क्रमवारी – Na >
Mg >
Cu
ii) धातू पाण्याशी क्रिया करताना –
Ø
सोडियम पाण्याशी क्रिया करताना पेट घेतो.
Ø
मँग्नेशियम थंड पाण्याशी क्रिया करत नाही मात्र गरम पाण्याबरोबर क्रिया करतो.
Ø
तांबे पाण्याशी क्रिया करत नाही.
Ø
Na > Mg > Cu
4 MARKS Questions
1) 115 मुलद्रव्यांपैकी कांही धातू तर कांही अधातू मूलद्रव्ये आहे तर धातू – अधातू मधील ठळक गुणधर्मातील फरक सांगा.
i)आयोडीन हा आपल्यासाठी महत्वाचा का आहे? महत्व कसे सांगाल?
ii)विद्युतचे सुवाहक असणारा अधातू कोणता?
उत्तर – धातू – अधातू मधील ठळक गुणधर्म
धातू | अधातू |
कठीण असतात | ठिसूळ,मऊ असतात. |
चकाकतात | चकाकत नाहीत. |
तन्यता,प्रसरणशिलत्व गुणधर्म असतो. | तन्यता,प्रसरणशिलत्व गुणधर्म आढळत नाही. |
विद्युतचे,उष्णतेचे सुवाहक | विद्युतचे,उष्णतेचे दुर्वाहक |
i)आयोडीन अधातू असूनही चकाकतो.दैनंदिन जीवनात आयोडीनला महत्व आहे.मानवी घश्यामध्ये थॉयराईड ग्रंथीन थायरॉक्झीन स्त्रवन्यास आयोडीन उपयुक्त ठरते.म्हणून आयोडीनयुक्त मीठ खाल्ले जाते.यामुळे गॉयटर आजार टळतो.घरी व शाळांमध्ये आयोडीनचे महत्व पटवून द्यावे.लोकाना आयोडीनचे महत्व सांगावे.
ii) ग्राफाईट हे कार्बनचे बहुरूप असूनही विद्युतचे सुवाहक आहे.
2)
Ca,Mg आणि Fe धातूंची क्रीयाशिलतेच्या क्रमवारीनुसार उतरत्या क्रमात मांडणी
करा.त्यासाठी उपक्रम लिहा.
उत्तर – उपक्रम : –
i) Ca,Mg आणि Fe धातूचे तुकडे घा.
ii) चंचूपात्रात पाणी घ्या.तीन चंचूपात्रांना A,B व C नावे द्या.
iii) A चंचूपात्रात Ca चा तुकडा B मध्ये Mg चा तर C मध्ये Fe टाका.
iv) धातू थंड पाण्याशी क्रिया करतील तर त्या रासायनिक क्रिया शीघ्रगतीने घडतात.समजा जरा धातू थंड पाण्याशी क्रिया केले नाहीत तर गरम पाण्याबरोबर क्रिया
करावी.कांही धातू थंड व गरम पाण्याशी क्रिया करत नाहीत तेंव्हा पाण्याचा वाफेबरोबर क्रिया करावी.
1) A. कारणे द्या.
i)आयनिक संयुगाना उच्च विलय व उत्कलन बिंदू असतो.
कारण – त्यांच्यामधील अंतर आयनिक आकर्षण तोडण्यासाठी आवश्यक ऊर्जेची जास्त गरज असते.
ii) आयनिक संयुगे पाण्यात विरघळतात.
कारण – आयनिक संयुगांच्या पाण्याच्या द्रावणात आयन्स तयार करतात. (aqueous solution)
iii) आयनिक संयुगे वितळलेल्या स्थितीत विद्युतचे वहन करतात.
कारण – आयनिक संयुगे पाण्याच्या द्रावणात आयन्स तयार करतात.आयन्सची हालचाल करतात.उष्णता दिल्यामुळे विद्युत प्रभारित आयन्समध्ये विद्युत संयुजी आकर्षण बल कमी होतो.आयन्समुक्त होऊन फिरू लागतात आणि विद्युतचे वहन होते.
1)
a) जेंव्हा कॅल्शियम धातू पाण्यात टाकल्यास वायू उत्पादित होतो.पण पेट घेत नाही.परंतु Na & K पाण्यात टाकल्यास पेट घेतो.कारण लिहा.
उत्तर – कॅल्शियम पाण्यात टाकल्यास H2 वायू निर्माण होतो.पण पेट घेण्यास पुरेसा नसतो.तर Na & K पाण्याशी क्रिया करून H2 वायू मुक्त होऊन ऊर्जा उत्पादित होते.त्यामुळे उष्णता ऊर्जा मुक्त होऊन पेट घेतो.
b)धातूंची नावे सांगा.
i) जो धातू HNO3 शी क्रिया करून H2 वायू मुक्त करतो.
उत्तर – Zn
ii) जो धातू पाण्याच्या कोणत्याही अवस्थेशी क्रिया करू शकत नाही.
उत्तर – Cu,Au
iii) जो धातू थंड पाण्याशी क्रिया करत नाही.गरम पाण्याशी क्रिया करत नाही.पण वाफेबरोबर क्रिया करतो.
उत्तर – Al
2)
i) MgO पासून Mg मिळविण्यासाठी कार्बनचा क्षपणक म्हणून वापर होत नाही.कारण
उत्तर – Mg ला कार्बनपेक्षा ऑक्सिजनची जास्त आसक्ती असते.हे धातू विद्युत अपघटनाने मिळविता येतात.
ii) सोडियम धातू वितळलेल्या क्लोराईडच्या स्वरूपात अपघटनाने कसे मिळवितात?
उत्तर – विद्युत अपघटन
धातू कॅथोडकडे जमा होतो.क्लोरीन अॅनोडजवळ मुक्त होतो.