पिंकीचे चंचल मन
पिंकी आणि तिचे मित्र-मैत्रिणी फिरायला निघाले. सगळे खूप मजा मस्ती करत होते. वाटेत त्यांनी बरेच पशु पक्षी, झाडे झुडपे पाहिली. पिंकी तर फारच खुशीत होती. तिला अशी दृश्य फार आवडायची. तिला एक बैल दिसला. ती आपल्या मित्रांना सांगू लागली, बघा, बैल कसा चालतो!. जस्सी चकित होऊन म्हणाला, का? कसा चालतो म्हणजे? सगळे चालतात तसा. पिंकी म्हणाली, अरे तसे नाही, बघ मी चालून दाखवते. ती बैलाप्रमाणे आडवे तिडवे पाय टाकत चालू लागली.आणि अचानक अडखळून खाली पडली. सगळे जोरजोरात हसू लागले. पण थोड्याच वेळात बाकीच्यांच्या मनात काय आले कोण जाणे? सगळे बैलाप्रमाणे चालू लागले. मग त्यांना वाटेत जे प्राणी, पशु-पक्षी दिसेल, त्यांची नक्कल करू लागले. कोणाची चालण्याची नक्कल, हात हलवायची नक्कल, बोलण्याची नक्कल.
आवाज काढण्यात त्यांना मजा येऊ लागली. हरमने कुत्र्यासारखे ‘भो भो’ केले. पिंकी मांजराचा
आवाज काढू लागली, मियाव – मियाव
थोडे पुढे गेल्यावर हत्ती दिसला तर सगळे एकमेकांकडे पाहत विचारू लागले, हत्ती कसा बोलतो ?
तुम्हाला माहित आहे का ???
खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तर द्या :
1. सगळे काय करत होते ?
2. मुलांनी कोण-कोणत्या प्राण्यांची नक्कल केली ?
3. बैल आणि हत्ती याच्यात कोणत्या गोष्टी वेगळ्या असतात ?
4. विरुद्धार्थी शब्द सांगा: दृश्य
5. जर तुम्हाला एखाद्या पशु किंवा पक्ष्याची नक्कल करायची असेल तर कोणाची करणार? कशी ?
6. रस्त्याने चालताना तुम्हाला कोणती दृश्य चांगले वाटतात? वर्णन करा.
7.पिंकीच्या मनाला चंचल का म्हटले आहे? तुम्ही याच्याशी सहमत आहात? कारण सांगा.
8. नक्कल करणे आणि अनुकरण करणे वेगळे आहेत का? दोन्हीची उदाहरणे द्या.