परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – समाज विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
घटक 3 .भारतावरील ब्रिटिश सत्तेचे परिणाम
प्रश्न निर्मिती – श्री.एस.बी.सदलगे सर (साई हायस्कूल मांगूर)
1. ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती भारतामध्ये यांनी अवलंबिली.
A. पोर्तुगीज
B. फ्रेंच
C. इंग्रज
D. यापैकी नाही
2. फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना त्यांनी केली.
A. लॉर्ड कॉर्नवालीस
B. लॉर्ड वेलस्ली
C. र्लॉड डलहौसी
D. वॉरन हेस्टिंग्ज
3. दिवाणी अदालतीची सुरुवात यांनी केली.
A. लॉर्ड वेलस्ली
B. वॉरन हेस्टिंग्ज
C. लॉर्ड कॉर्नवालीस
D. र्लॉड डलहौसी
4. रेग्युलेटिंग अॅक्ट यास आली भारतात लागू करण्यात आला.
A. 1784
B. 1919
C. 1773
D. 1909
5. सर्व भारतीय लोक भ्रष्टाचारी आहेत असा आरोप त्यांनी केला.
A. लॉर्ड वेलस्ली
B. लॉर्ड कॉर्नवालीस
C. वॉरन हेस्टिंग्ज
D. र्लॉड डलहौसी
6. पोलीस अधीक्षक हे पद यांनी निर्माण केले.
A. लॉर्ड वेलस्ली
B. लॉर्ड कॉर्नवालीस
C. लॉर्ड डलहौसी
D. वॉरन हेस्टिंग्ज
7. यावर्षी ब्रिटिश दंडाधिकारी नेमण्याची पद्धत सुरू झाली.
A. 1780
B. 1771
C. 1781
D. 1790
8. कायमधारा(जमिनदारी) पद्धत या साली लागू झाली.
A. 1790
B. 1793
C. 1780
D. 1740
9. रयतवारी पद्धती त्यांनी सुरू केली.
A. अलेक्झांडर रीड
B. थॉमस मुन्रो
C. थामसन
D. बेऊर्ड
10. ‘भारतीय शेतकरी कर्जातच जन्मत असत,कर्जातच रहात असत आणि कर्जातच मारत असत’ हे उद्गार यांनी काढले आहेत.
A. बेऊर्ड
B. कॉर्नवालीस
C. मेटकॉफ
D. मुन्रो
11. बंगालचा गव्हर्नर हा तिन्ही प्रेसिडेन्सी चा गव्हर्नर या कायद्याद्वारे बनला.
A. 1784
B. 1773
C. 1813
D. 1833
12. हा एक ऐतिहासिक कायदा म्हणून ओळखला जातो.
A. 1813
B. 1833
C. 1774
D. 1909
13. या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल या हुद्द्याचे नाव बदलून व्हाइसरॉय असे संबोधण्यात आले.
A. 1813
B. 1833
C. 1858
D. 1892
14. या कायद्याला माँटेग्यु चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हटले जाते.
A. 1909
B. 1935
C. 1919
D. 1858
15. या कायद्याला मिंटो-मोर्ले सुधारणा कायदा असे म्हटले जाते.
A. 1919
B. 1833
C. 1909
D. 1935
16. रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना या कायद्यानुसार झाली.
A. 1909
B. 1919
C. 1892
D. 1935
17. भ्रष्टाचारी नोकरवर्गाला रोखणे हेच या कायद्याचे प्रमुख उद्धिष्ट होते.
A. 1773
B. 1784
C. 1909
D. 1919
18. कॉर्नवालीसने प्रत्येक ठाण्यावर याची नेमणूक केली.
A. पोलीस अधिकारी
B. चौकीदार
C. कोतवाल
D. यापैकी नाही
19. बंगाल प्रांतावरील अंमलासाठी ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटीश सरकारला इतकी रक्कम द्यावी लागली.
A. 2 लाख पौंड
B. 3 लाख पौंड
C. 1 लाख पौंड
D. 4 लाख पौंड
20. या कायद्यांतर्गत देशातील सर्व न्यायाधीशांचे असे सर्वोच्च न्यायालय येथे स्थापन करण्यात आले.
A. दिल्ली
B. नागपूर
C. कलकत्ता
D. मुंबई