परीक्षा बोर्ड – KSEEB बेंगळूरू
इयत्ता – दहावी
विषय – विज्ञान
घटकानुसार महत्वाचे 1 गुणाचे प्रश्न
2. आम्ल.अल्कली आणि क्षार
1) पांढऱ्या कपड्यावर आमटीचे डाग असतील आणि त्याला जेव्हा साबणाने घासले जाते तेव्हा डाग लालसर तपकिरी होतो याचे कारण…
A)साबण आम्लधर्मी असतो.
B)साबण अल्कधर्मी असतो.
C) साबण तेलकट असतो.
D) साबण रंगीत असतो
2) खालील पैकी हे धातूचे कार्बोनेट नाही.
A)चुनखडी,
B)खडू,
C)संगमरवर
D) नवसागर
3) अल्कलीचा प्रभाव आम्लामुळे नष्ट होतो व आम्लाचा प्रभाव आल्कली मुळे नष्ट होतो त्या रासायनिक क्रियेस असे म्हणतात
A) रासायनिक विघटन,
B) उदासीन क्रिया,
C) समावेशी क्रिया,
D) रासायनिक संयोग
4) A.B. C आणी D अशी चार द्रावणे आपणास दिली असून त्याचा PH अणुक्रमे 1.2, 2.2, 7.4, 10. असा आहे. तर यातील कोणते द्रावण प्रबल आम्ल आहे?
A)B
B)A,
C)D,
D) C
5) जठरात जळजळते तेव्हां उपाय म्हणून याचा उपयोग करतात.
A) अँटीबॉडीज,
B) अँटीअसीड,
C) अँटीव्हायरस
D) यापैकी नाही.
(6) मधमाशीने डंक मारल्यास तुरंत आराम मिळण्यासाठी या पदार्थाचा वापर करतात.
A)पाणी,
B) आम्ल,
C) बेकींग सोडा,
D) तेल
7 ) दातावरील इनॅमल हा पाण्यात न विरघळणारा पदार्थ या पासून बनलेला असतो.
A) कॅल्शियम फॉस्फेट,
B) कॅल्शियम सल्फेट,
C) कॅल्शियम क्लोराईड,
D) कॅल्शियम सिलिकेट
8 ) एक द्रावण अंड्याच्या कवची बरोबर रासायनिक क्रिया करते तेव्हा वायूची निर्मिती होते.जो वायू चुण्याची निवळी दुधाळ बनवतो.तर ते द्रावण हे आहे.
A)NaCl.
B)HCI.
C)LiCl,
D)KCI.
9) बेकिंग सोडा मिसळलेल्या दुधाचे दह्यात रूपांतर होण्यास जास्त वेळ का लागतो,
A) दुधाचा PH वाढलेला असतो
B) दूधाचा PH कमी होणे
C) दुध उदासीन असते
D) यापैकी नाही.
10. द्रावणाचा PH7 पासून 1 ने कमी होतो हे दर्शविते तर त्या द्रावणातील …..
A) H+ आयनाची तिव्रता जास्त.
B)OH आयनाची तिव्रता जास्त
C)H+ आणिOH– आयनची तिव्रता समान,
D)H+ आयनांची तिव्रता कमी
11) आल्कोहोल, ग्लूकोज सारखी संयुगे वि. प्रवाहाचे वहन करत नाहीत कारण…
A) ती आयन्स निर्माण करतात
B) ती आयन्स निर्माण करत नाहीत
C) त्यांचे आयन्स मध्ये विघटन होते.
D) यापैकी नाहीं.
12) परीक्षानळी A आणि B मध्ये समान लांबीची मॅग्नेशियम तार घेतली परीक्षानळीत हैड्रॉक्लोरीक आम्ल ओतले. व B परीक्षानलीत अँसिटिक आम्ल ओतले तर कोणत्या परीक्षानळीत फट् असा आवाज येईल.
A) B परीक्षानळीत,
B) A परीक्षानळीत,
C) दोन्ही परीक्षानळीत,
D) कोणताही आवाज येणार नाही.
13) खालीलपैकी हे नैसर्गिक दर्शक नाही.
A) हायड्रेन्जीया,
B) पेटूनिया,
C) जीरौनियम,
D) फिनॉलल्फथेलीन
14 ) वनस्पतीच्या निरोगी वाढीसाठी मातीचा इतका असावा लागतो.
A) 6PH
B) 7pH
C) 14pH
D) 10pH
15) दात किडण्याचे प्रमुख कारण
A)जास्त चॉकलेट खाल्यामुळे
B) तोंड न धुतल्यामुळे
C) लाळेचा PH 5.5 पेक्षा कमी होणे
D) सतत वरचेवर खात रहाणे.
16) एक द्रावण लाल लिटमस पेपर निळा बनवते तर त्या द्रावणाचा H…..
A)1
B)4,
C)5
D)10