शब्दयोगी अव्यय
पुढील वाक्ये वाचून अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा.
1. झाडाखाली चेंडू आहे.
2. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र लपला.
3. आमचे घर गावापासून जवळ आहे.
4. मजूर वर्षभर कष्ट करतात.
5. कोणाविषयी वाईट बोलू नये.
6. आईसाठी नवीन साडी आण.
वरील वाक्यात नामाला म्हणजे शब्दाला जोडून काही शब्द आले आहेत.
उदा. टेबलाखाली ‘टेबल’ या नामाला ‘खाली’ झाडामागे ‘झाड’ या नामाला ‘मागे’
यावरुन आपण असे म्हणू शकतो की,नामांना किंवा सर्वनामाना जोडून येणाऱ्या शब्दांना ‘शब्दयोगी अव्यय’ म्हणतात.
स्वाध्याय –
खालील उदाहरणातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
1. जनतेसाठी कार्य करा.
2. घरामध्ये दंगा घातला.
3. सूर्योदयापूर्वी उठावे.
4. माझ्या घराजवळ शाळा आहे.
5. आई बाळाला फुलासारखे जपते.
6. सूर्य ढंगामागे लपला.
7. टेबलाखाली पुस्तक आहे.